Home विदेश India China border: सीमेवर तणाव: तिबेटमध्ये चीनचा मध्यरात्री युद्धसराव - india china...

India China border: सीमेवर तणाव: तिबेटमध्ये चीनचा मध्यरात्री युद्धसराव – india china tension: china pla tibet command executes mock war drill at night


बीजिंग: लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे सीमेवर परिस्थिती सामान्य असल्याचे चीन सांगत असली दुसरीकडे चिनी सैन्याचा तिबेटमध्ये रात्रीच्या वेळेत युद्धसराव सुरू आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या तिबेट मिलिट्री कमांडच्या सैन्याने युद्धसराव केला.

सोमवारी रात्री ४७०० मीटर उंचीवर युद्ध सराव करत कठीण परिस्थितीत सैन्याच्या क्षमतेचा अंदाज घेतला. चीनची सरकारी वृत्तसंस्था ‘ग्लोबल टाइम्स’ने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, भारत आणि चीनची सीमा उंचावर आहे. दोन्ही देशांतील सैन्यांमध्ये काही घटना घडल्या आहेत. त्यामुळेच दोन्ही देशांनी आपले सैन्य या भागात तैनात केले आहेत. चीनमधील चीन सेंट्रल टेलिव्हिजनने (सीसीटीव्ही) दिलेल्या वृत्तानुसार, रात्री एक वाजण्याच्या सुमारास, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या स्काउट युनिटने तांगुला डोंगर सर करण्यास सुरुवात केली.

या दरम्यान, वाहनांचे दिवे बंद करण्यात आले होते. त्याशिवाय ड्रोनच्या नजरेतून वाचण्यासाठी नाईट व्हिजनची मदत घेण्यात आली होती. रस्त्यात येणाऱ्या अडथळ्यांना दूर करत ड्रोनच्या मदतीने काही स्फोट करण्यात आले. त्याशिवाय निर्धारीत लक्ष्यापर्यंत पोहचल्यानंतर कॉम्बॅट चाचणीही करण्यात आली. यासाठी स्नाइपर युनिटला पुढे पाठवण्यात आले. त्याशिवाय फायर स्ट्राइक टीमने हलकी हत्यारे असलेल्या वाहनांचा अॅण्टी टँक रॉकेटने हल्ला करण्यात आला.

वाचा: पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनचा वीजप्रकल्प; भारताचा विरोध
वाचा:सीमेवरील तणावानंतर चीनची भारताला ही ‘ऑफर’!
या युद्धसराव दरम्यान, जवळपास २००० मोर्टार शेल, रायफल ग्रेनेड आणि रॉकेट्सचा वापर करण्यात आला. नवीन शस्त्रांसह आणि उपकरणांसह चिनी सैन्य युद्ध करण्यात किती तयार आहे, याची चाचपणी करण्यात आली. या भागात रात्री थंडी अधिक असते. त्याशिवाय उंचावर ठिकाण असल्यामुळे ऑक्सिजनची पातळी कमी होत जाते. त्यामुळे सैन्याला अडचणी निर्माण होऊ शकतात. रात्रीच्या वेळी एक लढाई जिंकली जाऊ शकते आणि अचानक हल्ला केल्यामुळे सैन्याला मदत मिळू शकते.

आणखी वाचा:
चीनचा अमेरिकेसह सर्वच पाश्चिमात्य देशांना धोका: अमेरिका
चीनने त्यांचं सैन्य भारताच्या उत्तरेकडे वळवलंय; अमेरिकेचा दावा
हिंसक आंदोलनानंतर व्हाइट हाउस अंधारात ; अभेद्य घरातच ट्रम्प घाबरले!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Anil Parab: ‘सुपारी घेतल्याशिवाय मनसे हा पक्ष कामच करू शकत नाही’ – shivsena leader and maharashtra minister anil parab attacks on mns party over...

म. टा. प्रतिनिधी, मुंबई'मनसे भाजपबरोबर जाणार ही बदलत्या राजकारणाची नांदी आहे की नाही हे मला माहीत नाही. मात्र, मनसे सुपारी घेतल्याशिवाय काम करू...

municipal corporation election in maharashtra: पालिकेत आवाज वार्डांचा ! – municipal corporation election in maharashtra and political party

जितेंद्र अष्टेकरस्थानिक स्वराज्य संस्थांच्या गेल्या निवडणुकीत प्रभागरचना करताना भारतीय जनता पक्षाने सत्तेचा गैरवापर केला. आता मात्र तसे काही होणार नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री...

Recent Comments