Home विदेश india china clash: India China गलवान हिंसा: चिनी सैन्याच्या 'या' पथकाने केला...

india china clash: India China गलवान हिंसा: चिनी सैन्याच्या ‘या’ पथकाने केला भारतीय जवानांवर हल्ला! – china sent martial artists to india border before deadly clash


बीजिंग: लडाखमधील गलवान खोऱ्यात १५ जून रोजी भारतीय जवानांवर हल्ला झाला होता. या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर भारत आणि चीन दरम्यान दोन्ही देशातील तणाव वाढला आहे. या घटनेच्या काही दिवस आधी चीनने माउंटन डिव्हिजन आणि मार्शल आर्टमध्ये माहीर असलेल्या खास सैनिकांना तैनात केले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भारतीय जवानांवर हल्ला पूर्वनियोजित असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

चीन सरकारच्या नॅशनल डिफेन्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, १५ जून आधी तिबेटची राजधानी ल्हासामध्ये चिनी सैन्याने पाच नवीन मिलिशीया डिव्हिजनला तैनात केले होते. यामध्ये चीनच्या माउट एव्हरेस्ट ऑलिम्पिक टॉर्च रिले संघाच्या माजी सदस्यांसह मार्शल आर्ट क्लबच्या सदस्यांचा सहभाग होता. त्यांच्यामुळेच सीमेवर हिंसाचार झाला असल्याचे समोर आले आहे. चिनी सैन्यात माउंट एव्हरेस्ट ऑलिम्पिक टॉर्च रिले टीमचे सदस्य डोंगरावर चढाई करण्यास माहीर आहेत. तर, मार्शल आर्ट क्लबचे सदस्य हे घातपात करणारे असतात. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार न करण्याचा नियम आहे. त्यामुळे चीनने या घातपात करणाऱ्यांची नेमणूक केली असल्याची चर्चा आहे.

वाचा: भारत-चीन तणाव: इस्राएलकडून भारताला मिळणार सुरक्षाकवच!
वाचा:
लडाखमध्ये चीनकडून ‘अशी’ सुरू आहे घुसखोरी; सॅटेलाइट फोटोतून खुलासा

पारंपरीक युद्ध लढण्यात विशेष कौशल्य

हे तिबेटीयन मार्शल आर्ट करणारे लाठी-भाले, रॉडच्या माध्यमातून युद्ध करण्यास सक्षम असतात. अशा घातपाती कारवाया करणाऱ्या तरुणांना चीनकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाठवले जात आहे. ‘पिपल्स डेली’च्या वृत्तानुसार, तिबेटच्या पठारी भागात चिनी सैन्याला काटेरी वस्तू, काठ्यांपासून लढण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. चीन आता या सैनिक नसलेल्यांकडून सीमावाद वाढवण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे.

वाचा: भारत-चीन व्यापारातही तणाव; भारतीय माल चीनने अडवला!

भारत आणि चीनमध्ये १९९६ आणि २००५ मध्ये झालेल्या करारानुसार दोन्ही देशांचे लष्करी गस्ती पथक समोरासमोर आल्यास गोळीबार करता येणार नाही. त्याशिवाय प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या परिघात दोन्ही गस्ती पथकाला रायफलच्या नळी टोक जमिनीच्या दिशेने ठेवणे बंधनकारक आहे.

आणखी वाचा:
द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट; कंपन्यांचा फेसबुकवर बहिष्कार
विमानतळ ते बंकरचे बांधकाम; भारताविरोधात चीनकडून पाकिस्तानचा वापर?Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

cm uddhav thackeray: चैत्यभूमीला घरातूनच अभिवादन करा – cm uddhav thackeray has appealed give tribute to dr babasaheb ambedkar on 6 december from home

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमहापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या अभिवादनासाठी ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व...

Recent Comments