Home देश India China Border Dispute: चीनवरून मिलिंद देवरांचा काँग्रेसला घरचा अहेर, म्हणाले... -...

India China Border Dispute: चीनवरून मिलिंद देवरांचा काँग्रेसला घरचा अहेर, म्हणाले… – india china border dispute congress leader milind deora statement


नवी दिल्लीः गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले. यानंतर काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रश्नांची सरबत्ती करून सरकारला घेरले आहे. राहुल गांधींसह काँग्रसेचे इतर वरिष्ठ नेत्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. अशातच पक्षाचा एक तरुण चेहरा म्हणून ओळखले जाणारे मिलिंद देवरा यांनी चीन मुद्द्यावर वेगळी भूमिका घेतली आहे. देवरा यांनी सल्ला देत काँग्रेसची अडचण केली आहे.

मिलिंद देवरा यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला अडचणीत आणले आहे. घुसखोर चीनची हिंमत वाढली आहे आणि दुर्दैवाने त्यावर राजकारण सुरू आहे, असं मिलिंद देवरा म्हणाले. ‘सीमेवर चीन आक्रमक झाला आहे. दुसरीकडे देशात दुर्दैवाने या मुद्द्यावरून राजकीय चिखलफेक सुरू आहे. चीनच्या अतिक्रमणाचा आपण निषेध करायला हवा आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी एकजूट व्हायला हवं. पण आपण आपल्यातील फूट उघड करतोय’, असं मिलिंद देवरा म्हणाले. मिलिंद देवरा यांनी यासंदर्भात ट्विट केलंय.

PM मोदींची आज ‘मन की बात’; भारत-चीन तणावावर बोलणार?

पक्षावेगळी भूमिका घेण्याची मिलिंद देवरा यांची ही काही पहिली वेळ नाहीए. त्यांनी यापूर्वी अमेरिकेतील हाउडी मोदी कार्यक्रम, आणि कलम ३७० या सारख्या मुद्द्यांवर पक्षावेगळं मत मांडलं होतं.

३७० वरील वक्तव्य

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याला आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयकाला काँग्रेसने विरोध केला होता. पण मिलिंद देवरा यांचे त्यावेळी वेगळा सूर होता. राजकीय पक्षांनी आपली विचारधारा बाजूला ठेवून यावर मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे. देशाची एकता आणि अखंडता, जम्मू-काश्मीरमध्ये शांतता, काश्मिरी तरुणांना नोकरी आणि काश्मिरी पंडितांना न्यायासाठी हे उत्तमच आहे, असं सांगत देवरा यांनी कलम ३७० हटवण्याच्या बाजूने मत मांडलं होतं.

चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीशी भाजप, RSS चा संबंध काय? १० प्रतिप्रश्न करत काँग्रेसचा पलटवार

ईडीकडून चौकशी; अहमद पटेल म्हणाले, ‘मोदी आणि शहांचे पाहुणे घरी आले होते’

अमेरिकेतील पीएम मोदींच्या कार्यक्रमाचे कौतुक

अमेरिकेतील हाउडी मोदी कार्यक्रमावरून काँग्रेसने सरकारवर निशाणा साधला होता. तर मिलिंद देवरा यांनी सरकारचे कौतुक केले होते. ह्युस्टनमधील पंतप्रधान मोदींचे भाषण हे भारताची सॉफ्ट पावर डिप्लोसमसी दर्शवते. वडील मुरली देवरा यांनी भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ केले. डोनाल्ड ट्रम्प यांचा पाहुणचार आणि भारत अमेरिकेच्या नागरिकांचे योगदान स्वीकारणं अभिमानाची गोष्ट आहे, असं मिलिंद देवरा म्हणाले होते.

केजरीवाल यांचे कौतुक

दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिलिंद देवरा यांनी केजरीवाल सरकारचीही स्तुती केली होती. महसुलाच्या मुद्द्यावरून दिल्ली सरकारचे त्यांनी कौतुक केले होते. केजरीवाल सरकारने गेल्या पाच वर्षांत महसूली उत्पन्न दुप्पट केले आहे. आता ते ६० हजार कोटीपर्यंत गेले आहे. दिल्ली आता आर्थिकरित्या देशाचे सर्वात सक्षम राज्य झाले आहे, असं देवरा म्हणाले. देवारांच्या वक्तव्यावरून काँग्रेस नेते अजय माकन यांनी त्यांना उत्तर दिले होते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Kitab-i-Nauras book: सांगीतिक मूल्यांचा ऐतिहासिक ग्रंथ – dr balasaheb labade book review on kitab-i-nauras book

डॉ. बाळासाहेब लबडे'किताबे नवरस' हा मूळ विजापूरचा सुलतान इब्राहीम आदिलशहा दुसरा याने दखनी भाषेत लिहिलेला ग्रंथ. या ग्रंथाचा डॉ. सय्यद याह्या नशीत यांनी...

फोटो काढण्याच्या नादात महिलेने गमावला जीव

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वरजवळील हरिहर किल्ल्यावर कुटुंबीयांसह फिरायला आलेल्या महिलेचा किल्ला चढतेवेळी फोटो काढताना पाय घसरून दगडावर पडल्यने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी...

Recent Comments