Home देश India china Border Tension: चिनी सैनिकांनी जवानांना ताब्यात घेतल्याचे वृत्त भारतीय लष्कराने...

India china Border Tension: चिनी सैनिकांनी जवानांना ताब्यात घेतल्याचे वृत्त भारतीय लष्कराने फेटाळले – indian army said there has been no detention of indian soldiers​ at the china border


नवी दिल्लीः भारत आणि चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून सीमेवर तणाव आहे. यातच दोन्ही देशातील सैनिकांदरम्यान झटापट होऊन चीनने काही भारतीय जवानांना ताब्यात घेतलं आणि नंतर त्यांना सोडलं, असं वृ्त देण्यात आलं होतं. पण भारतीय लष्कराकडून यावर भूमिका स्पष्ट केली आहे. भारतीय जवानांना चिनी सैनिकांनी ताब्यात घेतल्याची कुठलीही घटना झालेली नाही, असं लष्कराकडून सांगण्यात आलंय. तसंच अशा प्रकारच्या वृत्तांनी देशहिताला ठेच पोहोचू शकते, असंही लष्करानं म्हटलंय.

चिनी सैनिकांनी भारतीय लष्कराच्या जवानांना ताब्यात घेतलं नाही. तसंच त्यांची शस्त्रंही हिसकावली नाहीत, असं सांगत चिनी सैनिकांनी काही भारतीय जवानांना ताब्यात घेतल्याचं वृत्त लष्कराच्या प्रवक्त्याने फेटाळून लावलं आहे. तसंच अशा वृत्तांमुळे देशहिताचं नुकसान होऊ शकतं, असं स्पष्ट केलं. दरम्यान, चिनी सैन्याने गेल्या दोन आठवड्यात गॅल्वान खोऱ्यात १०० तंबू उभारले आहेत. तसंच बंकर बनवण्यासाठी मशिनरीही आणण्यात येत आहे. दुसरीकडे भारतीय लष्करानेही पँगोंग आणि गल्वान खोऱ्यात जवानांची संख्या वाढवत आहे. अनेक ठिकाणी चीन पेक्षा उत्तम स्थितीत भारत आहे, असं वृत्त पीटीआयने दिलं आहे.

सीमेवर चीनकडून शक्तिप्रदर्शन?

चीनने सीमेवर मोठ्या संख्येत बॉर्डर डिफेन्स रेजिमेंट (BDR)च्या जवानांना तैनात केलं आहे. भारतानेही ‘मिरर डिप्लॉयमेंट’ची रणनिती अवलंबली आहे. जेवढे चिनी सैनिक तेवढे्या भारतीय जवानांना तैनात करण्यात येत आहे. चीनने फक्त सैनिक वाढवलेले नाहीत. लेक परिसरात नावांची संख्याही वाढवली आहे. गल्वान खोऱ्यात हेलिकॉप्टर्सद्वारे टेहळणीही केली जात आहे. द प्रिंटच्या वृत्तानुसार चीनने या भागात १३०० सैनिक तैनात केल्याचं सांगण्यात येतं. त्यानुसार भारतानेही जवानांची संख्या वाढवली आहे. लेहमध्ये भारताने काही इन्फंट्री डिव्हिजनच्या जवानांना सीमेवर तैनात केले आहे. अनेक बटालियन लडाखमध्ये तैनात करण्यात येत आहेत, असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

सीमेवर असा वाढत गेला तणाव

५ मे रोजी लडाखच्या पूर्व भागात जवळपास २५० चिनी सैनिक आणि भारतीय जवान भिडले. यात दोन्ही बाजूचे जवळपास १०० जवान जखमी झाले. यानंतर काही दिवसांनी सिक्कीमच्या उत्तर भागात दोन्ही देशांचे सैनिक भिडले. यानंतरही लडाखच्या पूर्व भागात तणाव कायम आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pm modi interacts with startups: नवीन स्टार्टअपसाठी १ हजार कोटींचा फंड; PM मोदी म्हणाले, ‘आमचा फोकस तरुणांवर’ – pm modi interacts with startups during...

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'प्रारंभः स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय समिट'ला संबोधित केले. वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन...

Recent Comments