Home देश independent mla amanmani tripathi: पहिल्या पत्नीच्या हत्या प्रकरणात जामिनावर, आमदार पुन्हा बोहल्यावर...

independent mla amanmani tripathi: पहिल्या पत्नीच्या हत्या प्रकरणात जामिनावर, आमदार पुन्हा बोहल्यावर चढणार! – independent mla amanmani tripathi to get married again on bail in connection of murder of his wife


महाराजगंज, उत्तर प्रदेश : महाराजगंजच्या नौतनवा भागाचे अपक्ष आमदार अमनमणि त्रिपाठी (amanmani tripathi) मंगळवारी पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकणार आहेत. अमनमणि गोरखपूरच्या एका हॉटेलमध्ये ओनिश पांडेय हिच्यासोबत सप्तपदी चालणार आहेत. लॉकडाऊनमुळे या विवाहासाठी केवळ जवळच्या नातेवाईकांना बोलावण्यात आलंय. अमनमणि हा चर्चित मधुमिता शुक्ला हत्याकांड प्रकरणात आजीवान कारावासाची शिक्षा भोगणाऱ्या अमरमणि यांचा मुलगा आहे. अमनमणिवर पहिली पत्नी सारा सिंहच्या हत्येचा आरोप आहे. जामीन मिळाल्यानंतर अमनमणि सध्या तुरुंगाबाहेर आहे.

सारा सिंह हत्या प्रकरण

सारा सिंह हिच्या हत्या प्रकरणात (Sara Singh Murder Case) सीबीआयनं चौकशी करून फेब्रुवारी २०१७ मध्ये कोर्टात चार्जशीट दाखल केली होती. यामध्ये, साराचा पती अर्थात अमनमणि याला मुख्य आरोपी बनवण्यात आलंय. समाजवादी पक्षाच्या सरकारमध्ये साराच्या आईनं आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडे निष्पक्ष चौकशीची मागणी केली होती. परंतु, अखिलेश यादव यांच्या विरोधानंतरही समाजवादी पक्षाकडून नौतनवा मतदार संघातून अमनमणि यांना तिकीट देण्यात आलं. याचा विरोध झाल्यावर अमनमणिचं तिकीट परत घेण्यात आलं. त्यानंतर अमनमणि अपक्ष म्हणून नौतनवा मतदारसंघातून निवडून आले. यावेळी भावाच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेली आणि लंडनहून परतलेली बहीण तनुश्रीही चर्चेत आली होती.

वाचा :धक्कादायक! ६ वर्षीय बहिणीची भावानं ठोसे मारून केली हत्या
वाचा :बायकोचा खुनी तुरुंगातून जामिनावर सुटला अन् जे काही केलं ते भयानक…

सारा – अमनमणिचा प्रेमविवाह आणि प्रेमाचा शेवट

उच्च वर्गीय सारा आणि अमनमणिची ओळख लखनऊमध्ये झाली होती. त्यांच्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. परंतु, अमनमणि यांचे वडील अमरमणि यांचा मात्र या नात्याला विरोध होता. कुटुंबाच्या विरोधात जाऊन अमनमणि यांनी जुलै २०१३ मध्ये अलीगंजच्या एका आर्यसमाज मंदिरात विवाह केला होता. या लग्नासाठी केवळ दोन जण उपस्थित होते.

नाराज अमरमणि यांनी या विवाहाला सुरुवातीला विरोध केल्यानंतर वर्षभरानं स्वीकृती दिली आणि अमनमणि यांना घरी बोलावून घेतलं. परंतु, ९ जुलै २०१५ रोजी संदिग्ध परिस्थितीत साराचा एका अपघातात मृत्यू झाला. तिच्यासोबत प्रवास करणाऱ्या अमनमणि यांना मात्र जखमही या अपघातात झाली नव्हती. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर साराच्या कुटुंबानं अमनमणि आणि त्याच्या वडिलांवर हत्येचा आरोप केला. तक्रारीनंतर पोलिसांनी अमनमणिला हत्या नाही तर अपहरणाच्या प्रकरणात अटक करून तुरुंगात धाडलं. ऑक्टोबर २०१५ साली या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली. मृत्यूपूर्वी अमनमणि याच्या वागणुकीनं त्रस्त असल्यानं सारा त्यांना घटस्फोट देण्याच्या तयारीत असल्याचं साराच्या कुटुंबानं म्हटलं होतं.

वाचा :क्रूरतेचा कळस! रात्रीची झोपमोड होते म्हणून त्याने कुत्र्याच्या पिलाला…
वाचा :विवाहाच्या दुसऱ्या दिवशी वराचा मृत्यू, १११ जणांना करोना संक्रमणSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sudhir mungantiwar: ही बातमी धक्कादायक! भाजपसाठी चिंतनाची बाब: मुनगंटीवार – shocking news for bjp, says sudhir mungantiwar on eknath khadse resignation

मुंबई: 'एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देणं ही बातमी धक्कादायक आहे. भाजपसाठी ही चिंतनाची बाब आहे,' असं परखड मत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार...

Cyber insurance: सायबर गुन्ह्यांचे शिकार झालात; काळजी करु नका, लवकरच त्यावर मिळणार भरपाई – irda bats for cyber insurance

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : वैयक्तिक तसेच व्यावसायिक स्तरावर वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांची गंभीर दखल अशा गुन्ह्यांपासून व्यक्ती आणि व्यवसाय यांना वाचवण्यासाठी तसेच यामुळे...

Ram Shinde slams Khadse: खडसेंना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही; माजी मंत्र्याची टीका – eknath khadse will repent for leaving bjp, says former minister ram...

अहमदनगर: 'भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिलाय. ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे समजते. मात्र खडसे यांना ज्येष्ठ नेते म्हणून भाजपमध्येजी...

Recent Comments