Home देश india china standoff: सीमेवर शांततेसाठी चीनने नियमांचे पालन करावे, भारताने सुनावले -...

india china standoff: सीमेवर शांततेसाठी चीनने नियमांचे पालन करावे, भारताने सुनावले – india china standoff chinese side to sincerely follow up restoration of peace at lac said mea


नवी दिल्लीः सीमेवरील तणावावरून भारताने आज पुन्हा चीनला तिखट भाषेत सुनावले. सीमेवरील शांतता प्रस्थापित करण्यासाठी कराराचे आणि निश्चित केलेल्या प्रोटोकॉलच चीनने प्रामाणिकपणे पालन करावे, असं भारतानं म्हटलं आहे. चीनने द्विपक्षीय समझौत्यांचे आणि प्रोटोकॉलचे पालन करून सीमेवर पुन्हा शांतता निर्माण होईल हे निश्चत करावे, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितलं.

भारत-चीनच्या सैन्यात वरिष्ठ कमांडर स्तरावर अलिकडेच झालेल्या बैठकीत दोन्ही पक्षांनी एलएसीवर तणाव कमी करण्यावर कटिबद्धता दर्शवली. अशा वेळी चीनने इमानदारीने दोन्ही देशांमध्ये यापूर्वी झालेल्या करारांचे पालन करावे आणि सीमेवर शांतता प्रस्थापित होईल यासाठी प्रयत्न करावे, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते श्रीवास्तव म्हणाले.

१५ जूनलाच्या रात्री झाला होता रक्तरंजित संघर्ष

लडाखमध्ये सीमेवर दोन महिन्यांपासून तणाव आहे. या तणावादरम्यान गेल्या महिन्यात १५ जूनला भारत-चीन सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. यात भारताचे २० जवान शहीद झाले. चीनचेही अनेक जवान मारले गेले. पण चीन त्याची माहिती जाहीर केलेली नाही. या घटनेनंतर भारत-चीन सीमेवर तणाव वाढला. चीनने आपले हजारो सैनिक तैनात केल्याने लडाखपासून ते अरुणाचल प्रदेशपर्यंत सीमेवर तणावाची स्थिती आहे. दोन्ही बाजूंनी सीमेवर हजारो सैनिक तैनात करण्यात आले. तसंच तोफा, रणगाड्यांसह मोठी शस्त्रास्रही आणि वाहनंही तैनात केली गेली आहे.

चीनला उत्तर देण्याची तयारी; सर्जिकल स्टाइक करणाऱ्या स्पेशल फोर्सेस लडाखमध्ये तैनात

पुतीन यांना मोदींनी दिल्या शुभेच्छा; दोघांमध्ये झाली ही महत्त्वाची चर्चा

चिनी अॅपवर भारताचा डिजिटल स्ट्राइक

सीमेवर आक्रमक होऊन तणाव वाढवणाऱ्या चीनला भारताने काही दिवसांपूर्वी डिजिटल स्ट्राइक करत झटका दिला. भारत सरकारने टिकटॉक, युसी ब्राउजर्ससह ५९ चिनी अॅपवर बंदी घातलीय. विदेशी कंपन्यांनी भारतात काम करताना संबंधित मंत्रालय आणि विभागांनी जारी केलेल्या कायदेशीर नियमांचे पालन करायला हवे. हे नियम सामान्य नागरिकांच्या डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि गोपनीयते संबंधी आहेत. पण या नियमांचे पालन न झाल्याने सरकारने चिनी अॅप्सवर बंदी घातली, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी स्पष्ट केलं.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Gaya: अनैतिक संबंधांत अडथळा ठरत होता पती, हैवान पत्नीने त्याची… – bihar wife killes husband over illicit affair

गया: बिहारच्या गया येथे एका महिलेने अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या पतीची निर्घृण हत्या केली. मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. महिलेने माहेरच्यांच्या...

अन् अपघाताने बालविवाहाचे पितळ उघडे

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक लॉकडाउन काळात विवाह सोहळ्याचे आयोजन हे आर्थिक दृष्टिकोनातून वधू पक्षासाठी लाभदायी ठरले. कमीत कमी खर्च आणि नातेवाइकांच्या उपस्थितीत विवाह...

Recent Comments