Home देश India China border news: India-China Clash : चीनची कुरघोडी सुरूच; 'वाय' नाल्याचा...

India China border news: India-China Clash : चीनची कुरघोडी सुरूच; ‘वाय’ नाल्याचा मार्ग केला ब्लॉक – India China Clash Y Nalla Turns New Frontier For China As Chinese Sever Pp 14 Access


नवी दिल्ली: एकीकडे चीन भारतासोबत चर्चा करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत असला तरी दुसरीकडे मात्र चीनी सैन्य करत असलेल्या वेगवेगळ्या कारवायांमुळे तणाव वाढत चालला आहे. भारताला पेट्रोल पॉइंट १४ (पीपी-१४) पर्यंत पोहोचणे कठीण व्हावे या दृष्टीने चीन चाली खेळत आहे. तर दुसरीकडे पूर्व लडाखमधील गावकऱ्यांनीही चीन खेळत असलेल्या या चालींबाबत माहिती दिली आहे. पँगाँग सरोवराजवळ चीनचे बांधकाम तीव्र गतीने सुरू असल्याचे गावकऱ्याचे म्हणणे आहे.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, गलवान खोऱ्यात चीन करत असलेल्या बांधकामामुळे भारतीय सेनेला अनेक अडणींचा सामना करावा लागणार आहे. चीनने हे नवे बांधकाम गलवान आणि श्योक नदीच्या संगमावर केले आहे.

पीपी-१४ पर्यंतचा रस्ता केला ब्लॉक

चीनने हे बांधकाम अतिशय जलदगतीने केले आहे. या बांधकामांमध्ये सैनिकांसाठी राहण्याची व्यवस्था आणि इतर बांधकामांचा समावेश आहे. येथून पीपी-१४ पर्यंत पायी रस्ता जातो. या मोार्गावर अनेक दशकांपासून भारतीय सैनिक गस्त घालत आले आहेत. हा एक किमीचा रस्ता वापरणे चीनी सैनिकांना कठीण जाऊ नये यासाठी चीन हे बांधकाम करत असल्याचे स्पष्ट होत आहे. भारत आणि चीन दरम्यान अनेक ठिकाणांवरून आपले सैन्य मागे घेत असताना आता मात्र वाय नाल्याजवळ चीनी सैन्य बांधकाम करत आहे.

रात्री स्पष्ट दिसते रस्ते निर्मितीचे काम

चीनी सैनिक केवळ गलवानमध्येच नाही, तर पँगाँग सरोवराच्या आसपास फिंगर परिसरात देखील तैनात आहेत अशी माहिती गलवानच्या आसपास राहणाऱ्या गावकऱ्यांनी इकॉनॉमिक टाइम्सला माहिती देताना सांगितले आहे. आमच्या गावातून चीनी तळ आणि चीन करत असलेले बांधकाम आणि रस्ते निर्मितीचे काम रात्रीच्या वेळेस स्पष्टपणे दिसते असेही गावकऱ्यांनी माहिती देताना सांगितले.

परिस्थिती सामान्य होण्यासाठी लागणार वेळ

चीन एका ठिकाणाहून आपले सैन्य हटवून दुसरीकडे वळवत आहे. हे पाहता सीमेवरील परिस्थिती सामान्य होण्यासाठी काही कालावधी लागेल, असे सीमेवरील हालचालींवर लक्ष ठेवून असणाऱ्या सूत्रांनी माहिती देताना सांगितले. पँगाँग सरोवराजवळूनही चीनने आपले सैनिक अजूनही मागे हटवलेले नाही. कल्ल्त, मान आणि मरकच्या लोकांनी चीनी सैनिकांना नावांमध्ये बसून फिंगर-४ भागात येताना पाहिलेले असल्याचा दावा पूर्व लडाखचे भाजपचे नगरसेवक ताशी नामग्याल यांनी केला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Made in India Metro: पहिलीच स्वदेशी मेट्रो २७ जानेवारीला मुंबईत – first india made metro will be in mumbai on 27 january

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईलाखो मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या मेट्रो दोन अ आणि सात या मार्गावरील, स्वदेशी बनावटीच्या पहिल्याच मेट्रो ट्रेनच्या (रोलिंग स्टॉक) निर्मितीचे...

LIVE : गडचिरोलीत दुसऱ्या टप्प्यातील 150 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स Source link

Recent Comments