Home ताज्या बातम्या IND vs AUS : कोरोनाच्या संकटातही टीम इंडियाच्या खेळाडूंना मिळालं 'स्वातंत्र्य' |...

IND vs AUS : कोरोनाच्या संकटातही टीम इंडियाच्या खेळाडूंना मिळालं ‘स्वातंत्र्य’ | News


आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय टीमचे खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना झाले. ऑस्ट्रेलियाला रवाना होताच खेळाडू 14 दिवसांसाठी क्वारंटाईन झाले.

सिडनी, 26 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय टीमचे खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना झाले. ऑस्ट्रेलियाला रवाना होताच खेळाडू 14 दिवसांसाठी क्वारंटाईन झाले. क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर आता टीम इंडियाचे खेळाडू जैविक सुरक्षेत एकत्र आले. भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात शुक्रवारी पहिली वनडे मॅच होणार आहे. कोरोना व्हायरसमुळे सिडनीमधल्या या पहिल्या मॅचमध्ये मर्यादित प्रेक्षक असतील.

क्वारंटाईन कालावधीमध्ये भारतीय टीम सिडनीच्या ऑलम्पिक पार्कच्या पूलमॅनमध्ये राहिली होती. याठिकाणी खेळाडू फक्त ट्रेनिंगसाठी एकमेकांसमोर येत होतं. तसंच खेळाडूंना एकमेकांना भेटण्याचीही परवानगी नव्हती. खेळाडूंची ये जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बसचा वापर करण्यात आला.

टीम इंडियाचं हॉटेलही बदललं

दोन आठवड्यांचा क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर भारतीय टीमचं हॉटेलही बदललं आहे. भारतीय खेळाडू आता इंटर कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये गेले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या मागच्या दौऱ्यातही टीम इंडिया याच हॉटेलमध्ये राहिली होती.

जैविक सुरक्षेमध्ये आल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना थोडं स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. त्यामुळे खेळाडू आता काही काळ एकमेकांना भेटू शकतात आणि एकत्र जेवण करू शकतात. आयपीएलदरम्यान तीन महिने जैविक सुरक्षेमध्ये राहिल्यानंतर पुन्हा ऑस्ट्रेलियात क्वारंटाईन होणं, खेळाडूंसाठी आव्हान होतं.

खोलीत एकटं राहणं आव्हानात्मक

केएल राहुल यानेही हा कालावधी आव्हानात्मक असल्याचं मान्य केलं. जेव्हा ट्रेनिंगसाठी आम्ही एकत्र यायचो तेव्हा चांगलं वाटायचं, अशी प्रतिक्रिया राहुलने दिली. ‘जेव्हा तुम्ही खेळाडूंची भेट घेता, एकत्र ट्रेनिंग करता, ही वेळ दिवसातली सर्वोत्तम असते. पण जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये जाता तेव्हा खरं आव्हान असतं,’ असं वक्तव्य राहुलने केलं.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय टीम तीन वनडे, तीन टी-20 आणि चार टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. दौऱ्याची सुरुवात वनडे सीरिजने होईल, यानंतर टी-20 सीरिज खेळवली जाईल. तर 17 डिसेंबरपासून टेस्ट सीरिजला सुरूवात होईल.


Published by:
Shreyas


First published:
November 26, 2020, 10:56 PM IST

Tags:Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sharad pawar on madhukar pichad: Sharad Pawar: गेल्या निवडणुकीत काहींच्या अंगात आलं होतं!; पवारांनी ‘या’ नेत्याची काढली पिसं – the behavior of some of...

नगर: ‘मागील विधानसभा निवडणुकीच्यावेळी काही नेत्यांच्या अंगात आले होते. त्यामुळे ते चमत्कारिक वागले. ज्यांना पक्षाने भरभरून दिले, त्यांनीच ऐनवेळी साथ सोडली. मात्र, शेवटी...

Ajinkya raahne: IND vs AUS : विराट कोहलीला कर्णधारपद दिल्यानंतर अजिंक्यने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रीया, म्हणाला… – ind vs aus : ajinkya rahane given...

नवी दिल्ली, IND vs AUS : अजिंक्यने भारताला ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजेतेपद मिळवून दिले. पण त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी अजिंक्यकडून भारतीय संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात...

Recent Comments