Home देश india china face off: चीनने राजीव गांधी फाउंडेशनला पैसे का दिले? सोनिया...

india china face off: चीनने राजीव गांधी फाउंडेशनला पैसे का दिले? सोनिया गांधींना भाजपचा थेट सवाल – what transpired between the rajiv gandhi foundation and the chinese government? bjp chief jp nadda


नवी दिल्लीः भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधींवर निशाणा साधला. नड्डा यांनी सोनिया गांधींना १० प्रश्न केले. करोना संकट आणि चीनशी सुरू असलेल्या तणावाच्या कारणावरून सोनिय गांधींनी मूळ प्रश्नांपासून पळ काढू नये. देशाची आणि आपली सुरक्षा करण्यात भारतीय सैन्य सक्षम आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देश सुरक्षित आहे, असं जे. पी. नड्डा म्हणाले.

काँग्रेसने सत्ते असताना काय काय कामं केली? हे देशाच्या १३० कोटी जनतेला कळायला हवं. काँग्रेसने देशाचा विश्वासघात कसा केला. चीन आणि काँग्रेसच्या घनिष्ट संबंधांवर नड्डांनी यांनी प्रश्न उपस्थित केला. राजीव गांधी फाउंडेशनला चीनने पैसे का दिले? असं नड्डा म्हणाले.

नियम डावलून पैसा घेतला?

काही दिवसांपूर्वी ट्विट करून आपण राजीव गांधी फाउंडेशनच्या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित केले होते. आता चिदम्बरम म्हणातेहत फाउंडेशन पैसे परत करेल. देशाचे माजी अर्थमंत्री यांनी हे सांगून पैसा मिळाल्याचं स्वीकार केलंय. पण देशाच्या हिताविरोधात फाउंडेशनने नियम डावलून पैसे का घेतले? याचा उत्तर काँग्रेसने द्यावं, असं आव्हान नड्डा यांनी दिलं.

काँग्रेसचे कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाशी संबंध कसे?

रिजनल कॉम्प्रिहेन्सिव इकॉनॉमिक पार्टनरशिप ( RCEP) देशाचे शेतकरी, MSME क्षेत्र आणि कृषी क्षेत्राच्या हिताची नाही. यामुळे पंतप्रधान मोदी त्यात सहभागी झाले नाहीत. मग RCEP मध्ये सहभागी होण्याची काय गरज होती? चीनसोबत भारताचा व्यापारी तोटा १.१ बिलियन अमेरिकी डॉलरवरून वाढून ३६.२ बिलियन अमेरिकी डॉलवर कसा झाला? काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनामध्ये कुठले संबंध आहेत? हे जनतेला कळायलाच हवं, असं नड्डा म्हणाले.

…तेव्हाच LAC वर तणाव संपुष्टात येईल, भारताची चीनला समज!

पंतप्रधान मदत निधीचा पैसा आरजीएफमध्ये का वळवला?

२००५-२००८ दरम्यान पंतप्रधान मदत निधीतून राजीव गांधी फाउंडेशन (RGF) मध्ये पैसे का वळवले? यूपीए सरकारच्या काळात अनेक केंद्रीय मंत्रालयं, सेल, गेल, एसबीआय आणि इतरांवर राजीव गांधी फाउंडेशनमध्ये पैसे जमा करण्यासाठी का दबाव टाकला गेला? देशाच्या जनतेला या मागचं कारण कळलं पाहिजे, असं नड्डा म्हणाले.

चीन सैनिकांच्या बॅगेत लोखंडी रॉड; घातपाताच्या तयारीनिशीच गस्त

घोटाळेबाज मेहुल चोक्सीने पैसे का दिले?

राजीव गांधी फाउंडेशनने घोटाळेबाज मेहुल चौक्सीकडून पैसे का घेतले? मेहुल चोक्सीला कर्ज देण्यात मदत का केली गेली? या सर्व प्रश्नांची उत्तरं काँग्रेसने देशाला द्यावी, असं भाजप अध्यक्ष नड्डा यांनी सांगितलं.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments