Home शहरं मुंबई India China Dispute : आता मुंबईतील हॉटेल, गेस्ट हाऊसमध्ये चिनी नागरिकांना नो...

India China Dispute : आता मुंबईतील हॉटेल, गेस्ट हाऊसमध्ये चिनी नागरिकांना नो एन्ट्री!; लवकरच निर्णय – India China Dispute: Decision On No Entry For Chinese Citizens In Mumbai Hotels Soon!


मुंबई: भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या मागणीने जोर धरलेला असतानाच आता मुंबईतील हॉटेल आणि गेस्ट हाऊसमध्ये चिनी नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. त्याबाबतचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. ( no entry for chinese citizens in mumbai hotels soon)

मुंबईतील फाइव्ह स्टार हॉटेल्स वगळता हॉटेल्स आणि रेस्टॉरंटच्या मालकांनी आधीच चिनी सामानांवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. मात्र, चिनी नागरिकांना रुम देण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. मुंबईतील हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये चिनी सामानांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. चिनी नागरिकांना हॉटेल आणि गेस्ट हाऊसमधील रुम भाड्याने देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असं हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष दिलीप दतवानी यांनी सांगितलं.

याबाबत शनिवारी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम हाती घेतली आहे. भारतीय सामान- हमारा अभिमान अशी मोहीमच या संस्थेने हाती घेतली आहे. दिल्लीच्या हॉटेल अँड रेस्टॉरंट ऑनर्स असोसिएशनने चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणार असल्याची घोषणा केल्यानंतर या मोहिमेला अधिकच बळ मिळालं. दिल्लीतील हॉटेल चालकांनी तर चिनी नागरिकांना हॉटेलमधील रुमही नाकारल्या होत्या. त्यामुळे चिनी नागरिकांविरोधातील असंतोष वाढण्यास अधिक चालना मिळाली होती.

मराठा, शीख रेजिमेंट सीमेवर तंबाखू चोळत बसल्या होत्या का; सेनेचा सवाल

भारताने आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद ठेवली आहे. मात्र भविष्यात ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. चिनी नागरिक केवळ दिल्लीतच नव्हे तर मुंबई, पुणे, आग्रा आणि बंगळुरू सारख्या शहरात पर्यटनासह व्यवसायाकरिता येत असतात. त्यामुळे या चिनी नागरिकांना हॉटेल आणि गेस्ट हाऊसमध्ये रुम मिळू नयेत म्हणून आम्ही या शहरांतील सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंट मालकांना भेटणार आहोत. त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे. दिल्ली आणि मथुरामधील हॉटेल चालकांच्या संस्थांनी आम्हाला पूर्ण पाठिंबाही दिला आहे. मात्र, मुंबईबाबत काही सांगणे घाईचं ठरेल, असं कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे अध्यक्ष बीसी भारतीया यांनी सांगितलं. तर मुंबईच्या हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या मालकांना या अभियानाशी जोडून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्याशी चर्चाही सुरू आहे, असं या संस्थेचे राष्ट्रीय संयोजक नितीन केडिया यांनी सांगितलं.

आता तुम्ही कारमध्ये पेट्रोल भरत नाही का?; बिग बी मौन सोडा: आव्हाडSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

coronavirus in aurangabad: करोनाचे ३४ रुग्ण; एकाचा मृत्यू – aurangabad reported 34 new corona cases and 1 death in yesterday

औरंगाबाद: जिल्ह्यात शुक्रवारी ३४ करोनाबाधितांची वाढ झाली. त्यात शहरी विभागात ३२, तर ग्रामीण भागात दोन रुग्णांचा समावेश आहे. शहरातील खासगी रुग्णालयात सिल्लोड तालुक्यातील...

Mamata Banerjee: ‘जय श्रीराम’च्या घोषणा; ममता बॅनर्जी संतापल्या, म्हणाल्या… – wb cm mamata banerjee anguish after jai shree ram slogans were raised

कोलकाताः नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कोलकात्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान मोदी यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या...

Recent Comments