Home शहरं औरंगाबाद honey trap in buldhana: हनी ट्रॅपमध्ये अडकवले; खंडणी वसुलीचा प्रयत्न करणारी टोळी...

honey trap in buldhana: हनी ट्रॅपमध्ये अडकवले; खंडणी वसुलीचा प्रयत्न करणारी टोळी जाळ्यात – honey trap in buldhana jalna woman and other two arrested by police


बुलडाणा: हनी ट्रॅपमध्ये (honey trap in Buldhana) अडकवून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत २५ लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा बुलडाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. मैत्रिणीला ब्युटी पार्लर सुरू करायचा असून, त्यासाठी मदत करा असे सांगून महिलेने फोनवर परिचय वाढवला आणि तक्रारदाराला जाळ्यात ओढले. या प्रकरणी महिलेसह अन्य दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजा येथे मला आणि माझ्या मैत्रिणीला ब्युटी पार्लर सुरू करायचा आहे. त्यासाठी तुमचे दुकान भाड्याने हवे आहे, असे एका महिलेने तक्रारदाराला फोनवर सांगितले. रोहिणी नितीन पवार (२९) असे तिने स्वतःचे नाव सांगितले. जालना येथील जमुनानगर परिसरात राहत असल्याचे तिने सांगितले. मात्र, आपल्याकडे कोणतेही दुकान नाही. प्लॉट असून तो विकायचा किंवा भाड्याने द्यायचा नाही असं तक्रारदारानं त्या महिलेला सांगितले. त्यावर मैत्रिणीसोबत ब्युटी पार्लर सुरू करायचा आहे. तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीचे दुकान किंवा गाळा भाड्याने मिळवून द्याल का अशी विनंती तिने केली. त्यानंतर तिने त्याच्याशी ओळख वाढवली. फोनवरून झालेल्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. मोबाइलवर बोलणे वाढले. त्यानंतर ते भेटू लागले. या भेटीचे व्हिडिओ रोहिणी पवार आणि तिचे साथीदार राहुल सर्जेराव गाडेकर (भिवगाव, देऊळगाव राजा) आणि सचिन दिलीप बोरडे (राहणार वाघळूर) यांनी काढले.

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

तक्रारदार आणि संबंधित महिलेचे काढलेले व्हिडिओ त्याला दाखवले. बलात्कार, अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल करू आणि तुमचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू, अशी धमकी त्याला देण्यात आली. तसंच त्याच्याकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यातील चार लाख रुपयांचा पहिला हप्ता देण्यास सांगितले. मात्र, आपल्याला जाळ्यात अडकवल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने बुलडाणा गुन्हे शाखेकडे याबाबत तक्रार केली. त्यांनी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने सापळा रचला. पोलिसांचे पथक खासगी वाहनाने सरकारी पंचांसह देऊळगाव राजा येथे रवाना झाले. खंडणीच्या पैशांची मागणी करण्यासाठी आरोपींनी तक्रारदाराला फोन केला आणि देऊळगाव राजा येथील बसस्थानकात बोलावले. तेथे तक्रारदार गेल्यानंतर त्यांना दुचाकीवर बसवून गावाबाहेर चिखली-जालना रस्त्यावर घेऊन गेले. तेथे पुन्हा व्हिडिओ दाखवून पैशांची मागणी केली. तक्रारदाराने २५ लाखांपैकी चार लाख रुपयांचा पहिला हप्ता आरोपींना दिला. त्यानंतर पोलिसांच्या पथकाला कळवले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना रंगेहाथ पकडले.

अनेकांना जाळ्यात अडकवल्याची माहिती

पोलिसांनी आरोपींकडून चार लाख रुपये, व्हिडिओ असलेला मोबाइल, दुचाकीसह मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांना देऊळगाव राजा येथील पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं. रोहिणी पवार, राहुल गाडेकर आणि सचिन बोरडे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख, पोलीस उपनिरीक्षक नागेशकुमार चतरकर, मुकुंद देशमुख, रघुनाथ जाधव, लक्ष्मण कटक, भारत जंगले, अनुराधा उंबरहंडे यांनी ही कारवाई केली. दरम्यान, आरोपींनी बुलडाणा आणि जालना जिल्ह्यातील अनेक व्यक्तींना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळले असल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे. फसवणूक झालेल्या व्यक्तींनी आरोपींविरोधात तक्रार करावी. त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन गुन्हे शाखेने केले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Jacinda Ardern: न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा अर्डर्न : सहृदय आणि कणखर – pragati bankhele article on new zealand prime minister jacinda ardern

प्रगती बाणखेलेYou can carve your own path, be your own kind of leader.We do need to create a new generation of leadership.नव्या पिढीतलं...

Recent Comments