Home विदेश India China Border Tension News: India China भारत-चीन व्यापारातही तणाव; भारतीय माल...

India China Border Tension News: India China भारत-चीन व्यापारातही तणाव; भारतीय माल चीनच्या बंदरात अडकला – India China Border Tension China Hong Kong Customs Hold Consignments From India


बीजिंग: भारत आणि चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणावाचे पडसाद आता व्यापारावरही उमटू लागले आहेत. भारतात चीनमधून येणाऱ्या वस्तूंची कडक तपासणी सुरू असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर चीनमध्येही भारतातून येणाऱ्या वस्तू बंदरात अडकून ठेवल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. चीनसह हाँगकाँगमधील बंदरावर भारतीय वस्तू कस्टम विभागाने अडवून ठेवल्याचा आरोप भारतीय निर्यातदारांनी केला आहे.

या प्रकरणी भारतातील निर्यातदारांनी वाणिज्य मंत्रालयाला पत्र लिहून मार्ग काढण्याची विनंती केली आहे. भारतातून येणाऱ्या माल चीन आणि हाँगकाँग कस्टमचे अधिकारी अडवून ठेवत आहेत. कंटेनरमधील सर्वच वस्तूंचे परीक्षण करण्यात येत आहे. त्यामुळे कंटेनरमधील वस्तू बाजारात जाण्यामध्ये अडचणी निर्माण होत असल्याचे निर्यातदारांनी म्हटले आहे. तपासणीबाबतचे कोणतेही अधिकृत आदेश आम्हाला मिळाले नाहीत. मात्र, तरीदेखील सर्वच वस्तू तपासण्यात येत असल्यामुळे बंदरावर भारतीय माल असलेल्या कंटेनरची संख्या वाढतच आहे. चीन आणि हाँगकाँगमधील प्रकार हा भारतीय कस्टम विभागाने सुरू केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत भारत किंवा चीन हे दोन्ही देशांच्यावतीने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

वाचा: चीनला अद्दल घडवा! अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर

वाचा: चीनचा माल बंदरावरच अडकला; अमेरिकन कंपन्याही धास्तावल्या

चीनमधून येणाऱ्या मालाची तपासणी

देशातील काही बंदरावर, विशेषतः चेन्नई आणि मुंबई बंदरावर चीनमधून आलेला माल पडून आहे. येत्या काही दिवसात हा माल कस्टम प्रक्रियेतून क्लिअर करण्यासाठी विलंब होणार असल्याचे संकेत कस्टम विभागाने दिले आहेत. पण यासाठी कोणतंही कारण देण्यात आलेलं नाही. कस्टम किंवा केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ आणि कस्टमने कोणतंही लेखी किंवा तोंडी कारण सांगितलेलं नाही. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर तपासणी केली जात असल्याचं चेन्नई कस्टम विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. आयातदार आणि उद्योग याकडे त्यांचा आयात पॅटर्न बदलण्याचा डाव म्हणून पाहत आहेत. तर, दुसरीकडे भारताने चीनकडून आलेला माल हा जाणीवपूर्वक अडवला जात असल्याची आरोप आहे. भारतात चीनविरोधात रोष निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर या घटनांकडे पाहिले जात आहे.

आणखी वाचा:
विमानतळ ते बंकरचे बांधकाम; भारताविरोधात चीनकडून पाकिस्तानचा वापर?
लडाख: चीनकडून ‘अशी’ सुरू आहे घुसखोरी; सॅटेलाइट फोटोतून खुलासाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Hazaribagh: आदिवासी विद्यार्थिनीला हेडमास्तरने पुस्तक घेण्यासाठी घरी बोलावले, त्यानंतर… – tribal girl student raped in hazaribagh in jharkhand

हजारीबाग: झारखंडमधील दुमका, खुंटीसह अन्य ठिकाणी घडलेल्या घटनांनंतर आता हजारीबागमध्ये आदिवासी विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कटकमदाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत खीरगढा...

Sanjay Raut: ‘राज्याचा कारभार देशात एक नंबर; बाळासाहेब नक्कीच आशीर्वाद देत असतील’ – sanjay raut pays tribute to balasaheb thackeray on his birth anniversary

मुंबईः 'आज बाळासाहेबांचा आमच्यासाठी जन्मदिवस असून आजही बाळासाहेब आमच्या सोबत आहेत. आज जे काही महाराष्ट्राचे, शिवसेनेचं, महाविकास आघाडीचं चाललं आहे त्यामागे बाळासाहेबांचा आशीर्वाद...

Recent Comments