Home मनोरंजन honorarium of the actors: मालिका कलाकारांच्या मानधनात होणार मोठी कपात - there...

honorarium of the actors: मालिका कलाकारांच्या मानधनात होणार मोठी कपात – there will be a big reduction in the honorarium of the actors in the series due to corona lockdown


मुंबई टाइम्स टीम

चित्रीकरणाला सशर्त परवानगी मिळाली असल्यानं येत्या काळात चित्रीकरणाचं स्वरुप बदलणार आहे. मालिकांच्या युनिटना कमीत कमी खर्चात काम उरकावं लागेल. टीव्ही वाहिन्यांनी आपल्या मालिकांच्या निर्मात्यांना चित्रीकरणाचं बजेट तीस टक्क्यांनी कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे परिमाणी मुख्य कलाकारापासून ते ज्युनिअर कलाकार आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात कपात करावी लागणार असल्याचं बोललं जातंय. परंतु ‘सिन्टा’ आणि ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’नं याला विरोध दर्शवला आहे. यात निर्माते टीव्ही वाहिन्यांच्या बाजूनं असल्यामुळे सध्या ‘इम्पा’ आणि फेडरेशनमध्ये असलेले मतभेद समोर आले आहेत.

राज्य सरकारकडून चित्रीकरणाला मंजुरी मिळाल्यापासून चित्रीकरण सुरू करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. तीन महिन्यांपासून बंद असलेल्या टीव्ही इंडस्ट्रीने पुन्हा एकदा सेटवर पोहोचण्याची तयारी सध्या सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिल्मसिटीमध्ये शूटिंगला परवानगी दिल्यानंतर निर्माते २३ जूनपासून नव्या मार्गदर्शक सूचनांसह चित्रीकरणाला सुरुवात करणार आहेत. दरम्यान, टीव्ही वाहिन्यांनी आपल्या निर्मात्यांना त्यांच्या मालिकांचं बजेट कमी करण्यास सांगितलं आहे. याचा परिणाम म्हणून निर्माते कलाकारांसह संपूर्ण टीमच्या मानधनाला कात्री लावण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय. तथापि, ‘सिन्टा’ आणि ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ संघटनांनी या कपातीला विरोध दर्शवला आहे. अगोदरच कर्माचारी आणि छोटे कलाकार हे आर्थिक संकटात आहेत. त्यात जर त्यांना मानधन कमी मिळाल्यास ते योग्य ठरणार नाही; असं फेडरेशनचं म्हणणं आहे.

ओव्हरटाइमही नाही!

मानधन कपातीबाबत सिंटाचे सहसचिव अमित बहल सांगतात, ‘आमची मागणी स्पष्ट आहे की दरमहा सर्व कर्मचाऱ्यांना आणि कलाकारांना पैसे मिळायला हवेत. रोजगारावर कर्मचाऱ्यांना दिवसाचं मानधन मिळावं. आम्ही आठ तासांपेक्षा जास्त शूटिंग करणार नाही. आम्हाला योग्य विमा आणि मेडिक्लेम दिले जावेत. आम्ही कोणत्याही प्रकारच्या पगार कपातीसाठी तयार नाही. आम्ही यावर ठाम आहोत आणि या विषयावर फेडरेशन आमच्यासोबत आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्यानं वैयक्तिक पातळीवर कमी मानधनात काम केलं, तर तो त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. परंतु जर एखादा सदस्य आम्हाला सांगत असेल की त्याचा पगार जबरदस्तीनं कमी केला जात असेल तर सिन्टा आणि फेडरेशन एकत्रितपणे त्या संबंधित निर्मात्यावर कारवाई करेल.
शाहरुखने उडवली होती सुशांतची खिल्ली; व्हिडिओ व्हायरल
सीसीआयनं स्पष्टपणे सांगितले आहे की, निर्माते त्यांना हव्या असलेल्या कर्मचाऱ्यांसह काम करू शकतात. केवळ आपल्याच सदस्यांना काम मिळावं यासाठी फेडरेशन निर्मात्यांवर दबाव आणू शकत नाही. म्हणून फेडरेशनने त्यांची मनमानी थांबवावी. – टीपी अग्रवाल, अध्यक्ष, इम्पा

इम्पानं असं म्हटलं आहे की, मानधनात ३० टक्के कपात केली जाईल. परंतु कुणीही ते स्वीकारण्यास तयार नाही. त्यांच्या या मागणीला अर्थ नाही.

बी.एन. तिवारी, अध्यक्ष, एफडब्ल्यूआईसीई

टीव्ही अभिनेत्रीच्या आईसाठी देवदूत ठरला अक्षय कुमारSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pathardi leopard attack: Leopard Attack धक्कादायक: चिमुकला आईसोबत बसला होता; बिबट्याने झडप घातली अन्… – leopard attacks four year old boy in pathardi

नगर: आईजवळ बसलेल्या चार वर्षाच्या मुलाला बिबट्याने उचलून नेल्याची धक्कादायक घटना पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथे आज रात्री आठच्या सुमारास घडली आहे. सार्थक संजय...

Bharatpe Launches Digital Gold – आता अॅपवरून खरेदी करा सोने; ‘भारतपे’ने सादर केले ‘डिजिटल गोल्ड’

मुंबई : भारतातील सर्वात मोठी मर्चंट पेमेंट कंपनी भारतपे ने आज आपल्या प्लॅटफॉर्मवर 'डिजिटल गोल्ड' ची घोषणा केली. फिनटेक उत्पादनाच्या या नवीन कॅटेगरीचे...

Recent Comments