Home क्रीडा ind vs aus first ODI: टीम इंडियासाठी अलर्ट; पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाचे पारडे...

ind vs aus first ODI: टीम इंडियासाठी अलर्ट; पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाचे पारडे जड, जाणून घ्या कारण – ind vs aus first odi australia can win the first odi against india these are the reasons


नवी दिल्ली: भारतीय संघ आठ महिन्यांच्या मोठ्या कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. उद्यापासून म्हणजेच २७ नोव्हेंबरपासून भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. भारताच्या दौऱ्याची सुरुवात ३ सामन्यांच्या वनडे मालिकेने होणार आहे. याआधी भारतीय संघ १२ मार्च २०२० रोजी शेवटचे मैदानावर दिसला होता. त्यानंतर भारतीय खेलाडू आयपीएल २०२० मध्ये खेळले होते.

वाचा- चप्पल घालून मारला हेलिकॉप्टर शॉट; व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात भारतीय संघाबद्दल अनेक गोष्टी या अनिश्चिततेच्या आहेत. यातील पहिली गोष्टी म्हणजे केएल राहुलचा फलंदाजीचा क्रम होय. जर तो सलामीला फलंदाजीसाठी आला तर पाचव्या क्रमांकावर कोण येणार हा प्रश्न आहे. त्याच बरोबर जर तो पाचव्या क्रमांकावर आला तर सलामीला कोण असा दुसरा प्रश्न तयार होतो. शिखर धवन सोबत मयांक अग्रवाल की शुभमन गिल यापैकी कोणाला संधी मिळणार हे पाहावे लागले. संघात विकेटकिपर म्हणून राहुलला संधी मिळते की संजू सॅमसनचा समावेश केला जाईल हे याचे उत्तर उद्याच मिळणार आहे.

वाचा- सचिन तेंडुलकर रस्ता विसरला; मुंबईच्या रिक्षा चालकाने केली अशी मदत, पाहा व्हिडिओ

विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या खेळाडूंचे स्थान पक्के आहे. या शिवाय संघातील अन्य जागांसाठी अनेक खेळाडूंच्यात लढत असेल. ऑस्ट्रेलियाचे बॅटिंग लाइनअप जवळजवळ फिक्स आहे. यात एरॉन फिंच, डेव्हिड वॉर्नर, मार्नस लाबूशाने आणि स्टीव्ह स्मिथ हा फलंदाजीचा क्रम आहे. गोलंदाजीत मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जोस हेजलवुड हे महत्त्वाचे जलद खेळाडू असतील. तर फिरकीमध्ये एडम जंपावर सर्व मदार असेल.

वाचा- india vs australia 1st odi: कधी आणि कुठे पाहाल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना

दोन्ही संघातील ही लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे. कारण दोघांकडे मोठी फलंदाजी आणि तगडी गोलंदाजी आहे. भारतासाठी गोष्टी अवघड ठरेल ती म्हणजे, ऑस्ट्रेलिया प्रमाणे भारतीय संघात अद्याप खेळाडूंचे स्थान फिक्स नाही. कोण सलामीला येणार, मधळ्या फळीत कोण असेल, तिसरा जलद गोलंदाज आणि दुसरा फिरकीपटू याबाबत गोष्टी स्पष्ट झाल्या नाहीत.

वाचा- क्रिकेट संघाला मोठा झटका; टीममधील ६ जणांना करोनाची लागण

करोना लॉकडाऊनंतर ऑस्ट्रेलिया संघाने आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. पण भारतीय संघाने दिर्घकाळापासून सामना खेळला नाही. त्याच बरोबर घरच्या मैदानावर गोष्टी ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकलेल्या असतील. म्हणून पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाचे पारडे जड दिसत आहे.

वाचा- अजिंक्य रहाणे सराव करत होता; शिखर म्हणाला, काय फायदा…Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Ajinkya raahne: IND vs AUS : विराट कोहलीला कर्णधारपद दिल्यानंतर अजिंक्यने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रीया, म्हणाला… – ind vs aus : ajinkya rahane given...

नवी दिल्ली, IND vs AUS : अजिंक्यने भारताला ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजेतेपद मिळवून दिले. पण त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी अजिंक्यकडून भारतीय संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात...

India Innovation Index: ठाकरे सरकारने करून दाखवले!; ‘या’ यादीत महाराष्ट्राची दुसऱ्या स्थानी झेप – niti aayog announces india innovation index 2020 maharashtra ranked second

मुंबई: नीती आयोगाने २० जानेवारी २०२१ रोजी ' इंडिया इनोव्हेशन इंडेक्स २०२० ' हा आपला दुसऱ्या प्रकाशनाचा निकाल जाहीर केला असून यामध्ये तामिळनाडू...

Recent Comments