Home आपलं जग हेल्थ health news News : आरोग्यमंत्र, नागपूर - arogyamantra, nagpur

health news News : आरोग्यमंत्र, नागपूर – arogyamantra, nagpur


कर्करोगाचे चार स्तर आणि प्रतिबंधात्मक उपाय

डॉ. अभिनव देशपांडे

कर्करोग शल्यचिकित्सक, नागपूर

कुठल्याही आजारासारखेच कर्करोगामध्येही पूर्वनिदानाला आणि प्रतिबंधात्मक उपायांना महत्त्व आहे. कर्करोग कशामुळे झाला, हे शोधणे कठीण असले तरी काही कर्करोगांची कारणे आपणास माहिती असतात. मुख कर्करोग झाला, तर त्याचे कारण अर्थातच तंबाखू अन् फुफ्फुसांचा कर्करोग झाल्यास धूम्रपान! याशिवाय काही उद्योगांमध्ये रसायने अथवा काही धातूंच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कर्करोग झाल्याचे आढळले आहे.

कर्करोगावर उपचार असून, योग्यवेळी निदान झाल्यास तो बरा होऊ शकतो. कर्करोग उपचारांच्या दोन पद्धती आहेत. पहिली म्हणजे क्युरेटिव्ह. जेव्हा कर्करोग शरीरात कमी प्रमाणात पसरला असेल, तर त्यावर जास्तीत जास्त उपचार करता येतो. जर कर्करोगाचे योग्य वेळेस अथवा पहिल्या टप्प्यात निदान झाले, तरच हे उपचार करता येणे शक्य आहे. योग्य वेळेत निदान होण्यासाठी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेत डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.

दुसरी उपचार पद्धती म्हणजे पॅलिएटिव्ह. त्यास आपण सर्वसाधारणपणे दुःखशामक उपचारपद्धती म्हणू. म्हणजे कर्करोग शरीरात पसरला असल्याने त्याचे उच्चाटन शक्य नाही. पण कर्करोगामुळे होणारा त्रास व वेदना उपचारांनी कमी करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे पॅलिएटिव्ह उपचार पद्धती.

आपण चर्चा करताना कर्करोगाच्या स्टेजेसबद्दल बोलत असतो. पण त्या चार स्टेजेस् म्हणजे कर्करोगाचे चार स्तर काय आहेत, हेदेखील समजून घेतले पाहिजे. कर्करोगाचे स्तर तीन बाबींवर अवलंबून आहेत. पहिली बाब म्हणजे, ट्युमरचा आकार; त्याचे वर्गीकरण करण्यासाठी आपण टी (T) हा प्रातिनिधिक शब्द वापरू. वाढलेल्या ग्रंथी म्हणजे, लिम्फ नोडसमधील गाठी; त्याचे वर्गीकरण करण्यासाठी आपण एन (N) हे अक्षर वापरतो. आणि कर्करोगाचे स्तर ठरविण्याची तिसरी बाब म्हणजे, मेटॅस्टेसिस अर्थात कर्करोग संपूर्ण शरीरात पसण्याची क्रिया. त्यास आपण एम(M) हे अक्षर वापरूया. आता ‘टी-एन-एम’ क्लासिफिकेशनुसार कर्करोगाचे स्तर ठरतात.

–ट्युमरचे वर्गीकरण (आकारावरून)

टी-१: दोन सेंटीमीटरपर्यंतचा ट्युमर

टी-२: दोन सेंटिमीटर ते पाच सेंटीमीटरचा ट्युमर

टी-३: पाच सेंटिमीटर ते १० सेंटीमीटरचा ट्युमर

टी-४: दहा सेंटिमीटरहून अधिक व ट्युमरमध्ये पस होणे, फुटणे

वाढलेल्या ग्रंथींचे तीन प्रकार

एन-०: कर्करोगामुळे लिम्फनोड्समध्ये गाठ होत नाही.

एन-१ : लिम्फनोड्समध्ये गाठी होतात मात्र, त्या रुतून बसत नाहीत.

एन-२ : लिम्फनोड्सच्या गाठी एकदम पक्क्या रुतून बसल्या आहेत.

