‘आम्ही विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने शिकवतो, त्या पद्धतीत कोविड -१९ विषाणूमुळे आलेल्या महामारीच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर आम्हाला पुनर्विचार करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षात विलंब होऊ नये म्हणून आम्ही ऑनलाइन वर्ग सुरू करणार आहोत आणि विद्यार्थ्यांना तसं कळवण्यात येईल,’ अशी फेसबुक पोस्ट चौधरी यांनी बुधवारी रात्री लिहिली आहे.
संस्थेच्या ६२ वर्षांच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडणार आहे की विद्यार्थ्यांचं नवं शैक्षणिक वर्ष कॅम्पसशिवाय सुरू होणार आहे. इतर आयआयटी देखील आयआयटी मुंबईचा कित्ता गिरवण्याची शक्यता आहे.
देशभरात पदवी परीक्षा होणार रद्द? लवकरच निर्णयाची शक्यता
आयआयटी मुंबईतील अनेक विद्यार्थी आर्थिक वंचित घटकातून येतात. त्यांच्यासाठी निधी देऊन डिजीटल गॅप कमी करण्याचे आवाहनही संचालकांनी केले होते. यासाठी संस्थेला अशा विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी लॅपटॉप, इंटरनेट डेटा प्लान देण्यासाठी निधी उभारण्यात आला आहे.
मेडिकल परीक्षांचे अंतिम वेळापत्रक लवकरच
‘केवळ पैशांअभावी शिक्षणापासून मुकण्याची वेळ एकाही विद्यार्थ्यावर येऊ नये असे आम्हाला वाटते. आम्हाला अशा विद्यार्थ्यांसाठी सुमारे ५ कोटी रुपयांच्या मदतीची आवश्यकता आहे. आमचे माजी विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने हातभार लावत आहेत. पण तेवढी मदत पुरेशी नाही,’ असं चौधरी यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे.