Home देश home ministry guidelines: राज्यांना रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन ठरवण्याचा अधिकार, पण......

home ministry guidelines: राज्यांना रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन ठरवण्याचा अधिकार, पण… – lockdown 4 red green and orange zones will be decided by the respective state governments home ministry gives guidelines


नवी दिल्लीः केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी नियमावली जाहीर करताना रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन निश्चित करण्याची परवानगी राज्यांना दिली आहे. तसंच रेड झोन आणि ऑरेंज झोनमधील कंटेन्मेंट झोन आणि बफर झोन जिल्हाधिकाऱ्यांना ठरवता येणार. पण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या नियमांनुसारच हे झोन ठरवता येईल, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.

राज्य सरकारांनी कंटेन्मेंट झोन, रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन निश्चित करावे. या झोनमधील नियम मात्र केंद्र सरकारकडून निश्चित केले जातील. सर्व प्रकारच्या झोनच्या सीमा ठरवण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असेल. जिल्ह्याच्या सीमा खुल्या कराव्यात की नाही याचा निर्णयही जिल्हाधिकारी घेऊ शकतील, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.

कंटेन्मेंट झोनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. या भागांमध्ये लॉकडाऊनच्या नियमांचे कठोर पालन करावे. या भागात येण्या-जाण्यावर पूर्णपणे बंदी असेल. फक्त वैद्यकीय सेवा आणि अत्यावश्यक वस्तुंचा या भागात पुरवठा केला जाईल. या भागांमध्ये प्रत्येक घरात जाऊन संसर्ग झालेल्या रुग्णांचा शोध घेतला जाणार आहे. कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागांमध्ये सर्व दुकानं सुरू करता येणार आहेत. ही दुकानं ठरलेल्या वेळेत उघडतील आणि बंद होतील, याची दक्षता स्थानिक प्रशासकीय यंत्रणांनी घ्यायची आहे, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.

देशातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवला, नियमावली जाहीर

वादग्रस्त सुधारणांची ही वेळ नाही, सीतारामन यांना काँग्रेसचे उत्तर

केंद्र सरकारने चौथ्या टप्प्यात संध्याकाळी ७ ते सकाळी ७ या वेळेत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रात्रीच्या वेळी फिरणाऱ्यांना आळा बसणार आहे. संचारबंदीचे कठोर पालन करावे. या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असं सरकारने म्हटलं आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Anna Hazare: अण्णा हजारेंचं आंदोलन रोखण्यासाठी भाजपचे आटोकाट प्रयत्न; उचललं ‘हे’ पाऊल – bjp trying hard to stop anna hazare from agitation

अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपण आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितल्याने त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आता भाजपने पुढचे पाऊल टाकले आहे. कोणत्याही परिस्थितीत अण्णांचे...

Anthony Stuart: गोलंदाजांमध्ये अशी कामगिरी करणारा जगातील एकमेव खेळाडू; पाहा व्हिडिओ – australian cricketer anthony stuart only bowler to take a hat trick in...

नवी दिल्ली: वनडे क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत चार असे गोलंदाज झाले आहेत ज्यांनी पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक घेतली आहे. पण करिअरमधील अखेरच्या सामन्यात हॅटट्रिक घेण्याची...

bmc health officers: रात्रभर जागले पालिकेचे अधिकारी – bmc officers was facing stress due to not receiving the cowin app’s message regarding covid-19 vaccination...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकोवीन अॅपवर नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणासंदर्भात मेसेज पाठवण्यात येणार होते. मात्र शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अॅप आणि मेसेज न...

Recent Comments