Home विदेश India China border: India China tension: भारताला घेरण्यासाठी चीनची बांगलादेशवर नजर -...

India China border: India China tension: भारताला घेरण्यासाठी चीनची बांगलादेशवर नजर – india china border china trying to trapping bangladesh after nepal and paksitan


ढाका: लडाखमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने भारताला घेरण्यासाठी मोठी पावले उचलण्यास सुरुवात केली असल्याचे समोर आले आहे. चीनच्या जोरावर नेपाळ भारताविरोधात आगळीक करत असताना आता चीनची नजर बांगलादेशवर वळली आहे. बांगलादेशला आपल्या बाजूने वळवण्यासाठी चीनने डावपेच आखले आहेत.

भारताच्या शेजारी देशांना आपल्याकडे वळवून चीन दक्षिण आशियात भारताची कोंडी करण्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याशिवाय, शेजारच्या देशांना आपल्याकडे वळवून भारताच्या अडचणीत वाढ करण्याचा प्रयत्न चीनकडून सातत्याने होत आहे. बांगलादेशला आपल्याकडे वळवण्यासाठी आता चीनने बांगलादेशमधील ९७ टक्के उत्पादनांवरील कर हटवण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या या मोठ्या घोषणेनंतर ढाका आणि बीजिंगमधील मैत्रीपूर्ण आणखी घट्ट होणार असल्याचे बांगलादेशमधील राजकीय विश्लेषकांनी म्हटले आहे. मत्स्य आणि चामड्याच्या उत्पादनासहित ९७ टक्के वस्तूंना चीन सरकारने सवलत दिली असल्याचे बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

वाचा: भारत-चीन तणाव: चर्चेच्या गप्पा करणाऱ्या चीनचा युद्धसराव!

एक महिन्याआधी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी करोनाच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीबाबत चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी चर्चा केली होती. चीनला निर्यात करण्यात येणाऱ्या वस्तूंना करमुक्त करण्याची मागणी बांगलादेशने चीनकडे केली होती, अशी माहिती बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी मोहम्मद तौहिदुल इस्लाम यांनी सांगितले. त्यानंतर चीनच्या स्टेट काउंसिल टॅरीफ कमिशनने नुकतीच एक अधिसूचना काढली आहे. बांगलादेश विकसनशील देशांपैकी एक असून कर सवलत देण्यात यावी, असे या अधिसूचनेत म्हटले आहे.

वाचा: भारत-चीन तणाव: राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी दिले ‘हे’ आदेश

बांगलादेश चीनकडून जवळपास १५ बिलियन डॉलरची आयात करतो. तर, चीनला बांगलादेशमधून होणारी निर्यात ही अतिशय कमी आहे. या कर सवलतीमुळे बांगलादेशची चीनसोबत होणाऱ्या व्यापारातील आर्थिक तूट कमी होण्याची अपेक्षा आहे. यामुळे बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेला फायदा होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

वाचा: भारत व तैवानसोबत वाद; चीन ‘नाटो’च्या रडारवर!

चीनकडून बांगलादेशला व्यापार सवलतीमधून आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. चीनचा जुना मित्र पाकिस्ताननेही लडाख सीमेवरील तणावानंतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर हालचाली सुरू केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या तिन्ही सैन्य दलप्रमुखांची बैठक आयएसआयच्या मुख्यालयात पार पडली होती. तर, नेपाळने ही भारतासोबतचा सीमावाद उकरून काढला असून भारताविरोधात आक्रमक भूमिका घेत आहे. श्रीलंकेतही चीनने एक बंदर ताब्यात घेतले असून त्या ठिकाणी चीन आपल्या नौदलासाठी तळ उभारत असल्याची चर्चा सुरू आहे. भारतावर दबाब टाकण्यासाठी भारताच्या शेजारी देशांवर चीनने जाळं टाकण्यास सुरुवात केली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Bhagat Singh Koshyari Says Fear Of Second Corona Wave In Maharashtra – bhagat singh koshyari :’राज्यात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता’ | Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोनासाठी विविध उपाययोजना आखतानाच राज्य सरकारने धारावीसारख्या भागात यशस्वीपणे कामगिरी केली आहे. मात्र करोनाची लढाई अजून सुरूच आहे. 'मी...

Sitaram Kunte: अनुभवी आणि विश्वासार्ह : सीताराम कुंटे – sitaram kunte new chief secretary of maharashtra

अखेर सीताराम कुंटे राज्याचे मुख्य सचिव झाले. खरेतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरच ते मुख्य सचिवपदी येणार असा अनेकांचा कयास होता.  Source...

Corona Rules Violation: करोनाबाधित नियमांचा भंग करून फिरत होता घराबाहेर; गुन्हा दाखल – police file fir against corona positive man for corona rules violation

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोनास रोखण्यासाठी मुंबईत लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. गोवंडी पोलिस ठाण्यापाठोपाठ सोमवारी चेंबूर पोलिस ठाण्यात...

Recent Comments