Home देश india china face off: पूर्व लडाखमध्ये चीन सीमेवर भारताने उभारली एअर डिफेन्स...

india china face off: पूर्व लडाखमध्ये चीन सीमेवर भारताने उभारली एअर डिफेन्स सिस्टिम – india china face off india moves defence missile systems into ladakh


नवी दिल्लीः पूर्व लडाखमध्ये चीनने सीमेवर मोठ्या संख्यने सैनिकांची तैनाती केली आहे. या मागचा चीनचा इरादा स्पष्ट आहे. चीनला प्रत्यक्ष ताबा रेषेवरून ( LAC) लवकर मागे हटायचं नाहीए. चीनने एलएसीवर लढाऊ विमानं तैनान केली आहे. तसंच सीमेवर अतिशय जवळून ही विमानं घिरट्या घालत आहेत. चिनी सैन्यवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय हवाई दलाने तयारी केली आहे. चिनी विमानांच्या कुठल्याही हरकतीला उत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाने एअर डिफेन्स सिस्टिम तैनात केली आहे. संपूर्ण सीमेवर आता अॅडव्हान्स क्विक रिअॅक्शनची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र तैनात करण्यात आली आहेत. यामुळे हल्ल्याच्या प्रयत्न झाल्यास चीनच्या कुठल्याही विमानाला टिपता येईल आणि त्या विमानाच्या चिंधड्या उडतील.

LAC वर चीनच्या संशयास्पद हालचाली

गेल्या दोन आठवड्यांपासून चिनी हवाई दलाची सुखोई-३० आणि आपली स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स विमानं LAC ला लागून तैनात केली आहेत. ही विमानं LAC च्या १० किलोमीटर अंतरावर उड्डाणं घेताना दिसून येत आहेत. यानंतर भारताने सीमेवर एअर डिफेन्स सिस्टिम तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. चिनी सैनिकांची वाढती संख्या आणि शस्त्रास्त्रे पाहता भारतीय लष्कर आणि हवाई दल या दोघांनी आपल्या एअर डिफेन्स सिस्टिम तैनात केल्या आहेत. यामुळे चिनी विमानं आणि हेलिकॉप्टर्सना उत्तर देता येईल, अशी माहिती सरकारमधील सूत्रांनी दिल्याचं एएनआयनं म्हटलंय.

कुठलंही क्षेपणास्त्र उद्ध्वस्त करण्यात भारत सक्षम

लष्कराने पूर्व लडाखमध्ये ‘आकाश’ क्षेपणास्त्र तैनात केली आहेत. ही क्षेपणास्त्र कुठलंही लढाऊ विमान किंवा ड्रोनाला हवेतच उद्ध्वस्त करू शकतं. ही क्षेपणास्त्र मॉडिफिकेशन आणि अपग्रेड केलेली आहेत. पर्वत रांगामध्येही त्याद्वारे अचूक मारा करता येऊ शकतो. रशियाकडून भारताला लवकरच S-400 ही क्षेपणास्त्र प्रणाली मिळणार आहे. यानंतर संपूर्ण भागात भारताला अधिक सहजनेते हवाई टेहळणी करता येईल. पूर्ल लडाखमध्ये हवाई दलाने लढाऊ विमानं आधीच तैनात केली आहेत.

तणावाच्या ठिकाणी चिनी विमानांच्या घिरट्या

चिनी लढाऊ विमानं LAC अतिशय जवळून घिरट्या घालत आहेत. ज्या-ज्या ठिकाणी सीमेवर भारत-चीनमध्ये तणाव आहे त्या भागांमध्ये तिथ्या भागांमध्ये चिनी विमानं घिरट्या घालत आहेत. घलवान खोऱ्यातील पेट्रोलिंग पॉइंट १४, १५, १७ आणि १७ ए (हॉट स्प्रिंग) सह दौलत बेग ओल्डिमध्येही चिनी विमानं उडाताना दिसत आहेत. याशिवाय पँगाँग लेक आणि फिंगर एरियातही चिनी विमानं उडत आहेत. टेहळणीत जी काही कमतरता होती ती भारताने दूर केली आहे. आता कुठलाही भाग सुरक्षा दलांच्या नजरेपासून दूर नाही.

चीनने राजीव गांधी फाउंडेशनला पैसे का दिले? सोनिया गांधींना भाजपचा थेट सवाल

चीन सैनिकांच्या बॅगेत लोखंडी रॉड; घातपाताच्या तयारीनिशीच गस्त

मेपासून लडाखमध्ये तैनात आहेत सुखोई

मेमध्ये चिनी सैनिकांनी भारतीय सीमेवत घुसखोरीचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सीमेवर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हवाई दलाने LAC जवळ Su-30MKI ही लढाऊ विमानं तैनात केली आहेत. चिनी विमानं सतत भारतीय हवाई हद्दी जवळून घिरट्या घालत आहेत. यामुळे भारतीय विमानंही सुरक्षेसाठी नियमित उड्डाणं करत आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Pune: धक्कादायक! अंगावरील कपडे उतरवून तरुणाला बेल्टने मारहाण; व्हिडिओही काढला – 36 year old man abducted and beaten by belt in viman nagar pune

म. टा. प्रतिनिधी, पुणे: कर्जाची रक्कम परत न केल्याने तरुणाच्या अंगावरील कपडे उतरवून त्याला पट्ट्याने मारहाण केली. त्या मारहाणीचा व्हिडीओ काढून पैसे न...

nuh: haryana news: ४ मुली मृतावस्थेत आढळल्या, आई तडफडत होती; एका रात्रीत ‘असं’ काय घडलं? – haryana four girls found dead and woman injured...

नूह : हरयाणातील नूह जिल्ह्यात अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. येथील पिपरौली गावात चार मुली मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांचा गळा चिरला होता....

Mount Everest: खरंच भूकंपामुळे माउंट एव्हरेस्टची उंची कमी झाली ? नवी उंची जाहीर होणार – nepal and china to announce revised height of mount...

काठमांडू: नेपाळमध्ये २०१५ साली झालेल्या भूकंपानंतर जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टची उंची घटल्याचा दावा केला जात होता. या दाव्यात किती तथ्य...

banking and financial services fund: मिरे असेटचा नवा फंड खुला; बँकिंग अँड फायनान्शिअल क्षेत्रात गुंतवणुकीची संधी – mirae asset launched banking and financial services...

मुंबई : मिरे असेट इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स इंडिया या देशातील इक्विटी व डेट विभागांतील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या फंड घराण्याने ‘मिरे असेट बँकिंग अँड फायनान्शिअल...

Recent Comments