Home देश india china standoff: चिन्यांनाही असंच बाहेर करा, प्रियांका गांधींवरून मेहबूबा मुफ्तींचा सरकारला...

india china standoff: चिन्यांनाही असंच बाहेर करा, प्रियांका गांधींवरून मेहबूबा मुफ्तींचा सरकारला टोला – wish they could remove chinese troops from our land as swiftly as they are asking priyanka gandhi to vacate her house says mehbooba mufti


नवी दिल्लीः केंद्र सरकारने काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना सरकार बंगला खाली करण्याची नोटीस बजावली आहे. यावरून काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. हा निर्णय राजकीय सूड भावनेतून आणि हुकूमशाहीने घेतला आहे, अशी टीका काँग्रेसने केलीय. जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनीही या प्रकरणी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. प्रियांका गांधींना ज्या वेगात बंगला खाली करण्यास सांगितलं आहे त्याच वेगाने चिनी सैनिकांना आपल्या जमिनीवरून हटवायला हवं होतं, असं मुफ्ती म्हणाल्या.

काँग्रेस घराण्याचे बलिदान आठवा

महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत यांनीही केंद्र सरकारला टीकेचं लक्ष्य केलं आहे. सरकारने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा. सरकारने गांधी घराण्याच्या सुरक्षेशी खेळ करू नये. प्रियांका गांधीही त्यातच घराण्यातील आहेत. गांधी घराण्याने देशाला दोन पंतप्रधान दिले. प्रियांका गांधी त्यात घराण्याच्या सदस्य आहेत. या घराण्याने देशाला दोन पंतप्रधान दिले आणि दोघांनी देशसेवासाठी बलिदान दिले, असं नितीन राऊत म्हणाले. तर करोना संकटाच्या काळात सरकारचा हा तुच्छ निर्णय आहे, अशी टीका तहसीन पुनावाला यांनी केलीय.

चिनी अॅपवर डिजिटल स्ट्राइकनंतर PM मोदींचा दणका, weibo अॅपला सोडचिठ्ठी

१ ऑगस्टपर्यंत प्रियांका गांधींना मुदत

प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारच्या इस्टेट उपसंचालकांनी नोटीस पाठवली आहे. प्रियांका गांधी यांना सरकारी बंगला सोडण्यासाठी १ ऑगस्ट २०२० पर्यंत मुदत दिली आहे. . तरीही बंगला खाली न केल्यास दंडात्मक कारवाई किंवा बंगल्याचं भाडं द्यावं लागेल, असं नोटीसमधून बजावलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रियांका गांधी यांची एसपीजी सुरक्षा काढून घेतल्यानंतर प्रियांका यांना झेड प्लस सुरक्षा दिली जात आहे. झेड प्लस सुरक्षेच्या आधारावर सरकारी बंगल्या घेता येत नाही. यामुळे लोधी इस्टेटमधील हाउस क्रमांक ३५ प्रियांका गांधींना अलॉट केलेला बंगला रद्द केला आहे, असं नोटीसमध्ये नमूद करण्यात आलंय.

मेहबूबा मुफ्ती यांचे ट्विट

सरकारी बंगला सोडा, प्रियांका गांधींना केंद्र सरकारची नोटीस

एसपीजी सुरक्षा गेल्या वर्षी काढली

केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१९मध्ये गांधी कुटुंबाला देण्यात आलेली स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) सुरक्षा हटवण्यात आली होती. सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना झेड प्लस सुरक्षा दिली. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान (CRPF) या त्यांची सुरक्षा करतात. सध्या एसपीजी सुरक्षा पंतप्रधान असल्याने नरेंद्र मोदी यांना देण्यात आली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sex with chicken: विकृतीचा कहर! कोंबड्यांसोबत करायचा सेक्स, पत्नी काढायची व्हिडिओ – 37 years old perverted person jailed three years for having sex with...

लंडन: लैंगिक वासना शमण्यासाठी विविध मार्गांचा वापर काहीजण करत असतात. मात्र, काहीजण विकृत आणि किळसवाणा मार्गाचा अवलंब करतात. असाच एक प्रकार समोर आला...

aurangabad News : नवीन वर्षात उघडणार ‘संत एकनाथ’चा पडदा – the curtain of ‘sant eknath’ will open in the new year

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादगेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेले संत एकनाथ रंगमंदिराच्या नूतनीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात पोचले आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात...

Recent Comments