Home महाराष्ट्र illegal liquor scam: पर्दाफाश! गोव्याहून दारू आणून 'ते' स्कॉचच्या बाटल्यांमधून विकायचे -...

illegal liquor scam: पर्दाफाश! गोव्याहून दारू आणून ‘ते’ स्कॉचच्या बाटल्यांमधून विकायचे – illegal liquor scam excise department busts fake scotch racket in thane navi mumbai


म. टा. प्रतिनिधी, ठाणे: गोवा येथून हलक्या प्रतीचे मद्य आणून हे मद्य स्कॉचच्या बाटल्यांमध्ये भरून जादा किंमतीत विकणाऱ्या रॅकेटचा उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी नवी मुंबईतील नेरूळ येथून मद्यसाठा असलेल्या कारसह एकाला ताब्यात घेतल्यानंतर ज्या ठिकाणी हा गैरप्रकार सुरू होता, त्या सानपाड्यातील सेक्टर १ येथील गोदामावर पथकाने छापा टाकला. या कारवाईत विदेशी मद्याच्या ५९६ सिलबंद बाटल्यांसह बनावट स्कॉचच्या ९३ बाटल्या, तसेच बनावट लेबल आणि कार असा सुमारे १४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कमी मेहनतीत झटपट श्रीमंत होण्यासाठी आरोपी मद्यप्रेमींच्या जीवाशी खेळत होते, अशी माहिती भरारी पथकाचे निरीक्षक संताजी लाड यांनी दिली.

नेरूळमधील सेक्टर ६ मध्ये बनावट स्कॉच या विदेशी मद्याची विक्री होणार असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली होती. उत्पादन शुल्कचे आयुक्त कांतीलाल उमाप यांचे आदेश आणि संचालक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संताजी लाड, दिपक परब यांच्या पथकाने सापळा रचून कारमधून ५४ सिलबंद बाटल्यांसह एकूण ६ लाख ७८ हजार ९० रुपायांचा मुद्देमाल जप्त केला.

यावेळी अटक केलेल्या आरोपींकडे चौकशी केल्यानंतर धक्कादायक बाब पुढे आली. सानपाडा येथील सेक्टर १ मध्ये सोसायटीमध्ये असलेल्या गोदामात हलक्या प्रतीच्या परराज्यातील विदेशी मद्यापासून उच्च प्रतीची बनावट स्कॉच तयार करण्याचा व्यवसाय केला जात होता. या माहितीनंतर तात्काळ पथकाने याठिकाणी छापा टाकत विविध ब्रँडचे लेबल्स, रिकाम्या बाटल्या, ड्रायर मशीन, बुच, मद्यसाठा जप्त केला. येथून जप्त केलेल्या मुद्देमालाची किमंत ७ लाख २४ हजार आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून शिबीन दिनेश तियर याला अटक करण्यात आल्याची माहिती निरीक्षक संताजी लाड यांनी दिली. आरोपीला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अन्य एक आरोपी फरारी असून त्याचा शोध सुरू आहे. मागील एक वर्षापासून हा व्यवसाय सुरू असल्याचे लाड यांनी सांगितले. कमी श्रमात झटपट श्रीमंत होण्यासाठी आणि केवळ नफा मिळवण्याच्या उद्देशाने आरोपी मद्यसेवन करणाऱ्या लोकांच्या जीवाशी खेळत होते, असेही लाड यांचे म्हणणे आहे.

ठाण्यातील ‘त्या’ हत्येचे गुजरात कनेक्शन; २० वर्षांनंतर…

पहाटेची वेळ, अख्खं कुटुंब साखरझोपेत होतं; त्याचवेळी घडलं भयानक हत्याकांड

नगरमध्ये गोदामावर छापा; घबाड पाहून पोलीसही चक्रावले, रात्री उशिरापर्यंत मोजणी

सासरच्यांकडून छळ; मायलेकीची अंबाझरी तलावात उडी मारून आत्महत्याSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

काँग्रेसला निवडणुकीचे वेध

म. टा. खास प्रतिनिधी, जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर, जिल्हा काँग्रेसही निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. महाविकास आघाडीच्या निर्णयाबाबत निश्चित नसले...

Balasaheb Vikhe Patil: बाळासाहेब विखे पाटील भाजपमध्ये गेले का गेले नाहीत? – why balasaheb vikhe patil not joined bjp then?

अहमदनगर: काँग्रेसमध्ये घुसमट होत होती म्हणून शिवसेनेत प्रवेश केला. तेथे केंद्रीय मंत्रिपद मिळाले. मात्र शिवसेनेने अचानक अपमानजनक पद्धतीने मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला सांगितला. तिकडे...

Recent Comments