Home देश पैसा पैसा income tax raid on sangamner tobacco group: बेहिशेबी संपत्तीचा पर्दाफाश; 'त्या' प्रसिद्ध...

income tax raid on sangamner tobacco group: बेहिशेबी संपत्तीचा पर्दाफाश; ‘त्या’ प्रसिद्ध तंबाखू उत्पादक समूहावर ‘प्राप्तिकर’चे छापे – income tax department raids on sangamner tobacco group after found 335 crore rupees black money


हायलाइट्स:

  • संगमनेरमधील प्रसिद्ध तंबाखू उत्पादक समूहावर प्राप्तिकर विभागाचे छापे
  • या धाडींमध्ये एकूण एक कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त
  • २४३ कोटी रुपयांच्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखीने

वृत्तसंस्था, नवी दिल्ली/ म. टा. प्रतिनिधी, पुणे : प्राप्तिकर विभागाने नगर जिल्ह्यातील संगमनेरमधील प्रसिद्ध तंबाखू उत्पादक समूहावर टाकलेल्या धाडीतून ३३५ कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती उघड झाली आहे. या समूहाच्या राज्यातील ३४ ठिकाणांवर १७ फेब्रुवारीपासून टाकलेल्या धाडींमधून ही संपत्ती उघडकीस आल्याचे प्राप्तिकर विभागातर्फे सांगण्यात आले.

या धाडींमध्ये एकूण एक कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली. तर स्थावर मालमत्तेच्या विक्रीतून झालेल्या नऊ कोटी रुपयांच्या नफ्याची नोंद केली नसल्याचे संबंधित व्यावसायिकाने मान्य केले आहे, असेही केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी)च्या प्रसिद्धिपत्रकात नमूद आहे.

पेट्रोल-डिझेल महागले ; दोन दिवस विश्रांतीनंतर आज पुन्हा इंधन दरवाढीचा भडका
हा समूह संगमनेर तालुक्यातील असून प्रामुख्याने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीत कार्यरत आहे. त्याचबरोबर ऊर्जानिर्मिती व वितरण, ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्री, बांधकाम आदी क्षेत्रातही या समूहाने विस्तार केला असल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे.

पुन्हा लॉकडाउनचे संकट ; दोन दिवसात सोनं ७५० रुपयांनी महागले , जाणून घ्या आजचा दर
काही हस्तलिखित नोंदी व एक्सेल शीट्सच्या माध्यमातून २४३ कोटी रुपयांच्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखीने, कोणताही व्यवहार न दाखवता करण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्याचबरोबर तंबाखूची विक्री करणाऱ्या काही वितरकांवर करण्यात आलेल्या कारवाईतून आणखी ४० कोटी रुपयांचे बेनामी व्यवहार पुढे आले आहेत. तसेच बांधकामाशी संबंधित व्यवहारांसाठी हा समूह नोंदणी मूल्यापेक्षा अधिक रक्कम देत तसेच स्वीकारत असल्याचेही निष्पन्न झाले असून ही रक्कम सुमारे १८ कोटींच्या घरात आहे. जमीन अथवा इमारतीच्या विक्रीवरील भांडवली नफ्यासंदर्भातील तरतुदींचे उल्लंघन केल्याचेही समोर आले असून, ही रक्कम २३ कोटी रुपये असल्याचेही या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.

मध्य प्रदेशातही कारवाई
प्राप्तिकर खात्याने मध्य प्रदेशातील सोया उद्योग समूहाच्या आस्थापनांवरही छापे टाकून ४५० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आणली आहे. या समूहाच्या बेतूल, सतना (मध्य प्रदेश), मुंबई, सोलापूर (महाराष्ट्र) आणि कोलकाता (प. बंगाल) येथील आस्थापनांवर १८ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत ही कारवाई करण्यात आली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

raj thackeray: तर माझा पक्ष संपूर्ण सहकार्य करायला तयार; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र – raj thackeray open letter to cm uddhav thackeray over nanar...

हायलाइट्स:राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंना पत्रनाणार रिफायनरी प्रकल्पावरुन राज ठाकरेंनी लिहलं पत्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली मागणीमुंबईः रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात नाणार येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी...

nashik sahitya sammelan postponed: nashik sahitya sammelan : नाशिकच्या साहित्य संमेलनाला स्थगिती, मे अखेर होणार संमेलन – nashik akhil bhartiya sahitya sammelan postponed

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकः नाशिकमध्ये २६ ते २८ मार्च दरम्यान होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोविडच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्याचा निर्णय अखिल...

'करोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर'

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद शहरात संसर्गाची स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे, अशी कबुली महापालिकेचे प्रशासक यांनी दिली आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे लॉकडाउनशिवाय...

Recent Comments