Home देश India China News: चीनवर होऊ शकते मोठी कारवाई? राम माधव यांनी दिले...

India China News: चीनवर होऊ शकते मोठी कारवाई? राम माधव यांनी दिले संकेत – ram madhav hints action against china


नवी दिल्लीः पूर्व लडाखच्या गलवानमध्ये चिनी सैनिकांच्या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाले. यानंतर चीनला धडा शिकवण्याची मागणी जनतेतून होत आहे. पार्श्वभूमीवर भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. चीनविरोधात कठोर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिलेत. जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहे. यामुळे सरकारच्या मनात निश्चितच कुठलातरी विचार असेल, असं राम माधव म्हणाले.

सरकारचं पुढचं पाऊल काय असेल याची आपण वाट बघूया. जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असं पंतप्रधान मोदी सांगत असतील तर याचा अर्थ नक्कीच व्यर्थ जाणार नाही. चिनी सैनिकांनी सीमेवर भारतीय जवानांचा नरसंहार केला आहे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून सर्वपक्षांनी या घटनेचा निषेध केला पाहिजे, असं राम माधव म्हणाले. यामुद्द्यावर त्यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी ते बोलत होते.

चीन एक इंच जागेवरही ताबा मिळवू शकला नाही

गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक घटनेत भारतीय जवानांनी सीमेचे रक्षण करत बलिदान दिले. सीमेत घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या चिनी सैनिकांना जवानांनी रोखले. यामुळे भारताच्या एक इंच जागेवरही चीनला ताबा मिळवता आला नाही, असं राम माधव म्हणाले.

मैत्री हवी आहे, पण सीमेवर सतर्क राहणार

चिनी सैनिकांनी घुसखोरीचा प्रयत्न केल्यास भारतीय जवान त्यांना रोखतात. चीनसोबत झालेल्या करारामुळे या घटनांमध्ये शस्त्रांचा वापर करता येत नाही. चीनसोबत आपल्याला मैत्री हवी आहे. पण देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी कायम सतर्क राहू. गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांना मागे हटण्यात भारताने बाध्य केले, असं राम माधव म्हणाले. दरम्यान, चीनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावलीय. ही बैठक सुरू आहे.

राजनाथ सिंह मॉस्कोला जाणार; चीनी नेत्यांना भेटणार नाही

अक्साई चीन परत मिळवणं कठीण, पण अशक्य नाही : जामयांग नामग्याल

पंतप्रधान मोदींनी चीनला सुनावले

लडाखच्या गलवान खोऱ्यात एका कर्नलसह २० जवान चिनी सैनिकांच्या हल्ल्यात शहीद झाले. या घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी एक व्हिडिओ संदेश जारी केला होता. शहीद जवानांचे बलिदा व्यर्थ जाऊ देणार नाही. भारताला शांतता हवी आहे. यावर इतरांनी मनात कुठला भ्रम करू नये. आम्ही कुणाला चिथावत नाही. पण चिथावल्यास सणसणीत उत्तर देऊ. भारताला शांतता हवी आहे. पण वीरता आमच्या देशाच्या चरित्राचा भाग आहे, असं मोदींनी चीनला सुनावलं होतं.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

it raid: anurag kashyap : अनुराग कश्यप, तापसी पन्नूसह इतरांनी कोट्यवधींची संपत्ती दडवली! – it raid on two production houses anurag kashyap and taapsee...

नवी दिल्लीः दिग्दर्शक अनुराग कश्यप ( anurag kashyap ), अभिनेत्री तापसी पन्नू ( taapsee pannu ) आणि इतर काही जणांच्या ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने...

Recent Comments