Home देश india china standoff: भारत-चीनमध्ये चर्चेची तिसरी फेरी, मात्र सीमेवर चिनी सैनिकांची संख्या...

india china standoff: भारत-चीनमध्ये चर्चेची तिसरी फेरी, मात्र सीमेवर चिनी सैनिकांची संख्या वाढतीच – china has continued with it military build up in different sectors along lac


नवी दिल्लीः पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्याने तळ ठोकलेल्या ठिकाणांहून मागे हटावं. दोन्ही देशांमध्ये २२ जून मधील बैठकीत एकमताने घेतलेल्या निर्णयाचं पालन करावं, असं भारताने चीनला सांगितलं आहे. एकीकडे उभय देशांमध्ये लष्करी पातळीवर चर्चा सुरू असताना दोन्ही देशांच्या सैन्याकडून सीमेवरील (LAC) सुरक्षेत वाढ केली जात आहे.

एलएसीवरील तणाव दूर करण्यावर भारत-चीनमध्ये मंगळवारी लष्कराच्या कोअर कमांडर स्तरावर तिसरी बैठक झाली. या बैठकीबाबत अधिकृतरित्या कुठलीही माहिती दिली गेली नाही. या बैठकीत भारतीय लष्कराचे १४ कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग आणि चिनी सैन्यातील मेजर जनरल लीउ लीन यांच्यात चर्चा झाली. या दोघांमध्ये ६ जून आणि २२ जूनलाही बैठक झाली होती. सीमेवरील तणाव दूर करण्यासाठी बैठकीची ही तिसरी फेरी होती.

भारत-चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये भारताच्या बाजूला असलेल्या चुशूलमध्ये ही बैठक झाली. ही बैठक सकाळी ११ वाजता सुरू झाली. तर रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरूच होती. जवळपास १० तासांहून अधिक वेळ ही बैठक चालली.

चिनी सैन्याकडून तणाव दूर करण्याऐवजी सीमेवर आणखी सैनिक वाढवण्यात येत आहेत. भारताला लागून असलेल्या ३४८८ किलोमीटरच्या प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ (LAC) चीनकडून विविध ठिकाणी सैनिकांच्या हालचाली वाढल्या आहेत. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशातही चीनच्या हालचाली वाढल्याची माहिती, सूत्रांनी दिलीय.

प्रत्यक्ष ताबा रेषेवर एप्रिल मध्याच्या आधीची स्थिती पूर्ववत करावी, या भूमिकेवर भारत ठाम आहे. तसंच चिनी सैन्याकडून सीमेवर वाढवण्यात येत असलेल्या फौजफाट्याच्या पार्श्वभूमीवर भारतानेही सीमेवर जवानांती संख्या वाढवली आहे. यासह तोफा, रणगाडे आणि लष्करासाठी आवश्यक असलेली इतर वाहनंही वाढवली आहेत.

चिनी सैन्याने लडाखमधील पँगाँस सरोवराच्या परिसरातील फिंगर ४ ते ८ मधून मामगे हटावं. तसंच गलवान खोऱ्यातील पेट्रोलिंग पॉइंट १४ आणि डेपसांग प्लेन्सच्या बॉटलनेक भागातून सैनिक हटवावे, असं भारताने चीनला या बैठकीत सांगितलं आहे. गलवानमध्ये १५ जूनला झालेल्या हिंसक संघर्षाची पुनरावृत्ती होऊ नये यावर दोन्ही देशातील सैन्यात एकमत झालं आहे. पण प्रत्यक्षात जमिनीवर ही स्थिती बदलताना दिसत नाही, असं सूत्रांनी सांगितलं.

अॅप बंदीवरून चीन खवळला; भारताला दिली आर्थिक युद्धाची धमकी

PM मोदींना चीनवर बोलायचं होतं, चण्यावर बोललं गेलं अन् ईदही विसरले; ओवैसींचा टोला

चिनी सैन्याकडून मागे हटण्याची कुठलीही चिन्ह दिसत नाहीए. चीनने दाखवण्यासाठी फक्त सैन्याच्या काही गाड्या मागे पुढे केल्या आहेत. खरं तर चिनी सैन्य आपली स्थिती भक्कम करत आहे. आता चिनी सैन्य मागे हटण्यासाठी काही महिन्यांचा काळ लागेल. यामुळे पुढील कुठल्याही आव्हानासाठी आम्ही तयार आहोत, असं सूत्रांनी सांगितलं.

१५ जूनला भारत-चिनी सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. तर चीनही ४० हून अधिक सैनिक मारले गेल्याचं सांगितलं जातंय. या घटनेनंतर दोन्ही देशांच्या सैन्यात २२ जूनला बैठक झाली होती. या बैठकीत सीमेवरील सर्व ठिकाणांवर अडीच ते ३ किलोमीटर दोन्ही देशाच्या सैन्याने मागे हटावं. हिंसक घटना झालेल्या गलवान खोऱ्यासह गोगरा, हॉटस्प्रिंग, पँगाँग सरोवर आणि डेपसांग या तणावाच्या भागातून मागे हटण्यावर एकमत झालं होतं.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Renu Sharma: धनंजय मुंडेंबाबत रेणू शर्मा यांचे निवेदन; ‘त्या’ व्हिडिओबाबतही दिले स्पष्टीकरण – no complaint against dhananjay munde statement issued by renu sharma

मुंबई:रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचा आरोप केल्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे गोत्यात आले होते. मुंडे यांच्यावर यावरून भाजप नेत्यांकडून सातत्याने निशाणा साधण्यात...

Ajinkya Rahane: अजिंक्यला सलाम… ऑस्ट्रेलियाकडून शिविगाळ ऐकल्यानंतरही एका कृतीने जिंकली सर्वांची मनं – hats off to indian captain ajinkya rahane, refuse to cut kangaroo...

मुंबई : अजिंक्य रहाणे ऑस्ट्रेलियामध्ये नेतृत्व करत असताना त्याला प्रेक्षकांकडून शिविगाळ ऐकावी लागली. पण ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांकडून शिविगाळ ऐकली असली तरी त्यांचा सन्मान अजिंक्यने...

Kamla Harris: Kamla Harris कमला हॅरीस यांचा शपथविधीतल्या ड्रेसचा रंग जांभळा का होता ? – inauguration day why kamala harris wore purple dress

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्रपती पदाच्या शपथविधीचा सोहळा नुकताच पार पडला. हिंसाचाराच्या सावटाखाली पार पडलेल्या या शपथविधीत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. अमेरिकेचे...

Recent Comments