Home विदेश India China Standoff Latest News: सीमावाद : भारत-अमेरिकेची जवळीक; चीनचा तिळपापड -...

India China Standoff Latest News: सीमावाद : भारत-अमेरिकेची जवळीक; चीनचा तिळपापड – Chinese Media Threatens India On Friendly Relation With Usa


बीजिंग: लडाखमध्ये उद्भभवलेला तणाव कमी करण्याचा प्रयत्न भारत-चीनकडून सुरू असताना दुसरीकडे चीन भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. चीनसोबत तणाव उद्भवल्यानंतर भारत आणि अमेरिकेमधील मैत्री संबंध आणखी घट्ट होत असल्यामुळे चीनचा जळफळाट सुरू झाला आहे. भारताने अमेरिकेला साथ दिल्यास त्याचे परिणाम वाईट होईल अशी धमकी चीनने पुन्हा एकदा दिली आहे.

चीन सरकारचे वृत्तपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाइम्स’ने चीन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांच्या हवाल्याने सांगितले की, भारत आणि चीन या दोन्ही पक्षांमध्ये सहमती झाल्यानंतर एकमताने सीमेवरील तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला असून त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात आला आहे. दोन्ही देशांमध्ये असलेला तणाव कमी होत असल्याचे तज्ञांनी म्हटले असल्याचे ‘ग्लोबल टाइम्स’ने म्हटले आहे.

वाचा: चीनची आगळीक सुरूच; आणखी एका बेटावर उभारणार सैनिकी तळ!

‘ग्लोबल टाइम्स’ने आपल्या संपादकीयात म्हटले की, सर्वकाही सकारात्मक घडामोडी घडत असून सीमेवरील तणाव कमी होत असल्याचे हे संकेत आहेत. चीन आणि अमेरिकेतील संबंध बिघडत असल्याचे सूचक वक्तव्य ग्लोबल टाइम्सने केले असून दोन्ही देश शीत युद्धाच्या उंबरठ्यावर असल्याचेही ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. भारताने दीर्घकाळ गटनिरपेक्ष परराष्ट्र धोरण अवलंबले आहे. भारतात मागील अनेक वर्षांपासून भारताची ही भूमिका बदलते का हे पाहावे लागणार असल्याचे चीनने म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी चीनला मित्र म्हणून निवडल्यास भारत-चीनचे आर्थिक संबंध निश्चितच वाढतील. मात्र, भारताने चीनला कमजोर करण्यासाठी अमेरिकेला साथ दिल्यास चीन आपल्या हितांचे संरक्षण करण्यास मागे हटणार नाही. त्याचे परिणाम राजकीय किंवा आर्थिक पातळीवरही होणार असल्याचा इशारा या संपादकीयामध्ये देण्यात आला आहे.

वाचा: भारत, रशियाला G-7 निमंत्रण चीनविरोधी; ट्रम्प यांना रशियाचं उत्तर

‘ग्लोबल टाइम्स’ने संपादकीयमध्ये म्हटले की, काही प्रमाणात सीमेवर तणाव कमी झाल्यामुळे दोन्ही देशांमध्ये भविष्यात आर्थिक आणि व्यापारात सहकार्य करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार असून दोन्ही देशांसाठी हे फायदेशीर आहे. तणाव कायम राहिल्यास आणि तो वाढल्यास त्याचा परिणाम दोन्ही देशांच्या संबंधावर होणार असून त्यातून काहीच साध्य होणार नसल्याचेही संपादकीयमध्ये म्हटले आहे. राजकारणाचा अर्थव्यवस्था आणि व्यापारावर परिणाम होत असेल तर दोन्ही द्विपक्षीय व्यापार संबंधावर परिणाम होणार आहे. सध्या भारतात चीनविरोधात रोष वाढत असल्याकडेही संपादकीयमध्ये लक्ष वेधण्यात आले आहे.

वाचा: बलुचिस्तान: लष्कराच्या इमारतीची नासधूस, पाक सैन्याने पळ काढला

भारताने करोनाचा वाढत असलेला संसर्ग आणि टोळ कीटकांचे आक्रमण यावर अधिक लक्ष देणे आवश्यक असल्याचा अनाहून सल्ला चिनी वृत्तपत्राने दिला आहे. भारताला लॉकडाउननंतरही करोनाचा संसर्ग रोखण्यास अपयश आले आहे. भारताची अर्थव्यवस्था डळमळीत झाली असून शहरी बेरोजगारीचे प्रमाण २७ टक्क्यांपर्यंत पोहचले असल्याचे ‘ग्लोबल टाइम्स’ने म्हटले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Raosaheb Danve: खडसे हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचेच; दानवेंची नवी माहिती – eknath khadse originally belongs to ncp, says raosaheb danve

मुंबई: एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून त्यांच्यावर चौफेर हल्ले सुरू आहेत. खडसे यांच्या बाबतीत...

mumbai: मुंबई: क्लिनिकमध्ये आलेल्या रुग्ण महिलेचं डॉक्टरने घेतलं चुंबन – mumbai, doctor arrested, mumbai crime news, मुंबई, विनयभंग, molested

मुंबई: क्लिनिकमध्ये आलेल्या रुग्ण महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली ७८ वर्षीय डॉक्टरला अटक करण्यात आली. रुग्ण महिला डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये आली होती. डॉक्टरने तिचे चुंबन...

aurangabad corona cases: चार रुग्णांचा मृत्यू;, १०२ नवे बाधित – aurangabad reported 102 new corona cases and 2 deaths in yesterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजिल्ह्यातील ५८ ते ६५ वर्षांच्या चार बाधितांचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील करोना बळींची संख्या एक हजार ४७ झाली आहे....

Recent Comments