Home देश india china standoff: आता ऊर्जा क्षेत्रातही चीनला झटका; आयातीचे नियम कडक करणार:...

india china standoff: आता ऊर्जा क्षेत्रातही चीनला झटका; आयातीचे नियम कडक करणार: आर. के. सिंह – india china standoff power minister r k singh comments on import from china


नवी दिल्लीः भारताकडून चीन सतत आर्थिक स्तरावर झटके देण्यात येत आहेत. डिजिटल आणि रस्ते बांधकामक क्षेत्रानंतर आता वीज उत्पादन क्षेत्रातून चीनला झटका देण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. ऊर्जा क्षेत्रासाठी चीनमधून जी काही आयात होत होती आता त्यावर सरकार बारकाईन नजर ठेवणार आहे. तसंच या क्षेत्रात सीमा शुल्कही वाढवण्याचा विचार सरकारकडून करण्यात येत आहे, असं केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांनी सांगितलं.

सरकार ऊर्जा क्षेत्रातील आयातीवर सीमा शुल्क वाढवणार आहेत. यामुळे आयातीवर काही प्रमाणात निर्बंध येतील. चिनी कंपन्यांना रोखण्यासाठी सीमा शुल्कासोबत नियम अधिक कडक केले जातील, असं आर. के. सिंह म्हणाले. ‘आज तक’ वृत्तवाहिनीला त्यांनी यासंदर्भात मुलाखत दिली.

चीनला आर्थिक आणि लष्करी स्तरावर उत्तर देण्याची ताकद भारतात आहे. चीनच्या सीमेवरील कुरापतींविरोधात आज अनेक देश भारतासोबत आहेत. भारताच्या सक्षम नेतृत्वामुळे हे शक्य झालं आहे, असं आर. के. सिंह म्हणाले.

देशातील पुरवठा भारत आपली क्षमता वापरून पूर्ण करू शकतो. चीन माल हा स्वस्तात उपलब्ध होत असल्याने तो आयात केला जात होता. पण आता पंतप्रधान मोदींनी आत्मनिर्भर भारताची सुरुवात केली आहे. यातून भारत आपल्या गरजा पूर्ण करू शकणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. भारताने चीनला धडा शिकवावा असं प्रत्येक भारतीयला वाटतंय. यामुळे स्वदेशी उत्पादनांवर अधिक भर देण्यात येणार आहे, असं आर. के. सिंह यांनी सांगितलं.

चीनची कोंडी; आता ‘या’ मंत्रालयाचेही चीनी उत्पादनांसाठी दरवाजे बंद

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी चिनी कंपन्यांना रस्ते बांधणी क्षेत्रात नो एन्ट्रीचा इशारा दिला आहे. चिनी कंपन्यांवर लवकरच बंदी घालण्यात येईल, असं गडकरींनी सांगितलं. तसंच भागिदारी असलेल्या प्रकल्पातील गुंतवणुकीवरही बंद घालण्यात येईल. सूक्ष्म आणि लघु-मध्यम उद्योग क्षेत्रातही चीनची नाकेबंदी करण्यात येणार आहे, असं गडकरी म्हणाले.

राहुल गांधी मोदी सरकारचे ‘हे’ पाऊल अडवणार; म्हणाले, ‘लक्षात ठेवा’

यापूर्वी भारत सरकारने ५९ चिनी मोबाइल अॅपवर बंदी घातली. यात टिकटॉकसह युसी ब्राउजर, शेअर इट आणि कॅम स्कॅनर सह अनेक अॅपचा समावेश आहे. त्यापूर्वी रेल्वेनेही चिनी कंपनीसोबत केलेले ४७१ कोटींचे कॉन्ट्रॅक्ट रद्द केले. कानपूर-दीन दयाल उपाध्याय (DDU) सेक्सशन बनवण्याचे कॉन्ट्रॅक्ट चिनी कंपनीला मिळाले होते. ४१७ किलोमीटरचा हा कॉरिडोर होता.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Pravin Darekar Reaction On Eknath Khadse Resignation – ‘एक गोष्ट मनासारखी झाली नाही म्हणून नाराज होणे योग्य नाही’

सांगलीः 'कोणताच राजकीय पक्ष शंभर टक्के तुमचे समाधान करु शकत नाही. आठ गोष्टी तुमच्या मनासारख्या झाल्या आणि एक झाली नाही म्हणून नाराज होणे...

Prithvi Shaw Mentality Deteriorated, Sunil Gavaskar Erupted – सामना सुरू असताना गावस्कर भडकले; म्हणाले, या खेळाडूची मानसिकता बिघडली

दुबई: IPL 2020आयपीएलच्या १३व्या हंगामात भारतीय युवा खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. या वर्षी विदेशी खेळाडूंपेक्षा भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. दिल्ली...

Suraj Pe Mangal Bhari Movie Trailer – सूरज पे मंगल भारी ट्रेलर: लोटपोट व्हायला भाग पाडेल मनोज बाजपेयी आणि दिलजीत दोसांजचा कॉमक अंदाज

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून मनोज बाजपेयी, दिलजीत दोसांज आणि फातिमा सना शेख यांच्या आगामी 'सूरज पे मंगल भारी' सिनेमाची चर्चा होती. यंदा दिवाळीत...

Recent Comments