Home शहरं मुंबई india china border issue: चिनी मालावर बहिष्कार टाकणारे स्वयंघोषित देशभक्त, आव्हाडांचा भाजपला...

india china border issue: चिनी मालावर बहिष्कार टाकणारे स्वयंघोषित देशभक्त, आव्हाडांचा भाजपला टोला – boycott chinese products jitendra awhad slams bjp


मुंबईः राजीव गांधी फाउंडेशनला चीनने पैसे का दिले? असा सवाल करत सत्ताधारी भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला. यानंतर काँग्रेसनेही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा चीनच्या सत्ताधारी पक्षाशी काय संबंध आहे? असं विचारत भाजपला प्रयत्युत्तर दिलंय. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हान यांनी ट्विट करत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला टोला लगावला आहे.

परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या मुलाच्या संस्थेला चीनकडून ३ कोटीच्या आसपास अनुदान देण्यात आले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या संस्थेचे ९ चिनी संस्थांशी घनिष्ठ संबंध आहे. असं असताना आमचे स्वयंघोषित देशभक्त निघाले चिनी मालावर बहिष्कार टाकायला, असा टोला आव्हाड यांनी लगावला आहे. आव्हाड यांनी ‘द टेलिग्राफ’ या वृत्तपत्राच्या बातमीवरून हे ट्विट केले आहे.

‘परराष्ट्र मंत्र्यांच्या मुलाच्या संस्थेला चीनचा पैसा’

गलवानमधील हिंसक संघर्षावरून भाजपने चीनविरोधी भूमिका घेतली आहे. पण चीनकडे बोट दाखवताना भाजप आपल्या दिशेने असलेली दोन बोटं बघत नाहीए. द परराष्ट्र विषय संबंधी भूमिका मांडणाऱ्या ‘द ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन’ (ORF) या संस्थेशी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या मुलाचाही संबंध आहे. या संस्थेला चीनच्या दुतावासाकडून २०१६ मध्ये फंडिंग झाले होते. रिलायन्स उद्योग समूहाचे ORFला समर्थन आहे, असं द टेलिग्राफने वृत्तात म्हटलं आहे.

ORF च्या देणगी देणाऱ्यांच्या यादीत परदेशी देणगीदार आहेत. या संस्थेने त्यांच्याकडून देणगीही स्वीकारली आहे. ORF ला तीन वेळा अनुदान मिळाले आहे. चिनी दुतावासाकडून २०१६ मध्ये जवळपास १.२५ कोटी रुपये देणगी स्वरुपात दिले गेले. तर २०१७ मध्ये ५० लाखांची चीनने देणगी दिलीय, असं द टेलिग्राफने म्हटलंय.

जितेंद्र आव्हाड यांनी केलेले ट्विट

३० जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही; पण अनेक गोष्टी सुरू होतील: उद्धव ठाकरे

आषाढी वारीला जाणार; करोनाचं संकट निवारण्यासाठी विठ्ठलाला साकडं घालणार: CM

‘अजित डोवल यांच्या संस्थेचा चीनशी संबंध’

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल हे विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनचे (VIF) संस्थापक संचालक आहेत. या संस्थेचे भाजप आणि आरएसएसशी अतिशय जवळचे संबंध आहेत. पराराष्ट्र आणि सामरिक धोरणांबाबत चीनमधील ९ संस्थांसोबत काम करत असल्याचं VIF आपल्या वेबसाइटवर जाहीर केलं आहे, असं द टेलिग्राफच्या वृत्तात म्हटलं आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

cm uddhav thackeray: चैत्यभूमीला घरातूनच अभिवादन करा – cm uddhav thackeray has appealed give tribute to dr babasaheb ambedkar on 6 december from home

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमहापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या अभिवादनासाठी ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व...

Recent Comments