Home आपलं जग करियर iit mumbai students: GPS होणार आणखी स्मार्ट; IIT च्या विद्यार्थ्यांनी बनवली चिप...

iit mumbai students: GPS होणार आणखी स्मार्ट; IIT च्या विद्यार्थ्यांनी बनवली चिप – iit mumbai students made indian made chip dhruv for smart navigation


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना आपण सर्रास जीपीएसचा वापर करत असतो. यामध्ये आता अधिक अचूकता येणार आहे, कारण आयआयटी मुंबईतील (IIT Mumbai) विद्यार्थ्यांनी ‘ध्रुव’ (dhruv) नावाची एक चिप तयार केली आहे. याच्या माध्यमातून अधिक अचूक दिशा दाखविली जाणार असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

आयआयटीच्या संशोधकांनी एक चिप तयार केली आहे. ही चिप मोबाइल किंवा ज्या उपकरणात दिशादर्शकाचा वापर करायचा आहे तेथे बसविली जाऊ शकते. या चिपच्या माध्यमातून अचूक नेव्हिगेशन मिळू शकते. ही चिप पूर्णत: भारतीय बनावटीची असून याची जोडणी भारताचा नेव्हिगेशन उपग्रह ‘नाविक’ याच्याशी करण्यात आली आहे. यामुळे ही सेवा पूर्णत: भारतीय असणार आहे. सध्या आपण जी सेवा वापरतो त्यात परदेशातील विविध उपग्रहांची मदत घेत असतो. यामुळे या चिपचा वापर झाला, तर ही सेवा पूर्णत: भारतीय असणार आहे. जगातील अनेक प्रगत देशांनी नेव्हिगेशनसाठी स्वत:चा उपग्रह अवकाशात सोडला आहे. याची उणीव आपल्याला १९९९मध्ये झालेल्या कारगिल युद्धादरम्यान जाणवली. यानंतर भारतीय अंतराळ संस्थेने जीपीएस यंत्रणा अधिक सक्षम करण्यात आपला स्वत:चा उपग्रह तयार करण्यास सुरुवात केली आणि नाविक हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. यानंतर याचा वापर सुरू झाला. मात्र, अंतराळात ३६ हजार किमी लांब असलेल्या या उपग्रहातून सिग्नल मिळण्यास अनेक अडचणी येत होत्या. या अडचणी आयआयटीच्या ध्रुव या चिपने दूर केल्या आहेत. याद्वारे अचूक लोकेशन कळण्यास मदत होते.

‘ध्रुव’ वर काम करणारे आयआयटीयन्स

मलाला सेलिब्रेशन मूडमध्ये! मिळवली ऑक्सफर्ड डिग्री

जीपीएसमध्ये मोलाचे योगदान

आयआयटीमध्ये पीएचडी आणि एमटेक करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या टीमने त्यांचा संशोधन प्रकल्प म्हणून ही चिप तयार केली आहे. लॉकडाउनच्या आधी या चिपच्या सर्व स्तरावरील चाचण्याही पूर्ण झाल्या आहेत. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयाने, तसेच आयआयटीमधील ‘समीर’ या संशोधन संस्थेने या प्रकल्पाला निधी दिला आहे. ही चिप भारतीय जीपीएस क्षेत्रात मोलाचे योगदान देईल, असा विश्वास प्राध्यापक राजेश झेले यांनी व्यक्त केला आहे.

maharashtra timesSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

coronavirus in Nashik: coronavirus – ४७७ रुग्ण बरे, ४१९ जणांची भर – nashik reported 491 new corona cases and 4 deaths in yesterday

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिककरोना रुग्णवाढीमध्ये मिळणारा दिलासा कायम असून, जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात ४७७ रुग्ण बरे झाले, तर ४१९ नव्या रुग्णांची भर पडली....

Pune Atal Bus Service: पुणेकरांसाठी खूषखबर! पाच किलोमीटरचा प्रवास आता फक्त ५ रुपयांत – bjp leader chandrakant patil inaugurates atal bus service in pune

पुणे: 'पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या 'अटल' बस सेवेला आज सुरुवात झाली. या अंतर्गत पुणेकरांना पाच किलोमीटरपर्यंतचा प्रवास अवघ्या ५ रुपयांत करता येणार आहे....

cm uddhav thackeray: शेतकऱ्यांसाठी हवेत २४०० कोटी – marathwada farmers needs 2400 crore from package cm uddhav thackeray declared yesterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादपावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दहा हजार कोटी रुपयांचे 'पॅकेज' जाहीर केले असून, त्यातून मराठवाड्यासाठी २४०० कोटी रुपये...

Recent Comments