Home आपलं जग करियर IGNOU: इग्नू्च्या असाइनमेंट आणि अर्जांना पुन्हा मुदतवाढ - ignou tee june 2020...

IGNOU: इग्नू्च्या असाइनमेंट आणि अर्जांना पुन्हा मुदतवाढ – ignou tee june 2020 exam form and assignment submission date extended till july 15


IGNOU: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने जून २०२० टर्म एंड परीक्षेसाठी अर्ज भरण्याची, असाइनमेंट, प्रोजेक्ट आणि इंटर्नशीप रिपोर्ट वगैरे जमा करण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. जून २०२० टर्म एंड परीक्षेचे अर्ज आता १५ जुलै पर्यंत भरता येणार आहेत. असाइनमेंट, प्रोजेक्ट तसेच इंटर्नशीप आदी जमा करण्याची अंतिम मुदत देखील १५ जुलै २०२० आहे.

यापूर्वी अर्ज आणि प्रकल्प, असाइनमेंट जमा करण्याची अखेरची मुदत ३० जून होती. IGNOU ने म्हटलं आहे की, ‘परीक्षा अर्ज, असाइनमेंट, प्रकल्प, इंटर्नशीप आदि जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांना समस्या होत होत्या; त्या पार्श्वभूमीवर या सर्व गोष्टी सादर करण्यासाठी १५ जुलै २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.’

इग्नूने यापूर्वीही अनेकदा असाइनमेंट जमा करण्याची मुदत वाढवली आहे. कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर यापूर्वीही विद्यार्थ्यांना मुदतवाढ मिळाली आहे.

रद्द होणार जेईई मेन, नीट परीक्षा? काय म्हणाले मंत्री वाचा…

कशी करायची असाइनमेंट जमा…

इग्नूने विद्यार्थ्यांना सांगितलं आहे की असाइनमेंट साध्या कागदावर हाती लिहून स्कॅन करा. मोबाइलच्या कॅम स्कॅनर अॅपच्या मदतीने असाइनमेंटची स्कॅन्ड इमेज घ्या. आता ती स्कॅन्ड कॉपी आपल्या संबंधित रिजनल सेंटरद्वारे दिलेल्या ई-मेल वर पाठवायची आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Gaya: अनैतिक संबंधांत अडथळा ठरत होता पती, हैवान पत्नीने त्याची… – bihar wife killes husband over illicit affair

गया: बिहारच्या गया येथे एका महिलेने अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या पतीची निर्घृण हत्या केली. मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. महिलेने माहेरच्यांच्या...

अन् अपघाताने बालविवाहाचे पितळ उघडे

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक लॉकडाउन काळात विवाह सोहळ्याचे आयोजन हे आर्थिक दृष्टिकोनातून वधू पक्षासाठी लाभदायी ठरले. कमीत कमी खर्च आणि नातेवाइकांच्या उपस्थितीत विवाह...

Recent Comments