Home देश पैसा पैसा India China News: Shipments From China Stucked At Indian Ports - चीनचा...

India China News: Shipments From China Stucked At Indian Ports – चीनचा माल बंदरावरच अडकला; अमेरिकन कंपन्याही धास्तावल्या


नवी दिल्ली : प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणजेच एलएसीवरील भारत आणि चीन यांच्यातील संघर्षामुळे भारतात उत्पादन निर्मिती करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांची चिंता वाढली आहे. कारण, उत्पादन बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल चीनमधून येण्यासाठी सध्या मोठे अडथळे येत आहेत. या कंपन्यांच्या प्रतिनिधीने वाणिज्य मंत्रालयाला पत्र लिहिलं असून आपली चिंता कळवली आहे. मुंबई आणि बंदरावर चीनमधून येणारा माल मोठ्या प्रमाणात पडून आहे.

चीनचा भारताला धोका; युरोपातील अमेरिकेच्या फौजा आशियात: USA

देशातील काही बंदरावर, विशेषतः चेन्नई आणि मुंबई बंदरावर चीनमधून आलेला माल पडून आहे. येत्या काही दिवसात हा माल कस्टम प्रक्रियेतून क्लिअर करण्यासाठी विलंब होणार असल्याचे संकेत कस्टम विभागाने दिले आहेत. पण यासाठी कोणतंही कारण देण्यात आलेलं नाही. कस्टम किंवा केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ आणि कस्टमने कोणतंही लेखी किंवा तोंडी कारण सांगितलेलं नाही.

ट्रम्प यांच्या ‘या’ निर्णयाने अमेरिका-रशियात तणाव वाढणार!

एका वृत्तानुसार, गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर तपासणी केली जात असल्याचं चेन्नई कस्टम विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. आयातदार आणि उद्योग याकडे त्यांचा आयात पॅटर्न बदलण्याचा डाव म्हणून पाहत आहेत. केंद्र सरकारने अगोदरच भारतीय बनावटीच्या वस्तूंवर भर दिला आहे. त्यामुळे विशेषतः बिगर जीवनावश्यक वस्तूंची आयात कमी करण्यासाठी भारत प्रयत्न करत असल्याचं बोललं जातंय.

लडाख: चीनकडून ‘अशी’ सुरू आहे घुसखोरी; सॅटेलाइट फोटोतून खुलासा

अमेरिकन कंपन्या धास्तावल्या

अमेरिका-भारत धोरणात्मक भागीदारी फोरमने वाणिज्य मंत्रालयाकडे आपली चिंता व्यक्य केली आहे. या फोरमकडून भारतात उत्पादन निर्मिती करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांचं प्रतिनिधित्व केलं जातं. अमेरिकन कंपन्यांना लागणारा कच्चा माल चीनमधून येतो. किमान स्तरावर का होईना बंदरावरील कामकाज सुरू व्हावं, अशी विनंती या फोरमकडून करण्यात आली आहे. चीनमधून येणाऱ्या अडकून पडलेल्या मालामध्ये टेलिकम्युनिकेशन, ऑटो, वैद्यकीय उपकरणे आणि किरकोळ वस्तू यांचा समावेश आहे.

खळबळजनक! पाकिस्तान जमा करतोय अणवस्त्रे; भारत निशाण्यावर!

भारतात निर्मिती करणाऱ्या जवळपास ५० अमेरिकन कंपन्यांच्या मालाचा यात समावेश आहे. उदाहरणार्थ, काही अमेरिकन दूरसंचार कंपन्यांची भारतात निर्मिती होते, पण या निर्मितीसाठी आवश्यक असलेला माल त्यांना आपल्याच चीनमधून कंपनीतून मागवावा लागतो. सरकारने कोणतीही स्पष्ट सूचना दिलेली नसताना माल अडवला जात असल्यामुळे पारदर्शकतेवरच अमेरिकन कंपन्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून या उद्योगासाठी धोका असल्याचं म्हटलं आहे.

आफ्रिकेतील ‘या’ लहान देशाचा चीनला झटका; अब्जावधींचा रेल्वे प्रकल्प रद्द

शेजारच्या देशातील आयातीवर अनअपेक्षित परिणाम होणं ही चांगली बाब नाही. याचा भारतातील निर्मितीवर परिणाम होईल आणि परकीय गुंतवणूकदारांना चुकीचा संदेश जाईल, अशी चिंता अमेरिकन कंपन्यांच्या फोरमने व्यक्त केली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

L&T Construction Awarded Mega Contract : बुलेट ट्रेन प्रकल्प सुस्साट; ‘लार्सन अँड टुब्रो’ला मिळाले कंत्राट – l&t construction awarded mega contract to build india’s...

मुंबई : 'एल अँड टी'च्या बांधकाम विभागाने भारतातील आपल्या हेवी सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर व्यवसायासाठी नॅशनल हाय- स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी (एनएचआरसीएल) मोठे कंत्राट मिळवले...

…चहावाला निघाला सट्ट्याचा ‘बुकी’

म. टा. प्रतिनिधी, दुबई येथे सुरू असलेल्या '' सामन्यावर सट्टा लावणाऱ्या ''ला सिडको पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचे नाव सत्यनारायण मुंदडा (४०, रा. सिडको)...

Suryakumar Yadav: IPL 2020: सूर्यकुमारला मिळू शकते का भारतीय संघात स्थान? पाहा प्रशिक्षक रवी शास्त्री काय म्हणाले… – ipl 2020: indian head coach ravi...

आबुधाबी: मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव हा चांगल्या फॉर्मात आहे. गेल्या २-३ आयपीएलपासून सूर्यकुमार सातत्याने चांगली फलंदाजी करताना दिसत आहे. त्यामुळे यावेळी जेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या...

Recent Comments