Home देश India China border news: चीन सैनिकांच्या बॅगेत लोखंडी रॉड; घातपाताच्या तयारीनिशीच गस्त...

India China border news: चीन सैनिकांच्या बॅगेत लोखंडी रॉड; घातपाताच्या तयारीनिशीच गस्त – iron rods in pla bags even in eastern sector


नवी दिल्ली : चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालताना त्यांच्या बॅकपॅकमध्ये लोखंडी रॉड ठेवत असल्याचं दिसून आलं आहे. चीनच्या सैनिकांकडून वारंवार दोन्ही देशातील करारांचं उल्लंघन केलं जात आहे आणि काही चूक झाल्यास भारतावरच आरोप केला जातो, असं जाणकार सांगतात. सूत्रांच्या माहितीनुसार, भारत आणि चीनचे सैनिक आमनेसामने असतात तेव्हाही चीनच्या सैनिकांकडे लोखंडी रॉड असतात. गेल्या आठवड्यातच अरुणाचल प्रदेशात हे दिसून आलं होतं.

विमानतळ ते बंकरचे बांधकाम; भारताविरोधात चीनकडून पाकिस्तानचा वापर?

पीएलए सैनिक तयारीनिशीच येतात आणि दररोज नियम मोडतात. पण एखाद्या चकमकीत ते जखमी झाले की भारतावर नियम तोडल्याची ओरड करतात, असं सूत्रांनी सांगितलं. भारताने यापूर्वीच चीनला गलवना खोऱ्यातील पूर्वनियोजित हल्ल्याबद्दल सुनावलं होतं. या हल्ल्यात चीनच्या सैनिकांकडे काटेरी रॉड आणि दगड होते. एलएसीवर दोन्ही देशाचे सैनिक शस्त्र बाळगत नाहीत. त्यामुळे भारतीय सैनिकांकडे त्यावेळी शस्त्र नव्हती.

लडाख: चीनकडून ‘अशी’ सुरू आहे घुसखोरी; सॅटेलाइट फोटोतून खुलासा

भारत-चीन व्यापारातही तणाव

भारत आणि चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणावाचे पडसाद आता व्यापारावरही उमटू लागले आहेत. भारतात चीनमधून येणाऱ्या वस्तूंची कडक तपासणी सुरू असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर चीनमध्येही भारतातून येणाऱ्या वस्तू बंदरात अडकून ठेवल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. चीनसह हाँगकाँगमधील बंदरावर भारतीय वस्तू कस्टम विभागाने अडवून ठेवल्याचा आरोप भारतीय निर्यातदारांनी केला आहे.

चीनचा माल बंदरावरच अडकला; अमेरिकन कंपन्याही धास्तावल्या

देशातील काही बंदरावर, विशेषतः चेन्नई आणि मुंबई बंदरावर चीनमधून आलेला माल पडून आहे. येत्या काही दिवसात हा माल कस्टम प्रक्रियेतून क्लिअर करण्यासाठी विलंब होणार असल्याचे संकेत कस्टम विभागाने दिले आहेत. पण यासाठी कोणतंही कारण देण्यात आलेलं नाही. कस्टम किंवा केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ आणि कस्टमने कोणतंही लेखी किंवा तोंडी कारण सांगितलेलं नाही.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Mumbai local train: ‘सर्वांसाठी नाही तर विद्यार्थ्यांसाठी तरी लोकल ट्रेन सुरू करा’ – kalyan-kasara railway passengers welfare association demands to allowed students for travels...

म. टा. प्रतिनिधी, मुंबईकरोनाकाळात बंद असलेल्या शाळा, महाविद्यालय, आयटीआय यासारख्या शैक्षणिक संस्था आता हळूहळू सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. मुंबई लोकलच्या सुमारे ९० टक्के...

LIVE : गडचिरोलीतील 350 ग्रामपंचायतीसाठी आज मतमोजणी | Maharashtra

सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुशखबर सर्वांसाठी लोकल प्रवासाची लवकरच मुभा? 'न्यूज18 लोकमत'ची एक्सक्लुझिव्ह माहिती लोकलसंदर्भात आज महत्वपूर्ण बैठक Source link

Recent Comments