Home देश india china standoff: भारत-चीन तणाव; सर्जिकल स्ट्राइक करणाऱ्या स्पेशल फोर्सेस लडाखमध्ये तैनात...

india china standoff: भारत-चीन तणाव; सर्जिकल स्ट्राइक करणाऱ्या स्पेशल फोर्सेस लडाखमध्ये तैनात – india china standoff deployment of special forces in ladakh


नवी दिल्लीः चीनशी सुरू असलेल्या तणावामुळे भारताने लडाखमध्ये स्पेशल फोर्सेसची तैनात केल्या आहेत. देशातील विविध ठिकाणांहून स्पेशल फोर्सेसचे युनिट लडाखमध्ये नेण्यात येत आहेत. तिथे या युनिटना अभ्यास करता येणार आहे. स्पेशल फोर्सेसमधील जवानांनी २०१७ मध्ये सर्जिकल स्ट्राइक केला होता. गरज पडल्यास या फोर्सेसचा वापर चीनविरोधातही केला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

स्पेशल फोर्सेसना पूर्व लडाखमध्ये तैनात केलं गेलं. या फोर्सेसना त्यांच्या भूमिकेबद्दल पूर्ण माहिती देण्यात आली आहे. चीनशी सीमेवर तणाव वाढल्यास कारवाईला सज्ज राहण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहे, असं वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिलं आहे. भारतात १२ हून अधिक स्पेशल फोर्सेसच्या रेजिमेंट आहेत. या फोर्सेसना वेगवेगळे प्रशिक्षण देण्यात येते. जम्मू-काश्मीरमध्ये तैनात स्पेशल फोर्सेसच्या तुकड्या या लेह आणि जवळपासच्या डोंगरांवर नियमितपणे युद्ध अभ्यास करत असतात.

भारत-चीनमध्ये मे महिन्याच्या आधीपासून तणाव आहे. या तणावाचं रुपांतर १५ जूनला गलवान खोऱ्यात रक्तरंजित संघर्षात झालं. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. तर चीनने अजूनही किती सैनिक मारले गेले याची अधिकृत माहिती दिलेली नाही.

प्रत्यक्ष ताबा रेषेवरील (LAC) तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशात लष्करी स्तरावर सुरू आहे. भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या तीन फेऱ्या झाल्या आहेत. भारताला चर्चेत गुंतवून दुसरीकडे सीमेवर हजारो सैनिकांसह मोठी शस्रास तैनात केली आहेत. चीनचा हा डाव लक्षात आल्याने भारतानेही सीमेवर जवानांची संख्या वाढवली असून तोफा, रणगाड्यांसह मोठी शस्रास्त्र आणि गाड्या तैनात केल्या आहेत. चीन चर्चेत गुंतवून १५ जूनला गलवानमध्ये विश्वासघात करत भारतीय जवानांवर हल्ला केला होता. यामुळे भारत आता पूर्णपणे सतर्क आहे.

रेल्वेचे खासगीकरण, २०२३ पर्यंत धावणार खासगी ट्रेन!

दुसरीकडे भारताने ५९ चिनी अॅप बंद करून डिजिटल स्ट्राइक केला आहे. तसंच चीनची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी भारताने तयारी सुरू केली आहे. रस्ते बांधणी क्षेत्रात चिनी कंपन्यांना बंदील घालण्यात येणार आहे. तर ऊर्जा क्षेत्रातील आयातीवरही बंधन घातली जाणार आहेत.

पुतीन यांना मोदींनी दिल्या शुभेच्छा; दोघांमध्ये झाली ही महत्त्वाची चर्चा

चीनशी तणाव सुरू असताना भारताने रशियाकडून ३३ लढाऊ विमानं खरेदी करण्याचा आज निर्णय घेतला आहे. यात २१ मिग-२९ आणि १२ सुखोई Su-20 Mki या या विमानांचा समावेश आहे. यासह ५९ मिग-२९ या विमानांच्या अपग्रेडशनला मंजुरी देण्यात आली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

tractor rally: शेतकऱ्यांनी दिल्ली पोलिसांना ‘ट्रॅक्टर रॅली’साठी मागितली लिखित परवानगी – tractor rally : farmers sought written permission from delhi police for republic day...

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलन आज ६० व्या दिवशीही सुरूच आहे. याच दरम्यान शेतकऱ्यांनी २६ जानेवारी रोजी 'प्रजासत्ताक दिना'ला ट्रॅक्टर रॅली...

mumbai: मुंबई: मालकाशी वाद; ड्रायव्हरनं ३ कोटींच्या ५ बस दिल्या पेटवून – mumbai driver arrested for setting five buses on fire after dispute with...

मुंबई: ट्रॅव्हल एजन्सीत ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या मुंबईतील व्यक्तीने जवळपास ३ कोटी रुपये किंमतीच्या पाच बस पेटवून दिल्या. मालकाने पैसे दिले नाहीत म्हणून...

Recent Comments