Home देश in war you do not make soldiers unhappy: युद्धात सैनिकांना नाराज करता...

in war you do not make soldiers unhappy: युद्धात सैनिकांना नाराज करता येत नाही; सुप्रीम कोर्ट कडाडले – in war you do not make soldiers unhappy says supreme court on non payment of salaries to doctors


नवी दिल्ली: कोविड -१९ या जीवघेण्या साथीच्या आजाराशी सैनिकाप्रमाणे लढा देणाऱ्या डॉक्टरांना पगार न देण्याबाबत आणि त्यांची राहण्याची योग्य व्यवस्था नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी कठोर भूमिका घेतली आहे. युद्धाच्या वेळी ‘सैनिकांना’ त्रास देऊ नये असे कोर्टाने स्पष्टपणे म्हटले आहे. थोडे पुढे या आणि त्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी काही अतिरिक्त पैशांची व्यवस्था करा, असे स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावरील सुनावणीदरम्यान दिले आहेत.

कोर्टाने सांगितले, ‘अशा बातम्या ऐकायला मिळत आहेत’

आरोग्य कर्मचाऱ्यांचा पगार न देण्याबाबतच्या प्रकरणांमध्ये न्यायालयांना सहभागी करून घेणे योग्य नसून सरकारनेच तो महत्त्वाचा प्रश्न सोडविला पाहिजे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एम. आर. शाह यांच्या खंडपीठाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे डॉक्टरांच्या अडचणींबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी करताना ही टीप्पणी केली आहे. देशातील बर्‍याच भागांमध्ये डॉक्टरांना पगार दिला जात नसल्याच्या बातम्या येत आहेत, हे देखील कोर्टाने म्हटले आहे.

वाचा- करोना Live: रुग्णालयांमध्ये मृतदेहांची योग्य देखभाल नाही- सुप्रीम कोर्ट

डॉक्टरांच्या याचिकेवर सुनावणी

खंडपीठाने म्हटले आहे की, डॉक्टर संपावर असल्याच्या बातम्या आम्ही वाचलेल्या आहेत. दिल्लीतील काही डॉक्टरांना गेल्या तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. याची दखल घेतली गेली पाहिजे होती. यासाठी कोर्टाच्या हस्तक्षेपाची गरज भासण्याची आवश्यकता नव्हती. कोर्ट यासंदर्भात डॉक्टरांच्या याचिकेवर सुनावणी करीत होते. कोविड -१९ विरुद्धच्या लढाईत पहिल्या रांगेत लढणाऱ्या योद्धांना पगार दिला जात नाही, किंवा तो देण्यात विलंब लावण्यात येत आहे, असा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.

‘युद्धात तुम्ही सैनिकांना नाराज करू शकत नाही’

युद्धात तुम्ही सैनिकांना नाराज करू शकत नाही. त्यांच्या तक्रारींचे, समस्यांचे निराकरण करण्यासाठी थोडेसे पुढे या आणि काही अतिरिक्त पैशांचा बंदोबस्त करा, असे कोर्ट म्हणाले. करोना सारख्या साथीच्या रोगाविरूद्धच्या या युद्धामध्ये सैनिकांची नाराजी देश सहन करू शकत नाही, असेही कोर्टाने म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, आणखी काही चांगल्या सूचना मिळाल्यास त्यांचा समावेश करण्यात येईल. आपल्याला आणखी काम करावे लागेल, असे खंडपीठाने म्हटले आहे. डॉक्टरांच्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आता या प्रकरणावर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Raza Academy: रजा अकादमीवर बंदीची मागणी – bjp mla atul bhatkhalkar demands ban on raza academy over spreading communal tension

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबईतील भेंडीबाजार येथे फ्रान्सच्या पंतप्रधानांचे फोटो रस्त्यांवर लावून निदर्शने करणाऱ्या रजा अकादमीचे हे कृत्य देशद्रोही आहे. दहशतवादाविरोधात बोलणाऱ्या व्यक्तीचा...

आजचं राशीभविष्य… दिनांक ३१ ऑक्टोबर २०२०

आजचं राशीभविष्य... दिनांक ३१ ऑक्टोबर २०२० Source link

Recent Comments