Home विदेश heart transplant: Heart transplant डॉक्टरांची कमाल! मृत व्यक्तींचे हृदय 'जिवंत' केले; सहा...

heart transplant: Heart transplant डॉक्टरांची कमाल! मृत व्यक्तींचे हृदय ‘जिवंत’ केले; सहा मुलांचे प्राण वाचवले! – uk doctors pioneer use of heart in a box transplant technique in children


लंडन: डॉक्टरांना देवदूत म्हटले जाते. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा लंडनमध्ये आला. डॉक्टरांनी एका मशीनचा वापर करून मृत व्यक्तींच्या हृदयाला पुन्हा ‘जिवंत’ केले. इतकंच नव्हे तर हे ‘जिवंत’ केलेले हृदय सहा मुलांच्या शरीरात ट्रान्सप्लांटही केले. या मुलांची प्रकृती चांगली आहे. आतापर्यंत फक्त ब्रेनडेड असलेल्यांच्या हृदयाचे प्रत्यारोपण केले जात असे.

ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या डॉक्टरांनी प्रत्यारोपणाच्या तंत्रज्ञानात मोठे पाऊल उचलले आहे. केंब्रिजशायरच्या रॉयल पेपवर्थ रुग्णालयाच्या डॉक्टरांनी ऑर्गन केअर मशीनच्या माध्यमातून मृत व्यक्तिंचे हृदय ‘जिवंत’ केले. अशी कामगिरी करणारे हे जगातील पहिलेच वैद्यकीय पथक ठरले आहे.

वाचा: करोनाबाधित ओळखण्यासाठी ऑक्सिमीटर निरुपयोगी?

वाचा: करोनाचे थैमान: जगातील २० टक्के करोनाबाधितांचे मृत्यू ‘या’ देशात!

एनएचएसच्या डॉक्टरांनी ऑर्गन केअर सिस्टम मशीन विकसित केली आहे. मृत्यू झाल्याचे निष्पन्न होताच डोनरच्या हृदयाला तातडीने काढून या मशीनमध्ये ठेवून १२ तास तपासणी केली जाते. त्यानंतरच दुसऱ्या शरीरात त्याचे प्रत्यारोपण केले जाते. या हृदयाला दुसऱ्या रुग्णाच्या शरीरात लावण्याआधी त्याच्या शरीराच्या आवश्यकतेनुसार ऑक्सिजन, पोषक तत्वे आणि त्याच्या रक्त गटाचे रक्त या मशीनमध्ये ठेवलेल्या हृदयात २४ तासा प्रवाहीत केले जाते. या नव्या तंत्रज्ञानामुळे हृदय प्रत्यारोपणाची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळणार असल्याचे म्हटले जाते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pm modi rally in kolkata live updates: pm modi rally live update : PM मोदींची कोलकात्यात प्रचारसभा, भाषण सुरू… – pm modi rally in...

कोलकाताः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोलकात्यातील ब्रिगेड मैदानावर प्रचारसभा होत आहे. या सभेला हजारो नागरिक आले आहेत. पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे सर्वांचं...

जातपंचायतीची बहिष्कारनीती सुरूच

म. टा. प्रतिनिधी, समाजमनावरील जातपंचायतीची दहशत उधळून लावल्याची घटना म्हसरूळ (ता. नाशिक) येथे ताजी असतानाच आता सिन्नरमध्ये जातपंचायतीने तरुणावर बहिष्कार घातल्याचा धक्कादायक प्रकार...

औरंगाबाद : विनयभंगप्रकरणी तीन आरोपी अटकेत

म. टा. प्रतिनिधी, कोचींग क्लासेसहून आपल्या घरी चाललेल्या एका करणाऱ्या तीन जणांना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. ऋषीकेश पालोदकर (२२, रा. पुंडलिकनगर), शुभम...

Mithun Chakraborty Joins BJP: कोलकात्यात PM मोदींची सभा; अभिनेते मिथुन चक्रवर्तींचा भाजपमध्ये प्रवेश – actor mithun chakraborty joins bharatiya janata party at pms rally...

कोलकाताः पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोलकात्यातील ब्रिगेड मैदानावर जंगी सभा होत आहे. विशेष म्हणजे या सभेला भाजप नेत्यांसोबत ज्येष्ठ अभिनेते...

Recent Comments