Home शहरं मुंबई Husain Dalwai on India-China Face Off: Husain Dalwai: सैनिकांच्या हातात काठ्या? देशाची...

Husain Dalwai on India-China Face Off: Husain Dalwai: सैनिकांच्या हातात काठ्या? देशाची सीमा म्हणजे RSS ची शाखा आहे का?’ – why send soldiers with just sticks? is this rss shakha? , questions congress mp husain dalwai


मुंबई: ‘चीन विरुद्धच्या संघर्षात भारताचे २० जवान मारले गेले आहेत. चीनचा एकही सैनिक मारला गेला नाही. कारण, आपल्या जवानांकडं फक्त काठ्या होत्या. हे सरकारच्या परराष्ट्र धोरणाचं अपयश आहे. काठ्या हातात देऊन सैनिकांना सीमेवर पाठवायला सीमा म्हणजे काही आरएसएसची शाखा आहे का,’ असा खरमरीत सवाल काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी मोदी सरकारला केला आहे. (Congress MP Husain Dalwai attacks modi sarkar)

नेहरूंना दोष देणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; शिवसेनेचा हल्लाबोल

भारत-चीनमधील संघर्षांत २० भारतीय जवान शहीद झाल्यामुळं देशात प्रचंड रोष आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या घटनेवरून सरकारला घेरले आहे. अन्य विरोधी पक्षांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत. या घडामोडींनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. या पार्श्वभूमीवर ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना हुसेन दलवाई यांनी केंद्र सरकारवर जोरदार तोफ डागली. ‘पंतप्रधान मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली हे चांगलेच झाले. ते आधीच व्हायला हवे होते. पण उशिरा का होईना त्यांनी योग्य निर्णय घेतला आहे. गलवान खोऱ्यात नेमकं काय घडलं? चिनी सैनिकांनी किती घुसखोरी केली आहे याची माहिती मिळायला हवी. या प्रकरणी देशाला विश्वासात घेणं आवश्यक आहे. गलवानमध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाली आहे. चिनी सैनिक बरेच आतमध्ये घुसले आहेत,’ असा दावा दलवाई यांनी केला.

‘आपले जवान विनाशस्त्र गेले होते. पण चीनच्या जवानांकडे असलेल्या काठ्यांना खिळे लावलेले होते. त्यांचा एकही जवान मारला गेलेला नाही. आपलेच जवान शहीद झाले आहेत. आमच्या परराष्ट्र धोरणाचा हा दोष आहे. आमच्या सैनिकांना आम्ही विनाशस्त्र पाठवलेच कसे? ते लढले असते आणि काही अनुचित घडलं असतं तर ते समजण्यासारखं होतं. पण तशी संधीच त्यांना मिळाली नाही. लाठी घेऊन तुम्ही सैनिकांना सीमेवर पाठवता? तिथं काय आरएसएसची शाखा आहे का? आणि तुम्हाला तसं वाटत असेल तर सैनिकांऐवजी आरएसएसच्या लोकांनाच सीमेवर पाठवा. ते सीमेचं रक्षण करतील,’ असा संतापही दलवाई यांनी व्यक्त केला.

वाचा: …म्हणून मी मुख्यमंत्री झालो; उद्धव ठाकरेंनी उलगडले गुपितSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

coronavirus in pune latest news: Coronavirus In Pune: पुण्यात पुन्हा निर्बंध लावायचे की नाहीत?; अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष – ajit pawar will take final...

हायलाइट्स:करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यात निर्बंध लावणार?विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होणार महत्त्वाची बैठक.आढावा बैठकीतील तपशील घेतल्यावर अजित पवार देणार अंतिम निर्णय.पुणे: करोना संसर्गाचा...

Recent Comments