Home देश पैसा पैसा India China News: भारत फास आवळणार; मोदी सरकार चीनचं नाक दाबून तोंड...

India China News: भारत फास आवळणार; मोदी सरकार चीनचं नाक दाबून तोंड उघडणार – India Plans Extra Tariffs And Non Tariff Barriers On 300 Imported Products Says Sources


नवी दिल्ली : सीमेवर कुरापती करणाऱ्या चीनला धडा शिकवण्यासाठी भारताचं दीर्घकालीन धोरण तयार आहे. चीनमधून येणाऱ्या ३०० पेक्षा जास्त उत्पादनांवर आयात शुल्क वाढवण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. देशांतर्गत बाजारपेठेला चालना मिळावी यासाठी हा प्रस्ताव तयार करण्यात आला होता, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. गेल्या एप्रिलपासून हा प्रस्ताव विचारात असल्याचं सरकारी कागदपत्रांमध्ये दिसत असल्याचं रॉयटरने म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारताचाच हा प्रस्ताव एक भाग आहे.

भारताने आम्हाला लेचेपेचे समजू नये; चीनची धमकी

पुढच्या तीन महिन्यात आयात शुल्क हळूहळू वाढवलं जाणार असल्याची माहिती आहे. निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब केलं जात असल्यामुळे एका सरकारी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. दरम्यान, या निर्णयात सहभाग असलेल्या वित्त मंत्रालय आणि वाणिज्य मंत्रालयाने या प्रस्तावावर भाष्य करण्यास नकार दिला.

भारत-चीन तणाव: राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी दिले ‘हे’ आदेश

केंद्र सरकार १६०-२०० वस्तूंवर आयात शुल्क वाढवण्याच्या विचारावर आहे. तर इतर १०० उत्पादनांवर परवानगी अट किंवा कठोर गुणवत्ता नियंत्रण अशा बिगर शुल्क अटी लादल्या जाऊ शकतात. या निर्णयाचा प्रभाव ८ ते १० बिलियनच्या बिगर जीवनावश्यक वस्तूंवर होणार असून भारतीय उत्पादनांना यामुळे फायदा होईल, अशी माहिती या नियोजनाचा भाग असलेल्या एका अधिकाऱ्याने दिली.

‘या’ कारणामुळे चीनकडून भारताला डिवचलं जातंय?

आपल्याला कोणत्याही देशाला लक्ष्य करायचं नाही. पण चीनसारख्या देशांसोबत असलेली प्रचंड व्यापार तूट भरुन काढण्याचा हा मार्ग आहे, असं अधिकाऱ्याने सांगितलं. भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय व्यापार मार्च २०१९ पर्यंतच्या वित्तीय वर्षात ८८ बिलियन होता. तर यामध्ये भारतासाठी ५३.५ बिलियन डॉलर्स एवढी व्यापार तूट आहे. भारताची सध्या सर्वात जास्त व्यापार तूट फक्त चीनसोबतच आहे. भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तूंपेक्षा चीनमधून आयात होणाऱ्या वस्तू जास्त असल्यामुळे ही तूट आहे.

भारत व तैवानसोबत वाद; चीन ‘नाटो’च्या रडारवर!

ताज्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०१९ ते फेब्रुवारी २०२० या काळात चीनसोबत व्यापार तूट ४६.०८ बिलियन एवढी होती. याच प्रकरणाशी संबंधित आणखी एका सूत्राच्या मते, अभियांत्रिकी वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स आणि काही वैद्यकीय उपकरणेही आयात शुल्क वाढीच्या रडारवर आहेत. एसी सारख्या वस्तूंचं गुणवत्ता प्रमाणिकरण करण्यासाठी आता आणखी कडक नियम लावले जाण्याची शक्यता आहे.

मोदी सरकारने २०१४ ला सत्तेत आल्यापासूनच देशांतर्गत निर्मितीवर भर दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून मेक इन इंडिया अंतर्गत आणि गेल्या महिन्यात जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत या मोहिमेंतर्गत देशांतर्गत उत्पादनावर भर दिला जात आहे. फेब्रुवारीमध्ये भारताने इलेट्रॉनिक्स, खेळणी आणि फर्निचरवर आयात शुल्क वाढवलं होतं. परकीय व्यापाराविरोधात हे संरक्षणात्मक पाऊल असल्याची टीका भारतावर झाली होती. भारताने वाढवलेल्या शुल्कामुळे स्वीडनच्या आयकेईएने नाराजी व्यक्त केली होती.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Maharashtra budget session: सब घोडे बारा टक्के… – jata jata by chakor, maharashtra budget session and politics

'नारायण... नारायण...' वैकुंठाच्या दारातच नारदमुनींनी हाळी दिली. 'यावे मुनिवर...' सर्व चॅनेलवर त्याच त्या बातम्या पाहून कंटाळलेल्या भगवान श्रीविष्णूंनी 'आता काही ताजी बातमी मिळणार,'...

Nagpur ZP Election 2021 Latest News: Supreme Court: सुप्रीम कोर्टाच्या ‘या’ आदेशाने नागपूरसह ३ ‘झेडपी’त सत्तेचं गणित बदलणार? – re election will be held...

हायलाइट्स:नागपूर, अकोला आणि वाशीम या जिल्हा परिषदांमधील सत्तेचं गणित बिघडणार.नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव जागांवरील निवडणुका झाल्या रद्द.सर्वोच्च न्यायालयाने या सर्व जागांवर फेरनिवडणुका घेण्याचे...

bjp vs ncp clash in sangli: BJP vs NCP: सांगलीत भाजप-राष्ट्रवादीचं जीवघेणं राजकारण; ग्रामपंचायतीच्या दारात सदस्याचा बळी – clashes between bjp and ncp in...

हायलाइट्स:उपसरपंच निवडीवरून भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत हाणामारीमारहाणीत राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू.कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथील धक्कादायक घटना.सांगली:सांगली जिल्ह्यातील बोरगाव येथे उपसरपंच निवडीच्या वादातून भाजप...

Recent Comments