Home महाराष्ट्र height of ganesh idols: उत्सव साधेपणानेच! गणेश मूर्तींची उंची ४ फुटांपर्यंत; ठाकरे...

height of ganesh idols: उत्सव साधेपणानेच! गणेश मूर्तींची उंची ४ फुटांपर्यंत; ठाकरे सरकारचा निर्णय – height of ganesh idols to be 4 feet keep pandals smaller: cm uddhav thackeray to mandals


मुंबईः करोना संसर्गाचे सावट यंदाच्या गणेशोत्सावर आहे. त्यामुळं मुंबईत नेहमी सारखा गणेशोत्सव यंदा दिसण्याची शक्यता कमी आहे. मुंबईतील करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तींच्या उंचीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. श्री गणेशाच्या मूर्तीची उंची ४ फुटांपर्यंत असावी व गणेशोत्सव काळात कुठेही गर्दी करू नये असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. (Uddhav Thackeray on Ganpati Festival)

उंच गणेशमूर्ती आणि भव्यता ही मुंबई ही गणेशोत्सवाची ओळख आहे. पण करोनामुळं यंदाचा उत्सव साधेपणानं व सुरक्षितरित्या पार पाडावा म्हणून गणेशमूर्तींच्या मूर्तींबाबतचा मुद्दा पुढं आला होता. मुंबईसह महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेश मंडळांशी चर्चा करून भव्य मूर्तीऐवजी ४ फुटांपर्यंतच्या मूर्तीचीच मंडपात प्रतिष्ठापना व्हावी असा पर्याय पुढं आला असून सर्वांनी एकमतानं हा निर्णय केला आहे.

मोठ्या मूर्तीमुळे त्यांचे आगमन व विसर्जनप्रसंगी जास्त कार्यकर्ते लागतात. ते टाळावे लागेल. शेवटी मूर्तीची उंची नाही तर भक्ती महत्त्वाची आहे. मंडपात नेहमीची गर्दी नको. गणरायांचे विसर्जन कमीत कमी गर्दी, नियमांचे पालन करत होईल. मंडपदेखील लहान आणि साधेच पण सुंदर असतील. असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक मंडळांना केलं आहे. श्रीगणेशाच्या मूर्तीची उंची महत्त्वाची नाही तर भक्ती महत्त्वाची आहे, असंही ते म्हणाले.

करोनामुळे आषाढीचा भव्य पालखी सोहळा व लाखो वारकऱ्यांची पंढरी वारीही रद्द करण्यात आली आहे. पण पालखीची परंपरा न मोडता हे केले. मुंबईतील ‘गोविंदा उत्सव’ म्हणजे दहीहंड्या रद्द केल्या आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

health minster rajesh tope: चाचण्यांसाठी पुन्हा दरकपात – maharashtra goverment again reduced price of corona test

म. टा. प्रतिनिधी, मुंबईमुंबईसह राज्यात करोना चाचणीसाठी आता ९८० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली...

Lasalgaon onion market: मुंबई बाजारात कांद्याची आवक घटली – onion imports declined in mumbai due to onion auction close in lasalgaon onion market

म. टा. वृत्तसेव, नवी मुंबईकांद्याची मर्यादेपेक्षा अधिक साठवणूक करणाऱ्या साठेबाजांवर धाडी पडण्यास सुरुवात झाल्यानंतर, कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये लिलाव बंद पडले आहेत....

Recent Comments