Home देश India China Border Dispute: LAC वर तणाव; CDS जनरल बिपीन रावत आज...

India China Border Dispute: LAC वर तणाव; CDS जनरल बिपीन रावत आज लेह भेटीवर – india china border dispute cds general bipin rawat will visit leh today


नवी दिल्लीः लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC)तणावाच्या पार्श्वभूमीवर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत हे शुक्रवारी लेहला भेट देणार आहेत. लष्कराच्या उत्तर विभागाचे कमांडर आणि १४ कॉर्प्सच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून रावत हे सीमेवरील सुरक्षेचा आढावा घेतील. या आधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे हे शुक्रवारी लेहला भेट देणार होते. पण नंतर त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला. आता CDS जनरल बिपीन रावत हे लेहला भेट देणार आहेत.

राजनाथ सिंह लेहला भेट देणार आहेत. त्यांच्या या भेटीची तारीक लवकरच जाहीर करण्यात येईल, असं संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. राजनाथ सिंह हे लेहला जाऊन सीमेवरील स्थितीचा आढावा घेणार होते. पूर्व लडाखमध्ये चीनशी सुरू असलेल्या तणावाच्या स्थितीची समीक्षा करणार होते. राजनाथ सिंह यांच्यासोबत लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे हेही जाणार होते.

LACवर तणावाची स्थिती असताना जनरल रावत यांचा दौरा होतोय. तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशातील सैन्य अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. पण अद्याप त्यावर कुठलाही ठोस तोडगा निघालेला नाही. लष्करी अधिकाऱ्यांच्या चर्चेदरम्यान १५ जूनला गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. त्यात भारताचे २० जवान शहीद झाले. पण चीनने आपल्या ठार झालेल्या सैनिकांची कुठलीही माहिती दिलेली नाही.

भारताने सीमेवर केली तयारी

चीनशी सुरू असलेला तणाव चिघळल्यास त्याला उत्तर देण्यासाठी भारताने तयारी केली आहे. चिनी विमानं लडाखमध्ये घिरट्या घालत असल्याचे निदर्शनास आहे. या पार्श्वभूमीवर भारतानेही आपली लढाऊ विमानं सज्ज ठेवली आहेत. तसंच चिनी विमानांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडण्यासाठी एअर डिफेन्स सिस्टिमही सीमेवर उभारण्यात आली आहे.

पुतीन यांना मोदींनी दिल्या शुभेच्छा; दोघांमध्ये झाली ही महत्त्वाची चर्चा

चिनी सैनिकांची सीमेवरील वाढती संख्या पाहता भारतानेही जवानांची संख्या वाढवली आहे. भारताने लडाख सीमेवर स्पेशल फोर्सेसची तैनाती केली आहे. या फोर्सेसमधी जवानांनी २०१७ मध्ये सर्जिकल स्ट्राइक केला होता.

चीनला उत्तर देण्याची तयारी; सर्जिकल स्ट्राइक करणाऱ्या स्पेशल फोर्सेस लडाखमध्ये तैनात

आता ऊर्जा क्षेत्रात चीनला झटका, आयातीचे नियम कडक करणारः आर. के. सिंह

काश्मिरात चकमकीत १ दहशतवादी ठार तर एक जवान शहीद

दरम्यान, जम्मू-काश्मीरची राजनाधानी श्रीनगरच्या मालाबागमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि पोलिसांची दहशतवाद्यांशी चकमक सुरू आहे. या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी एका दहशतवाद्याला ठार केलंय. पण या कारवाईत सीआरपीएफचा एक जवान शहीद तर एक जखमी झाला आहे. जखमी जवानाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

शिवसेना-भाजपला मिळाले सभापतीपद

म. टा. वृत्तसेवा, येथील महानगरपालिकेच्या स्थायी व महिला बालकल्याण समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी ( दि २७ ) ऑनलाइन पद्धतीने...

aurangabad News : ‘स्मार्ट सिटी’साठी आणखी दीडशे कोटी – rs 150 crore more for ‘smart city’

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादऔरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनसाठी केंद्र आणि राज्य शासनाने मिळून आणखीन १५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. शासनाने दिलेल्या निधीच्या...

Recent Comments