Home ताज्या बातम्या IND vs ENG : डे-नाईट टेस्टसाठी विराट या खेळाडूंना संधी देणार! |...

IND vs ENG : डे-नाईट टेस्टसाठी विराट या खेळाडूंना संधी देणार! | News


भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या तिसऱ्या टेस्ट मॅचला 24 फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये सुरूवात होईल. डे-नाईट टेस्ट असल्यामुळे ही मॅच गुलाबी बॉलने (Pink Ball) खेळवण्यात येणार आहे.

अहमदाबाद, 23 फेब्रुवारी : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या तिसऱ्या टेस्ट मॅचला 24 फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये सुरूवात होईल. डे-नाईट टेस्ट असल्यामुळे ही मॅच गुलाबी बॉलने (Pink Ball) खेळवण्यात येणार आहे. भारताची ही तिसरी तर भारतातली दुसरी डे-नाईट टेस्ट असेल. याआधी भारताने बांगलादेशविरुद्ध कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानात पहिली, तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऍडलेडमध्ये दुसरी डे-नाईट टेस्ट खेळली. यातल्या बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला, तर ऍडलेडमधल्या टेस्टमध्ये टीमला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. फक्त 36 रनवर टीम इंडिया ऑल आऊट झाली होती.

भारत आणि इंग्लंड यांच्यात या सीरिजमध्ये दोन टेस्ट झाल्या आहेत, यातल्या पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडचा तर दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा विजय झाला, त्यामुळे सीरिज सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलच्या दृष्टीने दोन्ही टीमसाठी ही मॅच अत्यंत महत्त्वाची आहे. आता एका जरी टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला, तर त्यांचं फायनल खेळण्याचं स्वप्न भंगेल. त्यामुळे विराट कोहली (Virat Kohli)ला टीम निवड करताना एकही चूक करून चालणार नाही.

कोणाला मिळणार संधी?

ओपनर्स : टीम इंडियाच्या ओपनिंग जोडीविषयी कोणतीही शंका नाही. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubhaman Gill) भारतीय बॅटिंगची सुरूवात करतील. दुसऱ्या टेस्टमध्ये रोहित फॉर्ममध्ये आला होता. त्याने 231 बॉलमध्ये 161 रनची खेळी केली होती. तर शुभमन गिलही पूर्णपणे फिट आहे. दुसऱ्या टेस्टवेळी फिल्डिंग करत असताना त्याला दुखापत झाली होती.

मिडल ऑर्डर : तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा, चौथ्या क्रमांकावर विराट कोहली आणि पाचव्या क्रमांकावर अजिंक्य रहाणेचं स्थानही निश्चित आहे. तर सहाव्या क्रमांकावर विकेट कीपर ऋषभ पंत खेळेल. विराटने दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये 62 रन केले होते. पण 2020 पासून विराटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक करता आलेलं नाही. गुलाबी बॉलने शतक करणारा विराट हा एकमेव भारतीय बॅट्समन आहे. तर अजिंक्य रहाणेला या सीरिजमध्ये अजून सूर गवसलेला नाही. त्याला दोन मॅचमध्ये फक्त 78 रन करता आल्या आहेत.

ऑल राऊंडर : अक्षर पटेल आणि रवीचंद्रन अश्विन हे दोन स्पिनर ऑल राऊंडरची भूमिका निभावतील. अश्विनने मागच्या टेस्टमध्ये शानदार शतक केलं होतं.

फास्ट बॉलर : गुलाबी बॉलने सामना असल्यामुळे भारतीय टीम तीन स्पिनर घेऊन खेळण्याची शक्यता कमी आहे. दुसऱ्या टेस्टमध्ये बुमराहला विश्रांती देण्यात आली होती, पण आता त्याचं टीममध्ये पुनरागमन होईल. मोहम्मद सिराजऐवजी बुमराहला संधी देण्यात येईल. तसंच उमेश यादवही फिटनेस टेस्टमध्ये पास झाला आहे, त्यामुळे कुलदीप यादवऐवजी त्याला संधी मिळू शकते. इशांत शर्माही त्याची 100 वी टेस्ट खेळण्यासाठी तयार आहे.

भारताची संभाव्य टीम

रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, इशांत शर्मा


Published by:
Shreyas


First published:
February 23, 2021, 4:38 PM IST

Tags:Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

जातपंचायतीची बहिष्कारनीती सुरूच

म. टा. प्रतिनिधी, समाजमनावरील जातपंचायतीची दहशत उधळून लावल्याची घटना म्हसरूळ (ता. नाशिक) येथे ताजी असतानाच आता सिन्नरमध्ये जातपंचायतीने तरुणावर बहिष्कार घातल्याचा धक्कादायक प्रकार...

औरंगाबाद : विनयभंगप्रकरणी तीन आरोपी अटकेत

म. टा. प्रतिनिधी, कोचींग क्लासेसहून आपल्या घरी चाललेल्या एका करणाऱ्या तीन जणांना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. ऋषीकेश पालोदकर (२२, रा. पुंडलिकनगर), शुभम...

Mithun Chakraborty Joins BJP: कोलकात्यात PM मोदींची सभा; अभिनेते मिथुन चक्रवर्तींचा भाजपमध्ये प्रवेश – actor mithun chakraborty joins bharatiya janata party at pms rally...

कोलकाताः पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोलकात्यातील ब्रिगेड मैदानावर जंगी सभा होत आहे. विशेष म्हणजे या सभेला भाजप नेत्यांसोबत ज्येष्ठ अभिनेते...

मेडिकल कॉलेजवरून मुख्यमंत्र्यांचा राणे यांना टोला, म्हणाले…

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई 'आपण सत्ताधारी आहोत. आपल्या पक्षाचा प्रमुख राज्याचा मुख्यमंत्री आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपल्यासोबत आहे. आपली सत्ता असूनही तुम्ही काहीही...

Recent Comments