Home देश india china face off: जय जवान! फक्त ६ दिवसांत उभारला तो तुटलेला...

india china face off: जय जवान! फक्त ६ दिवसांत उभारला तो तुटलेला पूल; लष्कराची अडचण दूर – india china face off bro builts new bailey bridge in pithoragarh’s munsyari


पिथोरागढः उत्तराखंड पिथोरागढमधील मुनस्यारी येथे ६ दिवसांपूर्वी नाल्यावरील एक पूल तुटला होता. मुनस्यारी येथून मिलम जाणाऱ्या मार्गावर धापाजवळ असलेल्या सेनर नाल्यावर बनवण्यात आलेला पूल तुटला होता. एका मोठ्या ट्रकवरून पोलंड मशिन घेऊन जात असताना पूल तुटला. त्यात दोन जण गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने (BRO) कठोर परिश्रम घेत त्याच ठिकाणी फक्त ६ दिवसांत नवीन पूल उभारला. हा पूल उभारण्यात बीआरओला अनेक भौगोलिक समस्यांचा सामना करावाला लागला. पण बीआरओने दिवस-रात्र काम करून फक्त ६ दिवसांत विक्रमी वेळेत हा पूल उभारला.

चीनने राजीव गांधी फाउंडेशनला पैसे का दिले? सोनिया गांधींना भाजपचा थेट सवाल

७० कामगार ६ दिवसांत १२० फूट लांब पूल उभारला

हा पूल उभारला गेल्याने भारतीय लष्कर आणि आयटीबीपीच्या जावनांसमोर मोठी अडचण दूर झाली आहे. यामुळे जवानांना चीन सीमेवर वेळेत जाता पोहोचता येणार आहे. ७० कामगार आणि एका पोकलँड मशिनद्वारे हा १२० फूट बेली पूल उभारण्यात आला.

पूर्व लडाखमध्ये चीन सीमेवर भारताने उभारली एअर डिफेन्स सिस्टिम

चीन सीमेवर जाण्यासाठी महत्त्वाचा पूल

मुनस्यारीतील धापाजवळचा हा पूल सामरीक दृष्ट्या लष्करासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तसंच हा पूल सीमाभागातील मिलम गावाला उत्तराखंडशी जोडतो. मिलम येथून चीन सीमेपर्यंत ६५ किलोमीटरच्या रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. हे काम वेगाने केले जात आहे. यासाठी टेकड्या फोडणं आणि ढिगारा उपसण्यासाठी अवजड मशिनची आणि बांधकामाच्या सामानाची गरज आहे. हे सामना या पुलावरून मिलम येथे पोहोचवण्यात येत आहे. पूल तुटल्याने चीन सीमेला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामावर परिणाम झाला होता. पण बीआरओने हा रस्ता ६ दिवसांत उभारून लष्कराला मोठा दिलासा दिला आहे.

पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात असतानाचा फोटो

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार सीमा भागातील महत्त्वाच्या रस्त्यांचे बांधकाम वेगाने पूर्ण करण्यात येणार आहे. यात सीमा भागातील अनेक रस्त्यांचे काम बीआरओकडे आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments