Home विदेश Hong Kong protest: ...म्हणून हाँगकाँगमध्ये चीनविरोधात आंदोलनाचा पुन्हा भडका! - protests against...

Hong Kong protest: …म्हणून हाँगकाँगमध्ये चीनविरोधात आंदोलनाचा पुन्हा भडका! – protests against china continue in hong kong know about recent protest


लडाखमध्ये भारताला घेरण्याचा विचार करणाऱ्या चीनला हाँगकाँगमध्ये मोठा झटका बसला आहे. चीनविरोधात झालेल्या हिंसक आंदोलनानंतर चीन सरकारने हाँगकाँगसाठी राष्ट्रीय सुरक्षा कायदा संसदेत सादर केला आहे. या कायद्याविरोधात हाँगकाँगमध्ये पुन्हा एकदा आंदोलनाचा भडका उडाला आहे. चीनच्या प्रस्तावित राष्ट्रीय सुरक्षा विधेयकाच्या विरोधात रविवारी शेकडो आंदोलक मोर्चा काढण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. या आंदोलकांना पांगवण्यासाठी हाँगकाँग पोलिसांनी अश्रूधूर आणि पाण्याचा मारा केला. हाँगकाँगसाठी चीनने ‘एक देश, दोन व्यवस्था’ असे धोरण अवलंबले आहे. या नव्या कायद्यानुसार या तत्वाला मुरड घातली जाणार असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. या कायद्यामुळे हाँगकाँगला असणारे विशेष अधिकारदेखील गमवावे लागणार आहे. मागील वर्षीदेखील लोकशाहीच्या मागणीसाठी हाँगकाँगमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन झाले होते. त्यानंतर करोनाच्या संसर्गानंतर हे आंदोलन थंडावले होते. त्यानंतर आता राष्ट्रीय सुरक्षा कायद्यामुळे हाँगकाँगमध्ये पुन्हा एकदा अशांतता पसरली असल्याचे चित्र आहे.

हाँगकाँगसाठी कायदा

चीनच्या संसद सत्रापूर्वीच्या एका बैठकीत या कायद्याचे विधेयक मांडण्यात आले. राष्ट्रीय सुरक्षेसाठी हाँगकाँगमधील विशेष प्रशासनिक क्षेत्रात कायदा सुव्यवस्था स्थापित करण्यासाठी आणि अधिक चांगली करण्यासाठी विधेयक मांडण्यात आले असल्याचे सांगण्यात येते. ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’नुसार या कायद्यानुसार परदेशी हस्तक्षेप, दहशतवाद आणि देशविरोधी कारवायांना प्रतिबंध करण्यात येणार आहे. यामध्ये सरकार पाडण्याच्या प्रयत्नांचाही समावेश आहे.

१९९७ मध्ये चीनमध्ये हाँगकाँगचे हस्तांतरण

maharashtra times

अल जझीरानुसार, बीजिंग अर्थात चीन सरकार हाँगकाँगमधील राजकारणात थेट हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहे. हाँगकाँग हे ब्रिटीशशासित होते. त्यानंतर १९९७मध्ये चीनमध्ये हाँगकाँगचा समावेश झाला. मात्र, हाँगकाँगमध्ये ‘एक देश, दोन व्यवस्था’ हे सूत्र लागू करण्यात आले. याचाच अर्थ, चीनमध्ये समाजवादी व्यवस्था आणि हाँगकाँगमध्ये भांडवलशाहीपूरक व्यवस्था लागू करण्यात आली. त्याशिवाय हाँगकाँगला काही विशेष अधिकारही मिळाले आहेत. यामध्ये स्वतंत्र न्यायपालिका आणि नागरिकांना स्वातंत्र्य, अधिकारांचा समावेश आहे. हे सूत्र २०४७ पर्यंत लागू असणार आहे.

राष्ट्रगीताच्या मुद्यावर वाद

maharashtra times

काही दिवसआधी हाँगकाँगच्या विधान परिषदेत चीनच्या राष्ट्रगीताला घेऊन एक विधेयक आणण्यात आले होते. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला. सभागृहातील लोकशाहीवादी सदस्यांनी विरोध केला होता. त्यावेळी विरोध करणाऱ्या सदस्यांना सभागृहाबाहेर काढण्यात आले. या विधेयकानुसार, हाँगकाँगमध्ये चीनच्या राष्ट्रगीताचा अपमान करणे हा गुन्हा असणार आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sanjay Raut taunts Congress: हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे; संजय राऊतांचा काँग्रेसवर निशाणा – shiv sena mp sanjay raut slams congress for opposing renaming of...

मुंबई: औरंगाबादच्या नामांतरास विरोध करणाऱ्या काँग्रेसवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. 'औरंगजेब हा धर्मांध आक्रमक होता. तो ‘सेक्युलर’ अजिबात...

mns vs shiv sena: मुंबई: शिवाजी पार्क येथील ग्रीलवरून शिवसेना-मनसेत वाद – disputes between shivsena and mns over steel grill on veer savarkar marg...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईशिवाजी पार्क येथील वीर सावरकर मार्गावरील सुस्थितीतील स्टीलचे ग्रील काढून तेथे लोखंडी ग्रील बसवले जाणार असल्याचा दावा मनसेने केला...

Recent Comments