Home देश पैसा पैसा how to arrange money: करोनामुळे बंद झालं उत्पन्न; सहा मार्गातून मिळवा पैसे!...

how to arrange money: करोनामुळे बंद झालं उत्पन्न; सहा मार्गातून मिळवा पैसे! – during coronavirus time some ways to arrange money


करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटात जवळपास सर्वच कंपन्यांनी एक तर कर्मचारी कपात केली आहे किंवा त्यांचा पगार कमी केला आहे. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झालेत आणि कंपन्यांचे मोठे नुकसान झाले. या काळात अनेकांच्या उत्पन्नाचे मार्ग बंद झालेत. लोकांनी स्वत:हून खर्च कमी केला आहे. पण काही खर्च असे असतात जे गरजेचे असतात आणि त्यांना तुम्ही थांबवू शकत नाही. सरकराने लोकांना त्रास होऊ नये म्हणून कर्जाचे हप्ते आणि विमा हप्ते यांना मुदतवाढ दिली आहे असली आहे. यानंतर देखील जर पैशांची गरज असेल तर पुढील पर्यायांचा तुम्ही विचार करू शकता. एखाद्या आवश्यक कारणासाठी जर तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुम्ही पुढील ६ मार्गापैकी एकाची निवड करू शकता.

​पीएफ खाते

जर तुम्ही नोकरी करत असाल तर नक्कीच तुमचे भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF खाते असेल. तुमची तातडीची पैशांची गरज PF खात्यातून पूर्ण होऊ शकेल. खर तर PF खाते तुम्हाला सर्वाधिक व्याज देणारे ठिकाण असते. पण जर तुमच्यावर मोठे आर्थिक संकट असेल तर PF खात्यातून पैसे काढू शकता. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की पैशांची अधिक अडचण नसेल तर PFमधून पैसे काढू नका. PF खात्यातून जास्ती जास्त ७५ टक्के पैसे काढू शकता.

​मोदी सरकारची मदत…

maharashtra times

करोना लॉकडाऊनच्या काळात नोकरी गेली असेल आणि त्यामुळे उत्पन्नाचे साधन बंद झाले असेल तर तुम्ही एखादे छोटे-मोठे काम सुरू करू शकता. कारण आता बाजारपेठ सुरू झाली आहे. छोट्या-मोठ्या कामासाठी मोदी सरकारने दिलेल्या सुविधेचा वापर करू शकता. या सुविधेचा वापर करून तुम्हाला काही उद्योग सुरू करण्यासाठी १० हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. हे पैसे तुम्ही व्याजाने भरू शकता. एखादा छोटा उद्योग सुरू करून पैसे परत करू शकता. यासाठी कोणताही हमीची गरज नाही.

​मुद्रा लोन

maharashtra times

जर तुम्ही काही मोठे काम सुरू करण्याचा विचार करू शकत असाल तर मुद्रा लोन घेऊ शकता. यासाठी तुम्हाला १० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. हे कर्ज परत करण्याचा कालावधी तुम्ही ५ वर्षापर्यंत वाढवू शकता. पण तुम्ही जो व्यवसाय सुरू करणार आहात त्यातून भविष्यात जर पैसे मिळणार नसतील तर शक्यतो मुद्रा लोन घेऊ नका. कारण तुम्ही पुन्हा आर्थिक संकटात सपाडण्याचा धोका असतो.

​गोल्ड लोन

maharashtra times

आर्थिक अडचणीच्या काळात गोल्ड लोन हा एक चांगला पर्याय मानला जातो. भारतातील जवळपास प्रत्येक घरात थोड फार सोन असते. याचा वापर करून तुम्ही कर्ज घेऊ शकता. जेव्हा उत्पन्नाचे साधन पुन्हा सुरू होईल तेव्हा किंवा ऑफिस सुरू झाल्यानंतर गोल्ड लोनचे पैसे देऊन सोन परत मिळवू शकता. घरी सोन ठेवण्यापेक्षा तुमच्या अडचणीच्या काळात याचा उपयोग केलेला योग्य ठरतो. अनेक बँका तसेच इतर कंपन्या कमी व्याज दरात गोल्ड लोनची सुविधा देतात.

​शेतकरी असाल तर…

maharashtra times

असे अनेक शेतकरी आहेत ज्यांना त्यांच्या मालाला योग्य किमत मिळत नाही किंवा पिक खराब झाले आहे. करोना व्हायरसमुळे पॉल्ट्री फार्मवाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. जर तुम्ही शेतकरी असाल आणि पैशांची अडचण असेल तर किसान लोनच्या माध्यमातून गरज पूर्ण करू शकता. अर्थात तुमची गरज गोल्ड लोन किंवा पर्सनल लोनच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकतात. पण किसान लोनवर फक्त ४ टक्के व्याज आहे. इतके कमी व्याज कोणतेच बँक देत नाही.

​अखेरचा पर्याय…

maharashtra times

आर्थिक अडचण दूर करण्यासाठीचा अखेरचा पर्याय म्हणजे पर्सनल लोन होय. जर तुमचे क्रेडिट स्कोअर चांगले असेल आणि काही दिवसांनी नोकरी किंवा काम पुन्हा सुरू होणार असेल तर पर्सनल लोन घेऊ शकता. तुम्ही क्रेडिट कार्डवर देखील लोन घेऊ शकता किंवा बँकेकडून थेट घेण्याची सोय आहे. बँकेच्या तुलनेत क्रेडिट कार्डवर लोन लवकर आणि सहजपणे मिळते. अन्य पर्याय उपलब्ध नसल्यास याचा विचार करावा असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments