Home देश India China: चीनच्या हरकतींनी भारत सतर्क, लडाखमध्ये जवानांची संख्या दुपटीने वाढवली -...

India China: चीनच्या हरकतींनी भारत सतर्क, लडाखमध्ये जवानांची संख्या दुपटीने वाढवली – ladakh standoff indian deployment doubles on lac


लेह, लडाखः लडाखमध्ये भारतीय लष्कराने आपल्या जवानांची संख्या दुपटीने वाढवली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पूर्व लडाखमध्ये भारत-चीनच्या सैनिकांमध्ये झटापटीच्या घटना घडल्या आहेत. चीन सीमेवर आक्रमक झाला आहे. तसंच प्रत्यक्ष ताबा रेषेवरील वास्तविक स्थिती बदलण्याच्या चीनचा प्रयत्न आहे. यामुळे भारतीय लष्करालाही जवानांची संख्या दुपटीने वाढवावी लागली आहे. सुरक्षा यंत्रणांनी वेगवेगळ्या स्तरावर केलेल्या समीक्षेतून ही माहिती समोर आलीय.

भारतीय लष्कराने चीन सीमेला लागून असलेल्या सर्व भागांमध्ये जवानांची संख्या वाढवली आहे. तर संपूर्ण लडाखमध्ये ४० ते ४५ हजार जवानांना लष्कराने तैनात केलं आहे. या आधी ही संख्या २० ते २४ हजार इतकी होती. तसंच भारतीय भूभागाच्या सुरक्षेसाठी भारत-तिबेट सीमा पोलीसांची (ITBP) उपस्थिती वाढवण्यात आली आहे. चिनी सैनिकांची संख्या भारतीय जवानांच्या तुलनेत कमी आहे. लडाखमध्ये किमान ३० ते ३५ हजार चिनी सैनिक आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिलीय. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

लडाखमधील चुमार, डेपसांग, डेमचॉक, गोरगा, गलवान, पँगाँग सरोवर आणि ट्रिग हाइट्स या भागात वास्तविक स्थिती (status quo) बदलण्याचा चीनचा डाव आहे. हे पाहता भारतानेही चीनला ठोस प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. भारतीय सैन्याकडून टेहळणीला वेग देण्यात आला आहे. मे अखेरपर्यंत चीनने गोरगाजवळ रणगाडे आणि तोफांसह शस्रास्त्रांची वेगाने तैनाती केली होती. त्या आधीही चिनी सैनिक तिथे उपस्थित होते. त्यांच्या सोबत चीनने आणखी कॉम्बॅट फोर्सेसची तैनाती वाढवली आहे. या हरकतींवरून चीन कुटील डाव समोर आला आहे, असं अधिकाऱ्याने सांगितलं. भारताचा भूभाग बळकावण्याचा चीनचा डाव हा फक्त एक दोन भागांपुरता मर्यादित नाही त्यापुढेही चीनची वाकडी नजर आहे, असं अधिकाऱ्याने सांगितले.

संसदेत चर्चेला या, दोन हात होऊन जाऊ द्या; अमित शहांचे राहुल गांधींना आव्हान

मेच्या सुरुवातीलाच चिनी सैन्याने आक्रमण सुरू केले होते. या भागात गस्त घालणाऱ्या भारतीय जवानांच्या पथकाला चिनी सैनिकांनी अनेकदा रोखले होते. यानंतर गलवान खोऱ्यात पॉइंट १४ येथे झटापटी झाल्या. त्यानंतर छोट्या छोट्या झटापटी गंभीर होत गेल्या आणि सीमेवर तणाव वाढून दोन्ही देशाचे सैन्य आता समोरासमोर आले आहे. १५ जूनला दोन्ही देशाच्या सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला. त्यात भारताचे २० जवान शहीद झाले होते.

LPG स्टॉक करा, शाळेच्या इमारती रिकाम्या करा; काश्मीरमध्ये सरकारचे आदेश

पँगाँग सरोवराच्या जवळ चिनी सैनिकांनी बोट पेट्रोलिंगचा वेग पूर्वीपेक्षा अधिक वाढवला आहे. सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर चीनने सैनिक वाढवले आहेत. फिंगर ४ आणि ८ दरम्यान कुठल्याही ठिकाणी चिनी सैनिकांची संख्या १ ते दीडहजाराच्या जवळपास आहे. फिंगर ४ ते ८ दरम्यान चिनी सैनिकांनी बंकर्स आणि देखरेखीसाठी चौक्याही बनवल्या आहेत. हे वास्तविक स्थितीचे पूर्णपणे उल्लंघन आहे. पूर्व लडाखमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पँगाँग भागातील स्थिती सामान्य होणं गरजेचं आहे, असं सूत्रांनी सांगितलं.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Gautam Pashankar: पुण्यातून बेपत्ता झालेले प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर अखेर ‘इथे’ सापडले – pune police crime branch successfully traced businessman gautam pashankar in jaipur...

म. टा. प्रतिनिधी, पुणे: पाषाणकर उद्योग समूहाचे प्रमुख आणि प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर हे अखेर महिनाभरानंतर सापडले. त्यांचा शोध घेण्यात पुणे पोलिसांना यश...

french company thales in india: राफेलचे भाग भारतातच ‘या’ राज्यात होणार तयार! – rafale parts to be built in up french company thales opens...

लखनऊ : भारतीय वायुदलात समावेश करण्यात आलेल्या राफेल या लढाऊ विमानाचे सुटे भाग उत्तर प्रदेशात तयार होणार आहेत. यासाठी राफेलचे भाग बनवणारी फ्रान्सची...

nashik corona update: करोनावाढीचा धोका २६ जानेवारीपर्यंत अधिक – nashik corona update : corona cases will increase till 26 January

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकदिवाळीनंतर नाशिकमध्ये काही दिवसांपासून रुग्णवाढीचा चढता क्रम पाहायला मिळत आहे. एक डिसेंबर ते २६ जानेवारी या कालावधीत अधिक रुग्णवाढ...

Recent Comments