कर्करोग शरीरात पसरला की नाही, हे सांगणारी श्रेणी

एम-०: शरीरात कर्करोग पसरलेला नाही.

एम-१: रक्तात कर्करोगाचा प्रसार झाला आहे.

‘टी-एन-एम’ क्लासिफिकेशनुसार कर्करोगाचे स्तर खालीलप्रमाणे

स्टेज १ : टी-१, एन-०, एम-० ( कर्करोगाचा छोटा ट्युमर आहे मात्र, लिम्फनोड्समध्ये गाठी नाहीत, व तो शरीरात पसरलादेखील नाही)

स्टेज २ : टी-२, एन-१, एम-० (कर्करोगाचा ट्युमर २ ते ५ सेंटीमीटरदरम्यान असून कर्करोगामुळे गाठी झाल्या आहेत)

स्टेज ३ : टी-३, एन-२, एम-० (ट्युमरचा आकार ५ ते १० सेंटिमीटर दरम्यान असून कर्करोगामुळे झालेल्या गाठी रुतून बसलेल्या आहेत)

स्टेज ४ : टी-४. एन-१ किंवा टी-२, एम-१ (ट्युमरचा आकार १० सेंटिमीटरपेक्षा अधिक आहे, किंबहुना पस जमा झाला आहे, गाठीही रुतून बसल्या आहेत आणि शरीरभर कर्करोगाचा प्रसार झाला आहे.)

जर कर्करोगाच्या ट्युमरचा आकार १० सेंटिमीटरपेक्षा जास्त (टी-४) असेल आणि त्याचवेळी कर्करोग शरीरात पसरलेला नसेल (एम-०) तर त्यास लोकली अ‍ॅडवान्स मॅलेगन्सी म्हणजे केवळ स्थानिक भागात चौथ्या स्तरापर्यंत पोहोचलेला कर्करोग आहे, असे म्हणू शकतो. पुढील भागात कर्करोगाच्या निदानासाठी कोणकोणत्या चाचण्या करतात त्याचा आढावा घेऊ.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

virat kohli: IND vs ENG : विराट कोहलीला मिळाले जीवदान, पाहा कोणी सोडला सोपा झेल… – ind vs eng : indian captain virat kohli’s...

अहमदाबाद, IND vs ENG : भारताचा कर्णधार विराट कोहलीला पहिल्याच दिवशीच जीवदान मिळाल्याचे पाहायला मिळाले. विराटचा सोपा झेल यावेळी इंग्लंडच्या खेळाडूने सोडल्याचे पाहायला...

प्रियांका चोप्रा: पलटवार असावा तर असा! लोकांनी उडवली ड्रेसची थट्टा, पाहा प्रियांका चोप्राचं उत्तर – priyanka chopra tweet her viral memes on her dress...

हायलाइट्स:प्रियांका चोप्रा आणि फॅशन याजणू एकाच नाण्याच्या दोन बाजूप्रियांकाच्या ड्रेसवर व्हायरल होत आहेत मीम्सस्वतः प्रियांकानेही घेतला या मीम्सचा आनंदमुंबई- प्रियांका चोप्राचा हात फॅशन...

kapil sibal congress leader: ‘उत्तर-दक्षिण’ वक्तव्यावरून राहुल गांधी वादात; कपिल सिब्बलांनी दिला सल्ला, म्हणाले… – congress leader kapil sibal speaks on rahul gandhis statement...

नवी दिल्लीः कॉंग्रेस नेते राहुल गांधी ( rahul gandhi ) यांनी उत्तर व दक्षिण भारतातील राजकारणावर केलेल्या वक्तव्यावरून आता त्यांना आपल्याच पक्षाचे ज्येष्ठ...

Ambani plan to enter e car: रिलायन्सला आता ‘या’ उद्योगाची भुरळ ; नव्या व्यापारी युद्धाची तयारी करत आहेत मुकेश अंबानी – mukesh ambani ready...

हायलाइट्स:नुकताच रिलायन्स इंडस्ट्रीजने तेल आणि रसायन उद्योगाचे विभाजन केले होते.भारतात ई-मोटारींचे पर्व लवकरच सुरू होणार आहे. याकडे अंबानी यांचे लक्षअंबानी यांना आता इलेक्ट्रिक...

Recent Comments