शनिवारी मरिन ड्राइव्हच्या समुद्राजवळ उंच लाटा उसळलेल्या पाहायला मिळाल्या. त्याचा एक व्हिडिओदेखील व्हायरल होत आहे. या व्हिडिओतून लाटांचं रौद्र रुप पाहायला मिळत आहे. मुंबई पोलिसांनी खरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना मरीन ड्राइव्हनजीकच्या समुद्र किनाऱ्यावर जाण्यास बंदी घातली आहे.
वाचा: निसर्ग वादळग्रस्त लेप गावानं दाखवली प्रकाशाची वाट
मागच्याच आठवड्यात मान्सूननं महाराष्ट्र व्यापला आहे. तळकोकणासह मुंबई, पुण्यालाही मुसळधार पावसानं झोडपलं आहे. गरमीनं हैराण झालेले मुंबईकर मान्सूनच्या आगमनानं सुखावले आहेत. मुंबईत करोनाचा धोकाही अधिक आहे. त्यामुळं दरवर्षी प्रमाणे यंदा नागरिकांची गर्दी कमी दिसतेय. तरीही काही नागरिक सकाळी मॉर्निंग वॉकसाठी मरिन ड्राइव्हवर फिरताना दिसत आहे.
वाचा: हा तर भारताचा विजय; उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया
सरासरीइतका पाऊस
दरम्यान यंदा जून ते सप्टेंबर या मान्सून काळातील सरासरीच्या १०२ टक्के पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) आपल्या सुधारीत अंदाजात वर्तवली आहे. मान्सूनसाठी संपूर्ण हंगामात हवामान अनुकूल राहणार असल्यामुळे सरासरीइतक्या पावसाची शक्यता असल्याचे अंदाजात म्हटले आहे. वायव्य भारतात यंदा त्या भागातील हंगामी सरासरीच्या १०७ टक्के, महाराष्ट्राचा समावेश असणाऱ्या मध्य भारतात सरासरीच्या १०३ टक्के, दक्षिण भारतात १०२ टक्के, तर ईशान्य भारतात ९६ टक्के पावसाची शक्यता आहे.