Home देश india china standoff: PM मोदींना चीनवर बोलायचं होतं, चण्यावर बोललं गेलं अन्...

india china standoff: PM मोदींना चीनवर बोलायचं होतं, चण्यावर बोललं गेलं अन् ईदही विसरले; ओवैसींचा टोला – asaduddin owaisi attacks pm modi


नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केलं. यात त्यांनी करोना व्हायरस आणि अनलॉकच्या नियमांवर भर दिला. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर भारत-चीनमध्ये तणाव कायम आहे. यामुळे पंतप्रधान मोदी चीनवर बोलतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र पंतप्रधान मोदींनी भाषणात चीनशी असलेल्या तणावाचा मुद्दा मांडला नाही. यावरून एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केलीय. मोदींना आज चीनवर बोलायचे होते, पण त्यांच्याकडून चण्यावर बोललं गेलं, असं ओवैसी म्हणाले.

ओवैसी यांनी ट्विट करत पीएमओला टॅग केलं. चीनव बोलायचं होतं, पण चण्यावर बोललं गेलं. खरं तर याची गरज त्याचीही गरज होती. सरकारच्या अनियोजित लॉकडाऊनमुळे अनेकांची उपासमार झाली, अशी टीका ओवैसी यांनी केली. सणांवरूनही ओवैसी यांनी मोदींना टीकेचं लक्ष्य केलं. मोदींनी पुढील महिन्यांमध्ये येणाऱ्या अनेक सणांचा उल्लेख केला. पण बकरी ईदचा उल्लेख करायला ते विसरले. ठीक आहे, तरीही मोदींना ईद मुबारक, असं म्हणत ओवैसींनी टोला लगावला.

काँग्रेसच्या कार्ति चिदम्बरम यांचाही हल्लाबोल

काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम यांचे पुत्र आणि तामिळनाडूतील शिवगंगाचे खासदार कार्ति चिदम्बरम यांनीही सणांच्या मुद्द्यावरून मोदींवर टीका केली. भाजपसाठी फक्त हिंदी, हिंदू आणि उत्तर भारत महत्त्वाचा आहे. दक्षिण भारत कुठे आहे? , असा सवाल कार्ति चिदम्बरम यांनी केला.

कार्ति चिदम्बरम यांनी ट्विट करून सवाल उपस्थित केले. काय आहे ही छट पूजा? दक्षिण भारतातील कुठल्या सणांचा उल्लेख केला गेला? दक्षिण भारत? तो कुठे आहे? भाजपसाठी फक्त हिंदी, हिंदू आणि उत्तर भारत महत्त्वाचा आहे, असं कार्ति चिदम्बरम म्हणाले.

मोदी चीनवर बोलायला विसरले वाटतं, काँग्रेसचा पंतप्रधानांवर पुन्हा निशाणा

करोनावर लस कधी तयार होणार? PM मोदींनी घेतली उच्च स्तरीय बैठक

सोशल मीडियावर ओणम ट्रेंडमध्ये

कार्ति चिदम्बरम यांच्या या ट्विटनंतर ओणम, होळी आणि दिवाळीसारखे सण फेसबुक, गुगल आणि ट्विटर सारख्या सोशल मीडिया हँडलवर ट्रेंडमध्ये होते. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात ओणम उल्लेख केला आहे. हा सण दक्षिण भारतात साजरा केला जातो, असं सांगत अनेक सोशल मीडिया युजर्सनी कार्ति चिदम्बरम यांच्या लक्षात आणून दिले.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

पुढील ५ महिन्यांसाठी ८० कोटीहून अधिक गरीब नागरिकांना ५ किलो गहू किंवा ५ किलो तांदूळ मोफत दिले जातील, या बरोबर प्रत्येक कुटुंबाला १ किलो चणे दिले जाणार. पावसाळ्यात आणि त्यानंतर मुख्यत: कृषी क्षेत्रात अधिक काम होत असते. जुलैपासून हळूहळू सणाचे दिवस येतात, असं सांगत पंतप्रधान मोदींनी गुरु पौर्णिमा, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी, ओणम, काटीब्यू, नवरात्री, दुर्गा पूजा, दसरा, दिवाळी आणि छट पूजा, या संणांचा उल्लेख केला.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

BSNL festive offer: BSNL युजर्ससाठी फेस्टिव सीजनमध्ये ऑफर्स, या रिचार्जवर बंपर फायदे – festive offer: bsnl extends validity of rs 1999, rs 699, rs...

नवी दिल्लीः बीएसएनएल कंपनीने फेस्टिवल सीजनमध्ये आपल्या ग्राहकांना बंपर ऑफर देत आहे. बीएसएनएल मध्ये अनेक प्रिपेड व्हाऊचर्स (PVs) आणि स्पेशल टॅरिफ व्हाउचर्स (STVs)...

मास्क न लावणाऱ्यांमुळे वाढू शकतो करोनाचा धोका

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई संसर्गवाढीच्या (उच्चतम बिंदू) महत्त्वाच्या टप्प्यावर मुंबई आली असल्याचे निरीक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वारंवार व्यक्त केले जात असले तरीही ...

Recent Comments