Home विदेश india and japan navy exercise: India China चीनसोबत तणाव: भारत-जपान नौदलाचा संयुक्त...

india and japan navy exercise: India China चीनसोबत तणाव: भारत-जपान नौदलाचा संयुक्त सराव – indian navy and japan navy conducts naval exercise in indian ocean amid china dispute


टोकियो: आक्रमक विस्तारवादी भूमिकेमुळे चीनविरोधात त्याच्या शेजारच्या देशामध्ये रोष निर्माण होत आहे. लडाखमध्ये भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्यामुळे चीनसोबत तणाव निर्माण झाला आहे. तर, एका बेटावरून जपान आणि चीनमध्येही तणाव निर्माण झाला आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि जपानच्या नौदलाने हिंदी महासागरात संयुक्त सराव केला.

जपानच्या नौदलाने या सरावाची माहिती दिली. जपानच्या मेरिटाइम सेल्फ डिफेन्स फोर्सच्या जेएस कशिमा आणि जेएस शिमायुकी यांनी भारतीय नौदलाच्या आएनएस राणा आणि आएनएस कुलीसश यांनी या संयुक्त सरावात सहभाग घेतला. या सरावामुळे जपान मेरिटाइम सेल्फ डिफेन्स फोर्स आणि भारतीय नौदलात सहकार्य वाढणार आहे.

वाचा: भारत-चीन तणाव: इस्राएलकडून भारताला मिळणार सुरक्षाकवच!

वृत्तानुसार, जपानची विनाशिका युद्धनौका कागाला दक्षिण जपानमधील ओकिनावा बेटाजवळ २४ समुद्र मैल अंतरामध्ये एक पाणबुडी आढळली. त्यानंतर जपानच्या नौदलाने पेट्रोलिंग एअरक्राफ्टद्वारे चीनच्या पाणबुडीला जपानच्या हद्दीतून हुसकावून लावले. याआधी २०१८ मध्ये जपानने आपल्या समुद्राच्या हद्दीत एका चिनी पाणबुडीला पकडले होते.

वाचा: चीनला अद्दल घडवा! अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर

चीनने पूर्व चीन समुद्रातील बेटावर आपला दावा सांगितला आहे. सध्या हे बेट जपानच्या ताब्यात असून सेनकाकू आणि चीनमध्ये डियाओस या नावाने ओळखले जाते. या बेटांचा ताबा १९७२ पासून जपानकडे आहे. हे बेट आपल्या हद्दीत येत असल्याचा दावा चीन करत असून जपानने या बेटावरील दावा सोडण्याची मागणी केली आहे. या बेटासाठी जपानवर सैनिकी कारवाई करण्याची धमकी चीनने दिली आहे.सध्या या बेटांचे संरक्षण जपानचे नौदल करत आहे. चीनने जर या बेटांवर ताबा मिळवण्यासाठी लष्करी कारवाई केल्यास युद्ध होण्याची दाट शक्यता आहे.

वाचा: भूतानने म्हटले ऑल इज वेल! ‘या’ कारणाने अडवले गेले पाणी

आशियात या देशांसोबत चीनचा वाद

आशिया खंडात चीनचा शेजारच्या देशांसोबत वाद सुरू आहे. चीन या आक्रमक विस्तारवादी धोरणांचा भारताला सर्वाधिक धोका आहे. लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या हद्दीत घुसखोरी केली आहे. त्याशिवाय जपानसोबतही बेटाच्या दाव्यावरून तणाव सुरू आहे. चीनकडून तैवानलाही धोका आहे. तैवानवरही हल्ला करण्याची धमकी चीनने याआधीच दिली आहे. त्याशिवाय दक्षिण चीन समुद्राच्या हद्दीवरून इतर देशांसोबत चीनचा वाद आहे. फिलीपाइन्स, मलेशिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम या शेजारी देशांसोबत चीनचा वाद सुरू आहे. तैवानला चीनकडून सातत्याने देण्यात येत असलेली धमकी आणि दक्षिण चीन समुद्रात चीन घेत असलेली आक्रमक भूमिका यामुळे अमेरिकेनेही आपली युद्धनौका या भागात तैनात केली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Bank employees strike: संपामुळे सातशे कोटींचे व्यवहार ठप्प – 700 crore transactions stalled due to strike

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकेंद्र सरकार बँकांचेही खासगीकरण करू पाहत आहे. पीएमसी, एस बँकेच्या ठेवीदारांना वाऱ्यावर सोडले. आता तेच लक्ष्मी विलास बँकेचे होऊ पाहत...

Adam Gilchrist: भारतीय खेळाडूबाबत गिलख्रिस्टने केली मोठी चूक; सोशल मीडियावर चाहते भडकले – adam gilchrist made a big mistake about indian players; fans erupted...

नवी दिल्ली: कधी कधी अनावधानाने चूकीची गोष्टी बोलली जाते पण त्यामुळे मोठा गोंधळ उडतो आणि नाराजी निर्माण होतो. सध्या सोशल मीडियाच्या काळात तर...

आस्करसाठी निवडण्यात आलेल्या 'जल्लीकट्टू'ची कथा आहे तरी काय?

मुंबई टाइम्स टीम जगभरात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या पुरस्कारांसाठी भारताकडून '' या मल्याळी चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. ९३व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी हा सिनेमा...

Recent Comments