Home देश husband demands sex frequently : 'पती आंघोळ करत नाही, सेक्ससाठी आणतो दबाव'...

husband demands sex frequently : ‘पती आंघोळ करत नाही, सेक्ससाठी आणतो दबाव’ – bengaluru woman seeks police help as her hubby stops bathing and demands sex frequently


बेंगळुरू: लॉकडाउनच्या काळात देशात घरगुती हिंसाचाराच्या घटना घडताना दिसत असून अशीच एक घटना कर्नाटकातील बेंगळुरू येथे घडली आहे. आपला पती लॉकडाउन सुरू झाल्यापासून आंघोळी करत नसून सतत शरीरसंबंधांसाठी दबाव आणतो अशी तक्रार एका महिलेने पोलिसात केली आहे. या महिलेला दोन मुलेही आहेत.

अशा प्रकारचे अनेक तक्रारी हेल्पलाइद्वारे बेंगळुरू पोलिसांना प्राप्त झाल्याचे पोलिसांनी सांगितले. लॉकडाउनमुळे घरातच राहिल्याने घरगुती भांडणांमध्येही वाढ झाली असून अनेक महिलांना मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे जावे लागत आहे. अशा प्रकारच्या समस्या या बेंगळुरूपर्यंतच मर्यादित नसून कर्नाटक आणि भारतातील इतर शहरांमध्येही अशा घटना घडल्याचे उघड झाले आहे. केवळ भारतातीलच नाही, तरऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि अमेरिकेतील समुपदेशक आणि मानसिक आरोग्य क्षेत्रातील संस्था अशा प्रकारच्या घटनांबाबत चिंता व्यक्त करू लागल्या आहेत.

बेंगळुरूतील प्रकरणातील फोन हा जयानगरमधून आल्याचे पोलिस सांगतात. महिलने तक्रार करताना सांगितले की, तोटा झाल्यानंतर आपल्या नवऱ्याने किराणा मालाचे दुकान बंद केल्याचे ३१ वर्षीय तक्रारदार महिलेने पोलिसांना सांगितले. त्यानंतर देशात लॉकडाउन सुरू झाले आणि आपल्या पतीने हळूहळू आंघोळी करणेच सोडून दिले.

महिलेने पोलिसांना माहिती देताना सांगितले की जेव्हा एखादा साथीचा आजार पसरतो तेव्हा व्यक्तिगत स्वच्छता राखणे किती गरजेचे असते याची आठवण ती तिच्या पतीला करून देत असे, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. तो सतत शरीरसुखाची मागणी करत असे, आणि जेव्हा ती नकार देई तेव्हा तो तिला मारहाण करत असे. इतकेच नाही, तर त्यांच्या ९ वर्षीय मुलीनेही आंघोळी न करण्याचे वडिलांचे अनुकरण करणे सुरू केले.

केरळमध्ये उघडणार रेस्टॉरंट, कारसाठी ऑड-ईव्हन

या तक्रारीनंतर समुपदेशक बी. एस. सरस्वती यांनीही तक्रारदार महिलेच्या पतीला समजावण्याचा प्रयत्न केला. याबरोबरच बनसवाडी परिसरातही आणखी एक अत्याचाराचे प्रकरण घडले आहे. या प्रकरणात पत्नी चिकन बिर्याणी बनवून देत नाही म्हणून पतीने तिला मारहाण करून घराबाहेर काढल्याचा आरोप पतीवर करण्यात आला आहे. आपल्यावर कामाचा अधिकचा ताण आला असून साधेच जेवण बनवणार असल्याचे पत्नीने पतीला वारंवार सांगितले. मात्र, पतीने तिचे काहीही न ऐकता मारहाण केली.

करोना Live: दिल्लीत चिमुकल्या बाळास करोना

करोना झाल्याच्या संशयावरून तरुणाची आत्महत्या

लॉकडाउन: माहेरी न नेल्याने पत्नीची आत्महत्या

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

nanded govt officers horse latest news: ‘या’ अधिकाऱ्याला घोड्यावरून ऑफिसला यायचंय!; विनंती पत्र झालं व्हायरल – official seeks nod to tie horse on campus...

हायलाइट्स:नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्याचं पत्र चर्चेत.कार्यालयाच्या आवारात घोडा बांधण्यासाठी मागितली परवानगी.अजब पत्राने जिल्हाधिकारी विपिन इटनकर पडले बुचकळ्यातनांदेड:नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना विभागात...

PM Modi: पेट्रोल पंपांवरील PM मोदींचे फोटो असलेले होर्डिंग हटवा, निवडणूक आयोगाचे निर्देश – west bengal election 2021 election commission ordesr petrol pumps to...

कोलकाताः पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका ( west bengal election 2021 ) होत आहेत. राज्यात आचरसंहिता लागू आहे. आता निवडणूक आयोगाने ( election commission...

Recent Comments