Home आपलं जग हेल्थ health care tips in marathi: भुजंगासनाची पारंपरिक पद्धत माहीत आहे? हे ६...

health care tips in marathi: भुजंगासनाची पारंपरिक पद्धत माहीत आहे? हे ६ लाभही जाणून घ्या – bhujangasana steps and health benefits in marathi


– प्रांजली फडणवीस
आपण नीट निरीक्षण केले, तर कुठलेही काम, हालचाल किंवा खेळांमध्ये ऊर्जा बाहेर पडते; पण योगासनांमध्ये हीच उर्जा शरीराच्या आत स्थिर करण्याचा आपण प्रयत्न करतो. एखादे आसन आपण जेवढा काळ करतो, तेवढा वेळ ही ऊर्जा शरीराच्या आत काम करते. म्हणजेच सकारात्मक बदल घडवते. म्हणून आसनांमध्ये स्थिरतेला जास्त महत्त्व आहे. आतापर्यंत दिलेले प्रत्येक आसन ३० सेकंद ते एक मिनिट करण्यावर आपण भर दिला. जर आपण एखादे आसन पाच ते दहा मिनिटांपर्यंत करण्याचे प्रावीण्य मिळवू शकलो, तर त्याचा परिणाम आंतरिक अवयव इंद्रिये आणि सांध्यांवर योग्य पद्धतीने होतो.
(हे योग्य मार्गदर्शनाखाली करणेच अपेक्षित आहे).

एखादे आसन हे ठरावीक व्याधीवर उपयुक्त आहे, असे म्हटले जाते, तेव्हा व्याधीच्या मुळापर्यंत ऊर्जा कार्यान्वित होण्यासाठी तेवढा वेळ त्या आसनामध्ये स्थिर राहता आले पाहिजे. जसे दमा किंवा श्वसन विकारांवर भुजंगासन उपयुक्त आहे. आसन स्थिर होईपर्यंत ऊर्जा ‘सेंटर टू पेरीफेरी’ वाहत होती. आसनामध्ये स्थिर झाल्यावर ऊर्जा ‘पेरीफेरी टू सेंटर’ म्हणजे अंतर्मुख होणार आहे. अशा वेळी जेमतेम पाच ते दहा आकडे थांबून आसन सोडले, तर आसन तर जमले; परंतु श्वसन विकारासाठी त्याचा फारसा उपयोग होणार नाही. त्यासाठी हेच भुजंगासन जास्त काळासाठी करावे लागेल.
(ऑफिसमध्ये किंवा कमी जागेत पवनमुक्तासन कसे करावे? जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितलेली पद्धत)

पारंपरिक भुजंगासन

– पोटावर पालथे झोपणे. दोन्ही हात कोपरात दुमडून तळहात खांद्याच्या रेषेत जमिनीवर टेकवणे.
– हनुवटी जमिनीवर टेकवणे.
– दोन्ही पाय एकमेकांना जोडून घेणे.
– पायाची बोटे पसरट जमिनीवर टेकवणे.
– श्वास घेत हळूहळू मान, खांदे वर उचलणे.
– हात कोपरात सरळ करून जेवढे शरीर वर उचलता येईल, तेवढे वर उचलणे.
– श्वास सोडून श्वसन चालू ठेवणे.
(Yoga Benefits कमरेच्या स्नायूंसाठी करा हे आसन, जाणून घ्या योग्य पद्धत)
अशा स्थितीमध्ये प्रथम १०-१५-३० आकडे आणि हळूहळू एक मिनिटापर्यंत या आसन स्थितीमध्ये थांबणे.
मनगटामुळे किंवा कोपरामुळे भुजंगासन जमत नसेल, तर छातीच्या खाली आडवा लोड किंवा दोन उशा घेऊन भुजंगासन ना सारखा शरीराचा आकार घेणे.

ऑफिसमध्ये काम करताना…
– भिंतीजवळ उभे राहणे.
– छातीचा भाग भिंतीला टेकून दोन्ही हात कोपरात वाकवून खांद्याच्या रेषेत भिंतीवर टेकवणे.
– आता हळूहळू श्वास घेत हात वर उचलणे.
– चवड्यावर शरीर स्थिर करून सावकाश मान भिंतीपासून लांब, मागे नेणे. त्याबरोबर छातीचा भाग आणि खांद्याचा भागपण मागे नेणे.
– छातीचा तळ आणि पोटाचा भाग भिंतीला टेकलेला असेल. दोन्ही हातांच्या मदतीने शरीराचा तोल सांभाळणे.
(पाठ, कंबर, पायांच्या दुखण्यापासून सुटका हवीय? करा हे सोपे आसन)
भुजंगासनाचे उपयोग :
– पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते.
– कंबरदुखी आणि सायटिका वेदना कमी होते.
– मानदुखी कमी होते.
– पोटाच्या तक्रारी, अपचन आणि गॅसेस यावर प्रभावी.
– खांदे, मनगट आणि कोपर बळकट होतात.
– पोश्चर सुधारते.
(लेखिका योगथेरपिस्ट आहेत.)Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

panvel social organization: झाडांवर विषप्रयोग केल्याचा संशय – social organization has expressed suspicion that two trees poisoned by drilling in kalamboli

म. टा. वृत्तसेवा, पनवेल कळंबोली शहरातील दोन झाडांना ड्रिल मारून विषप्रयोग केल्याचा संशय सामजिक संघटनेकडून व्यक्त करण्यात आला आहे. पिंपळ आणि रेनट्रीच्या खोडाला...

Nashik: Nashik: कोल्ड ड्रिंक्समधून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार – nashik woman sexually assaulted on pretext of career in modeling

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड: मॉडेलिंगमध्ये करिअरच्या भूलथापा देत एकाने गुंगीचे औषध देऊन वेळोवेळी अत्याचार करून व अश्लील व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत...

Corona Cases in Aurangabad: coronavirus – तीन मृत्यू, १३३ नवे बाधित – aurangabad reported 133 new corona cases and 3 deaths in yesterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजिल्ह्यातील तीन बाधितांचा गुरुवारी उपचारादरम्यान खासगी रुग्णालयांमध्ये मृत्यू झाला, तर १३३ नवे बाधित आढळले. त्याचवेळी ३३६ बाधित (शहरः २५६, ग्रामीणः...

Recent Comments