Home विदेश India China border news: India China standoff लडाखमध्ये चीनकडून 'अशी' सुरू आहे...

India China border news: India China standoff लडाखमध्ये चीनकडून ‘अशी’ सुरू आहे दगाबाजी; सॅटेलाइट फोटोतून खुलासा – India China Tension China Built New Structures Near Site Of Galwan Valley And Ladakhलडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर झालेल्या हिंसाचारानंतर भारत आणि चीनमध्ये तणाव वाढला होता. तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सैन्य मागे घेण्याबाबत सहमती झाली असली तरी चीनच्या मनसुब्यांबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. चीनच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक असल्याचे समोर आले आहे. फक्त गलवान खोरेच नव्हे तर चीनने लडाख पूर्व भागातील इतर ठिकाणीही आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे समोर आले आहे.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी चीनकडून भारतासोबत लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला लडाख पूर्वमधील पँगोंग त्सो तलाव परिसर, गलवान खोरे आणि अन्य दुसऱ्या ठिकाणीदेखील सैन्याची कुमक वाढवली आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, चीनने गलवान खोऱ्यातही आपल्या सैन्याची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. सॅटेलाइट फोटोमधूनही याचा खुलासा झाला आहे. गलवान खोऱ्यात ज्या ठिकाणी भारतीय जवान शहीद झाले, त्या ठिकाणी चीनने बांधकाम केले असल्याचे समोर आले आहे.

पेट्रोलिंग पॉईंट १४ जवळ बांधकाम

भारताच्या विरोधानंतरही चीनच्या सैन्याने पुन्हा एकदा पेट्रोलिंग पॉईंट १४ जवळ बांधकाम केले असल्याचे समोर आले आहे. मागील काही दिवसांमध्ये चीनने गलवान खोऱ्यावर आपला दावा केला आहे. भारताने हा दावा फेटाळून लावला आहे. पँगोंग त्सो आणि गलवान खोऱ्याशिवाय देमचॉक, गोगरा हॉट स्प्रिंग आणि दौलत बेग ओल्डीमध्येदेखील आमने सामने आले आहेत. चीनने मोठ्या प्रमाणावर सैन्य जमवून प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या हद्दीत घुसखोरी केली आहे.

१५ जूननंतर रिकामी होती पोस्ट

maharashtra times

पेट्रोलिंग पॉईंट १४ जवळ १५ जून रोजी हिंसक संघर्ष झाल्यानंतर चीनने ही पोस्ट रिकामी केली होती. या ठिकाणी फार कमी चिनी सैन्य तैनात होते. त्याच दरम्यान, चर्चेच्या आड चीनने पु्न्हा एकदा या पोस्टवर आपल्या सैन्याची संख्या वाढवली. इतकंच नव्हे तर या पोस्टपर्यंत चीनने एका रस्त्यादेखील बनवला आहे. त्यामुळे अवजड वाहनांचीही वाहतूक जलदपणे करता येऊ शकते.

चीनकडून रस्त्याचे बांधकाम

maharashtra times

चीनने पेट्रोलिंग पॉईंट १४ पर्यंत येण्यासाठी एक रस्ता बनवला आहे. सॅटेलाइट फोटोमधून याचा खुलासा झाला आहे. चीनने नदीच्या किनाऱ्यावरील प्रवाहाला रोखून हा रस्ता बनवला आहे. या रस्त्याच्या कडेला चिनी सैन्याचे अनेक आउटपोस्ट दिसून येत आहेत. त्याशिवाय चीनच्या मोठ्या मशिन्स देखील दिसत आहेत.

काराकोरम घाट आणि दौलत ओल्ड बेगीवर चीनची नजर

maharashtra times

सूत्रांच्या माहितीनुसार, पँगोंग त्सो तलाव परिसर आणि गलवान खोऱ्यानंतर चीनने दौलत बेग ओल्ड परिसरात भारतीय लष्कराच्या गस्ती पथकाला अडथळा निर्माण करत आहे. चीनने दौलत बेग ओल्डी आणि डेस्पांग सेक्टरमध्ये तंबू उभारले आहेत. चिनच्या सैन्याने हालचाली वाढवल्या आहेत. जूनच्या सॅटेलाइट फोटोमधून याचा खुलासा झाला आहे. तर, चीनच्या आगळीकला उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्यानेही कंबर कसली आहे.

चिनी सैन्य मागे हटले नाही

maharashtra times

अमेरिकन स्पेस टेक्नोलॉजी फर्म मॅक्सार टेक्नोलॉजीसच्या सॅटेलाइट फोटोनुसार, चीनच्या सैन्याने गलवान खोऱ्यातून माघार घेतली नाही. इतकच नाही तर, चीनला काराकोरम घाट परिसरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. सामरीकदृष्ट्या हा घाट भाग अतिशय महत्त्वाचा आहे.

चीनसोबत ‘या’ ठिकाणी वाद!

maharashtra times

पँगोंग त्सो आणि गलवान खोऱ्याशिवाय दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये लडाख पूर्व भागातील देमचोक, गोगरा हॉट स्प्रिंग आणि दौलत बेग ओल्डी या परिसरातही वाद सुरू आहे. मोठ्या संख्येने चिनी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ जमवाजमव केली आहे. त्याशिवाय चीनने अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि उत्तराखंडमध्येदेखील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ महत्त्वाच्या ठिकाणी सैनिकांची संख्या वाढवली असून शस्त्रास्त्रे ही तैनात केली आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Uddhav Thackeray On Maharashtra Budget 2021: Uddhav Thackeray: महाराष्ट्र मोठी भरारी घेईल!; मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेला दिला ‘हा’ विश्वास – maharashtra will take a...

हायलाइट्स:कृषी, पायाभूत सुविधांची कामे तसेच उद्योग व गुंतवणुकीला अधिक चालना मिळणार.महाराष्ट्र येत्या वर्षात मोठी भरारी घेईल, असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विश्वास.करोना काळातही १...

खोट्या कारणांचा विनाकारण आधार…

: केलंय म्हणजे मूल जन्माला घालायलाच हवं, हा समज खोडून काढत गेल्या काही वर्षांमध्ये अनेक महिलांनी जाणीवपूर्वक मूल न होऊ देण्याचा...

water of sewage treatment plant: ‘एसटीपी’चे पाणी होणार आणखी शुद्ध – water of sewage treatment plant will be further purified by aurangabad municipal corporation

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादमहापालिकेकडून येत्या काळात सीवरेज ट्रीटमेंट प्लांटचे (एसटीपी) पाणी अधिक शुद्ध करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार...

Recent Comments