Home आपलं जग करियर icse exams 2020: आयसीएई बोर्डाच्याही दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द - icse board...

icse exams 2020: आयसीएई बोर्डाच्याही दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द – icse board scrap 10th 12th exams, board will file affidavit on friday 26th june


आयसीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. सीबीएसई म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा रद्द करत असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाला कळवल्यानंतर आयसीएसई बोर्डाने देखील आपला निर्णय सर्वोच्च न्यायालयाला कळवला. मूल्यांकन, श्रेणीसुधार यासंदर्भात अधिक सुस्पष्टता आणणारे प्रतिज्ञापत्र दोन्ही बोर्डांतर्फे शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केले जाणार आहे. न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर गुरुवारी ही सुनावणी झाली.

आयसीएसईची दहावीची उर्वरित विषयांची परीक्षा २ ते १२ जुलै, तर बारावीची १ ते १४ जुलैदरम्यान होणार होती. त्याला मुंबईतील वकील अॅड. अरविंद तिवारी यांनी जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले होते, अनेक पालकांनी हस्तक्षेप अर्जाद्वारे याचिकेचे समर्थन केले होते. काही पालकांनी परीक्षा घेण्यासाठी अर्ज केले होते. दरम्यान सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांसंदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्यामुळी आयसीएसई बोर्डाने गुरुवारी आपली याचिकाही सर्वोच्च न्यायालायकडे वर्ग करण्याची विनंती केली होती. त्यानुसार दोन्ही बोर्डांच्या परीक्षांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. प्रतिज्ञापत्र दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी अंतिम आदेश देईल.

हेही वाचा: देशभरात पदवी परीक्षा होणार रद्द? लवकरच निर्णयाची शक्यता

सीबीएसई, आयसीएसईकडून शुक्रवारी प्रतिज्ञापत्र

जुलैमधील नियोजित परीक्षा रद्द करण्यात येत असून करोनाचे संकट निवळल्यानंतर परीक्षा ऐच्छिक ठेवली जाईल, असे स्पष्ट करणारी प्रारुप अधिसूचना केंद्र सरकार व सीबीएसईतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केली. मात्र, नंतर होणाऱ्या परीक्षेचा पर्याय कोणासाठी असेल, विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टी विचारात घेऊन पर्याय निवडीचा निर्णय घ्यायचा, परीक्षा न देण्याचा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांसाठी पर्यायी गुणांकनाची पद्धत नेमकी कशी असेल, नंतरच्या परीक्षेचा निर्णय करोनाची राज्यनिहाय स्थिती की देश पातळीवरील स्थिती लक्षात घेऊन घेणार, इत्यादीविषयी सुस्पष्टता नसल्याने यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल करावे, असे निर्देश न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दिले. त्यानुसार, उद्या प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची हमी मेहता यांनी दिली.

हेही वाचा:सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या प्रलंबित परीक्षा रद्द

सीबीएसई बोर्डाप्रमाणेच आम्हीही परीक्षा रद्द करत आहोत आणि त्या बोर्डाच्या पर्यायी गुणांकन पद्धतीचा विचार करून आम्हीही निर्णय घेऊ, यासंदर्भात उद्या प्रतिज्ञापत्र दाखल करू, असे आयसीएसई बोर्डाने स्पष्ट केले. त्यानुसार, आता शुक्रवारच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाकडून होणाऱ्या आदेशाने चित्र स्पष्ट होईल.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

konkan vidarbha gramin bank: बँक लुटण्यासाठी अर्ध्या रात्री खिडकीतून आत घुसले, अचानक सायरन वाजला अन्… – robber tried to rob vidarbha konkan gramin bank...

हायलाइट्स:विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेत चोरीचा प्रयत्नभंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील घटनासंपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्हीत कैदभंडारा: विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेत चोरीचा प्रयत्न झाला....

Batla House encounter: बाटला हाऊस एन्काऊन्टर : १३ वर्षानंतर निर्णय, आरोपी आरिज खान दोषी सिद्ध – delhi court held guilty and convicted ariz khan...

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या बाटला हाऊस एन्काऊन्टर प्रकरणात आज दिल्ली न्यायालयानं आरिज खान याला दोषी करार दिलंय. आरिज खान याची शिक्षा १५...

syria landmine blast: Syria attack सीरियात भीषण भूसुरुंग स्फोट; १८ ठार, तीनजण जखमी – landmine blast in syria 18 killed three people badly injured

दमिश्क: सीरियातील केंद्रीय हामा प्रातांत झालेल्या भूसुरुंग स्फोटातील दोन घटनांमध्ये कमीत कमी १८ जण ठार झाले असून तीनजण जखमी झाले आहेत. सलामियाह क्षेत्रात...

Recent Comments